एक्स्प्लोर

EPFO : ऑक्टोबर महिन्यात इपीएफओचे 13.41 लाख सबस्क्रायबर्स वाढले, कोणतं राज्य सर्वात पुढं?आकडेवारी समोर

EPFO Updates: ऑक्टोबर महिन्यात इपीएफओ सदस्यांच्या संख्येत चांगली वाढ झाली आहे. विशेष म्हणजे महिला सदस्यांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे.

नवी दिल्ली :एम्प्लॉईज प्रॉविडंट फंड ऑर्गनायझेशननं बुधवारी ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी जाहीर केली आहे. ऑक्टोबरमध्ये 13.41 लाख नवे सदस्य इपीएफओशी जोडले गेले आहेत. केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या मतानुसार इपीएफओनं राबवलेल्या उपक्रमांमुळं सदस्यांच्या संख्येत चांगली वाढ झाली आहे. 

इपीएफओच्या ऑक्टोबरच्या पेरोल डेटानुसार  ऑक्टोबर महिन्यात नव्यानं 7.50 लाख सदस्यांची नोंदणी झाली. यामध्ये  18 ते 25 वयोगटातील सदस्यांचं प्रमाण 58.49 टक्के आहे.  या वयोगटातील सदस्यसंख्या  5.43 लाख इतकी आहे. या आकडेवारीनुसार  तरुणांमध्ये संघटीत क्षेत्रात काम करण्याचं प्रमाण वाढत असल्याचं समोर आलं आहे. 

पेरोल डेटानुसार 12.90 लाख सदस्य यातून बाहेर पडले आणि पुन्हा ईपीएफओशी जोडले गेले. ऑक्टोबर 2023 च्या आकडेवारीच्या तुलनेत ऑक्टोबर 2024 मध्ये 16.23 टक्के वाढ झाली आहे.

ऑक्टोबर महिन्यात 2.09 लाख नव्या  महिला सदस्य इपीएफओशी जोडले गेले. ऑक्टोबर 2023 च्या तुलनेत 2.12 टक्क्यांची वाढ झाली आहे.  तर, एकूण 2.79 लाख महिला सदस्यांची वाढ झाली आहे. महिलांच्या संख्येत वाढ होणं हे देखील सकारात्मक चित्र दिसून येतं. 

पेरोल डेटाच्या आकडेवारीनुसार प्रमुख पाच राज्य अन् केंद्रशासीत प्रदेशातील कर्मचाऱ्यांची टक्केवारी 61.32 टक्के इतकी आहे. या पाच राज्यांमधून 8.22 लाख सदस्य ईपीएफओमध्ये योगदान देत आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातून 22.18 टक्के सदस्यांची नोंदणी झाली आहे. 

महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, नवी दिल्ली, हरियाणा, तेलंगाणा आणि गुजरात  या राज्यांमधून 5 टक्क्यांपेक्षा अधिक सदस्यांची वाढ झाली आहे.रस्ते वाहतूक, इलेक्ट्रॉनिक मीडिया कंपनी,  खासगी क्षेत्र अन् खासगी बँका या क्षेत्रात कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. पेरोल डेटानुसार ईपीएफओ सदस्यांच्या संख्येत सर्वाधिक वाढ महाराष्ट्र राज्यातून झाली आहे.

पीएफ खात्यातून रक्कम काढण्याची प्रकिया सोपी होणार

केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या माहितीनुसार पीएफ खात्यातून रक्कम काढणं सोपं व्हावं म्हणून लवकरच पीएफ खातेदारांना स्मार्ट कार्ड दिली जाणार आहेत. स्मार्ट कार्डद्वारे एटीएम सेंटरवरुन पीएफ खात्यातील रक्कम काढता येऊ शकते. मात्र, ही रक्कम काढण्यावर 50 टक्क्यांची मर्यादा असेल. पीएफ खात्यातून रक्कम काढण्याची प्रक्रिया सोपी केली जाणार असली तरी त्यासंदर्भातील नियम मात्र तेच राहणार असल्याची माहिती आहे. याशिवाय इपीएफओकडून पीएफ खातेदारांना चांगला परतावा देण्यासाठी इक्विटीमधील गुंतवणूक वाढवण्यावर देखील भर दिला जाणार आहे. 2015 मधील नियमानुसार इपीएफओकडून इक्विटीमध्ये 15 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करता येईल. सध्या 10 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक केली जात आहे. 

