एक्स्प्लोर

Swamitva Yojana : प्रत्येक गावकऱ्याला प्रॉपर्टी कार्ड, स्वामित्व योजनेचा शुभारंभ होणार, नरेंद्र मोदींचं देशाला संबोधन, बावनकुळेंची माहिती

Swamitva Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या स्वामित्व योजनेचा शुभारंभ करणार आहेत. महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरु होणार आहे.

नागपूर : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी  27 डिसेंबरला स्वामित्व योजनेचा शुभारंभ करणार असल्याची माहिती दिली. देशातील सर्व जिल्ह्यात डिजीटल पद्धतीनं जिल्हाधिकारी ठरवतील त्या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीनं हा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्राचे सर्व मंत्री, देशातील सर्व मंत्री त्या त्या जिल्ह्यात स्वामित्व योजनेची सुरुवात करणार आहेत. नरेंद्र मोदी 12.30 वाजता स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना संबोधित करतील, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. 

महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यात योजना सुरु होणार

स्वामित्व योजना म्हणजे खरंतर आपण बघितलं की ग्रामीण महाराष्ट्रात राहणारे लोक आहोत. जमिनीवरुन वाद विवाद, मालकी हक्कावरुन वादविवाद, नागरिकांना त्यांच्या मालकीच्या घराचे पट्टे नसल्यानं, प्रॉपर्टी कार्ड नसल्यानं कळत नकळत कुणीही कब्जा करतं. वडिलोपार्जित शेकडो वर्षाची घरं, जमिनी त्याचं कार्ड प्रत्येक शेतकऱ्याकडे असलं पाहिजे यासाठी नरेंद्र मोदी यांनी विचार केला. आधुनिक युगात, आधुनिक डॉक्युमेंट मालकीचं असलं पाहिजे, यासाठी नरेंद्र मोदी यांनी ड्रोनच्या माध्यमातून महाराष्ट्राचं, देशाचं सर्वेक्षण करण्यात आलं. महराष्ट्राच्या जवळपास 30 जिल्ह्यात या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे.30515 गावं डिजीटलाईज होणार आहे. त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे, असं चंद्रशखेर बावनकुळे म्हणाले. 

गावपातळीवर नकाशे उपलब्ध करणे, गावठाणातील घराबद्दल स्पष्टता येणे, बांधकाम परवानगी देण्यासाठी प्रॉपर्टी कार्ड असल्यानं दुसऱ्या कागदपत्राची गरज नसणे. मालमत्ता कर लावण्यापासून, पुढच्या पिढीला डॉक्युमेंटेशन साठी फायदा होणार आहे. यात चार पाच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. गावकऱ्यांची आर्थिक पत वाढणार आहे. आज ज्या पद्धतीनं डिजीटल कार्ड मिळणार आहे,त्यामाध्यमातून शेतकऱ्याची आर्थिक पत उंचावणार आहे. गृहकर्ज घेण्यासाठी डॉक्युमेंट मिळेल. केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजना घेण्यासाठी डॉक्युमेंट मिळेल. एखादी योजना आली तर शेतीच पैसे, पीक नुकसान भरपाई असेल तर आधार सीडिंग करतो. व्यवसाय करण्यासाठी प्रॉपर्टी कार्डचा फायदा होणार आहे. स्वंयपूर्ण रोजगार, स्वंयपूर्ण गावठाण निर्माण होणार आहे,असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.  आदिवासी भागात देखील स्वामित्व योजनेद्वारे दिलं जाणारं प्रॉपर्टी कार्ड महत्त्वाचं ठरणार असल्याचं बावनकुळे म्हणाले. 

स्वामित्व योजनेतून ग्रामीण महाराष्ट्राला मजबुती देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नरेंद्र मोदी यांचं महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीनं आभार मानतो. जनतेला जनतेचे हक्क मिळवून देण्याचा उपक्रम नरेंद्र मोदी यांनी हाती घेतल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus 4th Test : रोहित शर्माने काळजावर दगड ठेवून घेतला मोठा निर्णय; मेलबर्न कसोटीतून शुभमन गिल OUT, जाणून घ्या टीम इंडियाची प्लेइंग-11
रोहित शर्माने काळजावर दगड ठेवून घेतला मोठा निर्णय; मेलबर्न कसोटीतून शुभमन गिल OUT, जाणून घ्या टीम इंडियाची प्लेइंग-11
EPFO : ऑक्टोबर महिन्यात इपीएफओचे 13.41 लाख सबस्क्रायबर्स वाढले, कोणतं राज्य सर्वात पुढं?आकडेवारी समोर
ऑक्टोबरमध्ये इपीएफओचे 13.41 लाख सबस्क्रायबर्स  वाढले, महिलांच्या संख्येतही लक्षणीय वाढ
Gadchiroli : नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
Kalyan crime: कल्याणमध्ये 12 वर्षांच्या मुलीवर अत्याचार, देवेंद्र फडणवीसांना आयुक्तांना फोन करुन आदेश सोडला, म्हणाले...
कल्याणमध्ये 12 वर्षांच्या मुलीवर अत्याचार, देवेंद्र फडणवीसांना आयुक्तांना फोन करुन आदेश सोडला, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 26 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :26 डिसेंबर 2024 : ABP MajhaBeed Crime Special Report : गन कल्चर मुक्त बीड कधी होणार? हजारो जणांना शस्त्र परवाने कशासाठी ?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 26 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus 4th Test : रोहित शर्माने काळजावर दगड ठेवून घेतला मोठा निर्णय; मेलबर्न कसोटीतून शुभमन गिल OUT, जाणून घ्या टीम इंडियाची प्लेइंग-11
रोहित शर्माने काळजावर दगड ठेवून घेतला मोठा निर्णय; मेलबर्न कसोटीतून शुभमन गिल OUT, जाणून घ्या टीम इंडियाची प्लेइंग-11
EPFO : ऑक्टोबर महिन्यात इपीएफओचे 13.41 लाख सबस्क्रायबर्स वाढले, कोणतं राज्य सर्वात पुढं?आकडेवारी समोर
ऑक्टोबरमध्ये इपीएफओचे 13.41 लाख सबस्क्रायबर्स  वाढले, महिलांच्या संख्येतही लक्षणीय वाढ
Gadchiroli : नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
Kalyan crime: कल्याणमध्ये 12 वर्षांच्या मुलीवर अत्याचार, देवेंद्र फडणवीसांना आयुक्तांना फोन करुन आदेश सोडला, म्हणाले...
कल्याणमध्ये 12 वर्षांच्या मुलीवर अत्याचार, देवेंद्र फडणवीसांना आयुक्तांना फोन करुन आदेश सोडला, म्हणाले...
Devendra Fadnavis: राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
Yearly Horoscope 2025 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी 2025 वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
Yearly Horoscope 2025 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
Embed widget