एक्स्प्लोर

नितेश राणे गो बॅक.. हिंदू जनआक्रोश मोर्चात घुसले मराठा आंदोलक, 10 जण पोलिसांच्या ताब्यात

शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या इंदापूरमधील गढीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला

पुणे : भाजप आमदार नितेश राणे यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्दयावरुन सध्या जोरकसपणे आवाज उठवला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी पोलिसांबद्दल केलेल्या विधानावरुन राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, काही पोलिसांकडून हिंदूंना डावललं जात असल्याचं सांगत नितेश राणेंनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. सध्या हिंदू जनआक्रोश यात्रेच्या माध्यमातून ते दौरा करत आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये भाजप आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हिंदू जन आक्रोश मोर्चाचं करण्यात आलं होतं. मात्र, त्यांच्या यात्रेला विरोध करत मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करत राणेंच्या यात्रेला विरोध केल्याचं दिसून आलं. यावेळी, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या इंदापूरमधील गढीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये आमदार नितेश राणे, ह.भ.प.संग्राम बापू भंडारे पाटील, सागर भैया बेग यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आलाय. मात्र, या मोर्चादरम्यान काही मराठा आंदोलकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नावाने घोषणाबाजी करत यात्रेला विरोध केला आहे. एक मराठा लाख मराठा  मनोज जरांगे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.. नितेश राणे गो बॅक, अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा सरदार  वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात असलेल्या ऐतिहासिक गढीवरील झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत हिंदू जन आक्रोश मोर्चा निघाला असून याला सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध दर्शवला. राणे यांचा मोर्चा नेहरू चौकातून मुख्य बाजारपेठेत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे सकल मराठा समाजाचे आंदोलक जात असताना त्यांना पोलिसांनी अडवले. तसेच, जवळपास दहा आंदोलकांना ताब्यात देखील घेतले आहे. आश्रम फरतडे नावाच्या सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले. तसेच, इंदापूर नगरपरिषदेसमोर सुरू असलेल्या हिंदु जन  आक्रोश मोर्चा सभा सुरू असताना प्रेक्षकात बसलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाजीह केली.

इंद्रेश्वर मंदिरात राणेंनी केली महाआरती

दरम्यान, राणे यांनी इंदापूरचे ग्रामदैवत असलेल्या इंद्रेश्वर मंदिरात जाऊन इंद्रेश्वर महादेवाची पूजा करतो करत इंद्रेश्वर महादेवाचे महाआरती देखील राणे यांच्या उपस्थितीत पार पडली आहे. त्यानंतर जय श्रीराम चा नारा देत हा मोर्चा इंदापूर शहरातील नगरपरिषदे समोरील मैदानात दाखल झाला आहे या ठिकाणी राणे यांची जाहीर सभा पार पडणार आहे. दरम्यान या मोर्चाला सकल मराठा समाज तसेच विविध सामाजिक संघटना आणि राजकीय विरोध दर्शवलेला आहे त्यामुळे इंदापूर शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात आहे.

हेही वाचा

महाविकास आघाडीत बिघाडी, शिवसेना उमेदवाराच्या पाठिशी विशाल पाटलांचा हात, जाहीर पाठिंबा

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार
घरगुती गॅस 29 रुपयांनी महागला, शरद पवारांची मोदी सरकारवर टीका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 'योग्यवेळी' प्रतिक्रिया
घरगुती गॅस 29 रुपयांनी महागला, शरद पवारांची मोदी सरकारवर टीका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 'योग्यवेळी' प्रतिक्रिया
Nashik Vidhan Parishad Election 2026: 'माघार घेण्यासाठी फडणवीस किंवा महाजनांकडून कोणतीही सूचना नाही'; नाशिकमधील भाजप बंडखोर प्रसाद हिरेंच्या विधानाने खळबळ
'माघार घेण्यासाठी फडणवीस किंवा महाजनांकडून कोणतीही सूचना नाही'; नाशिकमधील भाजप बंडखोर प्रसाद हिरेंच्या विधानाने खळबळ
Sunil Tatkare: रोहित पवारांना कोण विचारतंय? सुनिल तटकरेंनी भाजप प्रवेशाची हिस्ट्रीच काढली; म्हणाले, हडपसरमधून उमेदवारी..
रोहित पवारांना कोण विचारतंय? सुनिल तटकरेंनी भाजप प्रवेशाची हिस्ट्रीच काढली; म्हणाले, हडपसरमधून उमेदवारी..

व्हिडीओ

Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha
Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
Rajendra Jain: प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
Bachchu Kadu on Devendra Fadnavis: विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
Sunil Tatkare: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
India Alliance: पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
Embed widget