मिटकरी आणि मनसे जिल्हाध्यक्षांनी मिळून प्रसिद्धीसाठी रचलेला कटातून जय मालोकारचा मृत्यू ; नितीन देशमुख यांचे खळबळजनक आरोप
Nitin Deshmukh, Akola : अकोल्यातील आमदार अमोल मिटकरी आणि मनसेमधील राडा प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट आणि आरोप केलाय. हे सारं प्रकरण आमदार अमोल मिटकरी आणि मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी मिळून प्रसिद्धीसाठी रचलेला कट असल्याचे आमदार देशमुख म्हणाले आहेत.
Nitin Deshmukh, Akola : अकोल्यातील आमदार अमोल मिटकरी आणि मनसेमधील राडा प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट आणि आरोप केलाय. हे सारं प्रकरण आमदार अमोल मिटकरी आणि मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी मिळून प्रसिद्धीसाठी रचलेला कट असल्याचे आमदार देशमुख म्हणाले आहेत. या दोघांच्या प्रसिद्धीच्या राजकारणात जय मालोकारचा मृत्यू झाल्याचं ते म्हणाले. मिटकरी आणि पंकज साबळे यांच्यात अतिशय घनिष्ट मैत्री असल्याचंही त्यांनी सांगितलय. आमदार नितीन देशमुख यांनी आज दिवंगत मनसे पदाधिकारी जय मालोकार यांच्या कुटुंबियांची त्यांच्या उमरीतील निवासस्थानी सांत्वनपर भेट घेतलीय यावेळी ते बोलत होतेय. हे प्रकरण आता मिटकरींनी संपवावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय.
मिटकरींनी स्वत:ची तुलना आदित्य ठाकरेंशी करू नये
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही राज ठाकरेंना सुपारीबाज म्हटले होते. त्यांची गाडी फोडण्याची ताकद मनसे कार्यकर्त्यांत आहे का? असं विधान आमदार मिटकरींनी केलं होतं. मिटकरींच्या या विधानावर बोलतांना देशमुखांनी मिटकरींवर पलटवार केलाय. मिटकरींनी स्वत:ची तुलना आदित्य ठाकरेंशी करू नये. कुठे आदित्य ठाकरे आणि कुठे अमोल मिटकरी असं आमदार नितीन देशमुख म्हणाले आहेत.
मनसे पदाधिकारी जय मालोकार यांचा हृदय झटक्यानं मृत्यू झाला होता
आमदार अमोल मिटकरींच्या वाहन तोडफोड प्रकरणातील आरोपी असलेले जिल्हाध्यक्ष राजेश काळे आणि पदाधिकारी सचिन गव्हाळे यांना अटक करण्यात आली आहे. अकोल्यातील सरकारी बगीचाजवळून अटक करण्यात आली. आतापर्यंत 7 जणांना अटके करण्यात आली तर तिघांना जामीन मिळाला होता. तर एका आरोपीचा मनसे पदाधिकारी जय मालोकार यांचा हृदय झटक्यानं मृत्यू झाला होता. आतापर्यंत 20 पेक्षा अधिक मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जय मालोकार यांचा काही दिवसांतच राष्ट्रवादीत प्रवेश होणार होता?
जय मालोकार यांचा काही दिवसांतच राष्ट्रवादीत प्रवेश होणार होता. मुंबईत तो अजित पवारांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादीत प्रवेश होता. याबाबत राष्ट्रवादीच्या अकोला जिल्हाध्यक्षांसोबत बोलणं झालं होतं. मालोकार राष्ट्रवादीत जातोय याचा अकोल्यातील मनसेच्या काही पदाधिकार्यांत राग होता. त्यातूनच जय मालोकारसोबत काहीतरी अघटीत घडल्याचा मिटकरींना संशय असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. राड्यानंतर मालोकार कोणासोबत होते?, हे समोर आलं तर संपुर्ण प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येईल असा दावा मिटकरींचा केलाय . या सर्व गोष्टींचा तपास पोलिसांनी करावा अशी मिटकरींची मागणी आहे. मिटकरींच्या दाव्याने प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Sugar Factory : अखेर संग्राम थोपटे, विवेक कोल्हेंचा कारखाना थकहमीतून वगळला, शासन निर्णय जारी