इतर बातम्या :

Toss The Coin Share: टॉस द कॉइनचा शेअर बाजारात धमाका, अवघ्या 7 दिवसांमध्ये गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mutual Fund SIP: म्युच्यूअल फंडात दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक केल्यास दहा वर्षात किती परतावा? जाणून घ्या नेमकं गणित
म्युच्यूअल फंडमध्ये 5000 रुपयांची एसआयपी केल्यास 10 वर्षात किती रिटर्न मिळणार, जाणून घ्या नेमकं गणित
नाशिकच्या आयुक्तपदी राहुल कर्डिलेंच्या नियुक्तीला ब्रेक, देवाभाऊंच्या 'टीम'चा बडा मंत्री नाराज,  सिंहस्थासाठी मर्जीतील अधिकाऱ्याची फिल्डिंग
नाशिकच्या आयुक्तपदी राहुल कर्डिलेंच्या नियुक्तीला ब्रेक, देवाभाऊंच्या 'टीम'चा बडा मंत्री नाराज, सिंहस्थासाठी मर्जीतील अधिकाऱ्याची फिल्डिंग
Supriya Sule on EVM: काँग्रेस अन् ठाकरे गटाकडून कंठ फुटेपर्यंत आरडाओरड पण सुप्रिया सुळे म्हणतात, ईव्हीएमला दोष देता येणार नाही
काँग्रेस अन् ठाकरे गटाकडून ईव्हीएमवरुन कंठ फुटेपर्यंत आरडाओरड पण सुप्रिया सुळे म्हणतात....
Virat Kohli for Sam Konstas : विराट कोहलीवर लागणार बॅन? 19 वर्षाच्या पोरांसोबत भर मैदानात भिडला, काय सांगतो ICC चा नियम?
विराट कोहलीवर लागणार बॅन? 19 वर्षाच्या पोरांसोबत भर मैदानात भिडला, काय सांगतो ICC चा नियम?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sindhudurg : राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची नव्याने उभारणी होणारShirdi Maha-Aarti : शिर्डीत एकाचवेळी एकाच दिवशी सामूहिक महाआरतीचा निर्णय !Vishal Gavali Kalyan Case : कल्याणमध्ये आणल्यानंतर पोलीस विशाल गवळीला कोर्टात हजर करणारMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 26 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mutual Fund SIP: म्युच्यूअल फंडात दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक केल्यास दहा वर्षात किती परतावा? जाणून घ्या नेमकं गणित
म्युच्यूअल फंडमध्ये 5000 रुपयांची एसआयपी केल्यास 10 वर्षात किती रिटर्न मिळणार, जाणून घ्या नेमकं गणित
नाशिकच्या आयुक्तपदी राहुल कर्डिलेंच्या नियुक्तीला ब्रेक, देवाभाऊंच्या 'टीम'चा बडा मंत्री नाराज,  सिंहस्थासाठी मर्जीतील अधिकाऱ्याची फिल्डिंग
नाशिकच्या आयुक्तपदी राहुल कर्डिलेंच्या नियुक्तीला ब्रेक, देवाभाऊंच्या 'टीम'चा बडा मंत्री नाराज, सिंहस्थासाठी मर्जीतील अधिकाऱ्याची फिल्डिंग
Supriya Sule on EVM: काँग्रेस अन् ठाकरे गटाकडून कंठ फुटेपर्यंत आरडाओरड पण सुप्रिया सुळे म्हणतात, ईव्हीएमला दोष देता येणार नाही
काँग्रेस अन् ठाकरे गटाकडून ईव्हीएमवरुन कंठ फुटेपर्यंत आरडाओरड पण सुप्रिया सुळे म्हणतात....
Virat Kohli for Sam Konstas : विराट कोहलीवर लागणार बॅन? 19 वर्षाच्या पोरांसोबत भर मैदानात भिडला, काय सांगतो ICC चा नियम?
विराट कोहलीवर लागणार बॅन? 19 वर्षाच्या पोरांसोबत भर मैदानात भिडला, काय सांगतो ICC चा नियम?
Agri Stack :
राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार युनिक फार्मर आयडी,"ॲग्रीस्टॅक" योजनेद्वारे गाव नोंदणी अभियान सुरु
Manikrao Kokate : 28 वर्ष वनवास भोगला, मी कुणालाही अंगावर घेतो, पण दादांनी एक फोन केला अन्...; माणिकराव कोकाटेंची जोरदार फटकेबाजी
28 वर्ष वनवास भोगला, मी कुणालाही अंगावर घेतो, पण दादांनी एक फोन केला अन्...; माणिकराव कोकाटेंची जोरदार फटकेबाजी
Swamitva Yojana : प्रत्येक गावकऱ्याला प्रॉपर्टी कार्ड, स्वामित्व योजनेचा शुभारंभ होणार, नरेंद्र मोदींचं देशाला संबोधन, बावनकुळेंची माहिती
प्रत्येक गावकऱ्याला प्रॉपर्टी कार्ड, स्वामित्व योजनेचा शुभारंभ होणार, नरेंद्र मोदींचं देशाला संबोधन, बावनकुळेंची माहिती
Sam Konstas vs Jasprit bumrah : अवघ्या 19 वर्षांच्या सॅम कॉन्स्टासने बुमराहच्या भीतीचं सावट झटक्यात नाहीसं केलं, एका षटकात ठोकल्या सर्वाधिक धावा
अवघ्या 19 वर्षांच्या सॅम कॉन्स्टासने बुमराहच्या भीतीचं सावट झटक्यात नाहीसं केलं, एका षटकात ठोकल्या सर्वाधिक धावा
Embed widget