एक्स्प्लोर
Sam Konstas vs Jasprit bumrah : अवघ्या 19 वर्षांच्या सॅम कॉन्स्टासने बुमराहच्या भीतीचं सावट झटक्यात नाहीसं केलं, एका षटकात ठोकल्या सर्वाधिक धावा
मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीला सुरुवात झाली आहे.
Sam Konstas vs Jasprit bumrah
1/6

मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीला सुरुवात झाली आहे. या सामन्यात पॅट कमिन्सने 19 वर्षीय युवा सलामीवीर सॅम कॉन्स्टासला मैदानात उतरवले. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने बॅटने कहर केला. या मालिकेतील सर्वात यशस्वी गोलंदाज जसप्रीत बुमराहचा सॅम कॉन्स्टासने चांगलाच समाचार घेतला.
2/6

सॅम कॉन्स्टासने बुमराहच्या एकाच षटकात 18 धावा काढल्या, जे बुमराहच्या कसोटी कारकिर्दीतील आतापर्यंतचे सर्वात महागडे षटक आहे. एवढेच नाही तर त्याने बुमराहविरुद्ध दोन षटकारही ठोकले. कसोटी क्रिकेटमध्ये बुमराहला षटकार मारणारा तो फक्त सातवा आणि दोन षटकार मारणारा दुसरा खेळाडू आहे.
Published at : 26 Dec 2024 08:23 AM (IST)
आणखी पाहा























