सोनिया गांधींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी, काँग्रेसने नड्डा यांना पत्र लिहून माफी मागण्याची केली मागणी
Cong Slams BJP: भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी सोनिया गांधींबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल काँग्रेस आता आक्रमक झाली आहे.
Cong Slams BJP: भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी सोनिया गांधींबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल काँग्रेस आता आक्रमक झाली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम नरेश यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून माफी मागण्याची मागणी केली असून पुन्हा असे झाल्यास मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.
भाजप अध्यक्ष नड्डा यांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, 23 जुलै रोजी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान शुक्ला यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल अभद्र आणि अपमानास्पद भाषा वापरल्याबद्दल काँग्रेसने तीव्र निषेध करते. ते म्हणाले की, संस्कृतीबद्दल बोलणारे भाजपचे सर्वोच्च नेते आणि प्रवक्ते वारंवार देशातील महिलांबद्दल, विशेषत: एका राष्ट्रीय पक्षाच्या 75 वर्षीय अध्यक्षांबद्दल अपमानास्पद भाषा वापरतात. ते म्हणाले, विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी आक्षेपार्ह भाषा वापरणे भाजपची महिलाविरोधी विचारसरणी दर्शवते. अशा आक्षेपार्ह वक्तव्यामुळे देशाच्या राजकारणाची पातळी घसरत आहे.
'स्त्रियांचा आदर करण्याची भारतीची मोठी परंपरा आहे'
नड्डा यांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेस जयराम नरेश म्हटले आहे की, महिलांचा आदर करणे ही भारताची वैदिक काळापासूनची मोठी परंपरा आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपने राजकारणात महिलांप्रती विनम्र आणि आदराने वागणे अपेक्षित होते. परंतु पक्षाने आपली भाषा बदलली आहे. ते म्हणाले, "पंतप्रधान मोदी आणि तुम्ही (नड्डा) तुमच्या पक्षाच्या नेत्यांच्या लज्जास्पद आणि असभ्य वक्तव्याबद्दल देशातील महिलांची माफी मागावी. तुमचे प्रवक्ते आणि नेत्यांना सांगून राजकारणाची प्रतिष्ठा खराब करू नका, असे आवाहन करत आहोत. जयराम नरेश म्हणाले, "जेव्हा पंतप्रधानांसारख्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीने पदाची प्रतिष्ठा कमी केली. तेव्हा त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते विरोधी पक्षनेत्यांच्या विरोधात अपमानास्पद शब्द वापरतीलच."
इतर महत्वाच्या बातम्या:
ISC Result 2022 Declared: आयसीएसई 12वीचा निकाल जाहीर, ठाण्यातील उपासना नंदी देशात पहिली
Kerala High Court : "अविवाहित मातेचे मूलही देशाचा नागरिक, पालक म्हणून जन्म दाखल्यावर फक्त आईचे नाव लिहिण्याचा अधिकार"