(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी : बारामतीची लढत ठरली, OBC बहुजन पार्टीचे 9 उमेदवार जाहीर, जरांगेंना सोबत घेतलं तर आंबेडकरांना पाठिंबा नाही
OBC Bahujan Party 9 candidates announced : लोकसभा निवडणूक 2024 साठी राजकीय पक्षांनी उमेदवार याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 साठी (Loksabha Election 2024) राजकीय पक्षांनी उमेदवार याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. भाजप, शिवसेना ठाकरे आणि शिंदे, काँग्रेस, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीने आपआपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानंतर आता प्रकाश अण्णा शेंडगे (Prakash Shendge) यांच्या ओबीसी बहुजन पार्टीनेही आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. OBC बहुजन पार्टीने 9 उमेदवार जाहीर केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे प्रकाश शेंडेगे यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवार दिला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात महेश भागवत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पहिला उमेदवार ठरला आहे. दुसरीकडे OBC बहुजन पार्टीने कोल्हापूरमध्ये काँग्रेस उमेदवार शाहू महाराज (Shahu Maharaj) यांना, तर प्रकाश आंबेडकर यांना अकोल्यात पाठिंबा जाहीर केला आहे.
प्रकाश शेंडगे काय म्हणाले?
प्रकाश शेंडगे म्हणाले, आज आमच्या सुकाणू समितीची बैठक झाली. आज बैठकीत आम्ही 9 उमेदवार फिक्स केले आहेत. प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा सुरु आहे. त्यात त्यांनी सांगलीतील जागेवर आम्हाला समर्थन केलेलं आहे. मी स्वत: जर निवडणूक लढवली तर प्रकाश आंबेडकर सांगलीतील जागेवर पाठिंबा देणार आहेत. प्रकाश आंबेडकर अकोल्यातून निवडणूक लढवत आहेत, तिथे आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे. आम्ही कोल्हापूर आणि हातकणंगलेसंदर्भात भूमिका घेतली आहे. ज्यात कोल्हापूरच्या जागेवर शाहू महाराजांना आम्ही पाठिंबा देतोय. त्यांनीच आम्हाला सर्वात आधी आरक्षण दिलं, त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीमागे ठाम उभे आहोत. त्यांची भेट कोल्हापुरात जात घेणार आहोत आणि ओबीसी आरक्षण धोक्यात आलंय त्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मराठवाड्यातून नांदेड लोकसभा मतदारसंघात ॲड. अविनाश भोशीकर यांना उमेदवारी देत आहोत, ७० टक्के इथे ओबीसी मतदान आहे. परभणीतून हरीभाऊ शेळके यांना उमेदवार देतोय, धनगर नेते आहेत, ते लोकसभा लढवणार आहेत, असंही शेंडगे यांनी स्पष्ट केलं.
प्रकाश शेंडगेंनी कोणाला कोठून उमेदवारी दिली?
हिंगोली - ॲड. रवी शिंदे
यवतमाळ- वाशिम - प्रशांत बोडखे यांना उमेदवारी
बारामती : महेश भागवत यांना आम्ही उमेदवारी
बुलढाणा - नंदुभाऊ लवंगे यांना उमेदवारी धनगर समाजाचे नेते
शिर्डी : अशोक अल्लाड उमेदवारी, मातंग समाजाचे नेते
हातकणंगले - मनिषा डांगे आणि प्रा. संतोष कोळेकर यांच्यापैकी एकाला आम्ही उमेदवारी देऊ…
सोमवारी आम्ही हातकणंगले संदर्भात जाहीर करु, असंही प्रकाश शेंडगे यांनी स्पष्ट केलं.
इतर महत्वाच्या बातम्या