Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 26 डिसेंबर 2024 : ABP Majha
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 26 डिसेंबर 2024 : ABP Majha
अवघ्या 13 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळी याला गुरुवारी सकाळी ठाण्यात आणण्यात आले. विशाल गवळीला बुधवारी बुलढाण्यातील शेगाव येथे अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता पुढील तपासासाठी त्याला कल्याण पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत ठाणे पोलीस आयुक्तांशी फोनवरुन चर्चा केली.
कल्याणमधील घटना गंभीर आहे. विकृतांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. आरोपीला अटक झाली, हा खटला जलदगती न्यायालयात चालवा. आरोपीला फाशी होईल, हे सुनिश्चित करा, असे कठोर आणि स्पष्ट निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहेत. याशिवाय, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता विशाल गवळी याच्यावर पोलिसांकडून झटपट कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आज कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात डीसीपींची भेट घेण्यासाठी येणार आहेत.