एक्स्प्लोर

शरद पवार विधानसभेच्या दारुण पराभवानंतर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, थोडीथोडकी नव्हे तर सगळी भाकरी फिरवणार, नेमकं काय घडणार?

Maharashtra Political News: विधानसभेच्या दारुण पराभवानंतर शरद पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; पदाधिकारी अन् नेत्यांना मुंबईत बोलावलं

मुंबई: विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्य पिंजून काढल्यानंतरही दारुण पराभव पदरी पडलेले राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) अवघ्या 10 जागांवर विजय मिळाला होता. शरद पवार यांचा पश्चिम महाराष्ट्रातील झंझावाती प्रचार चर्चेचा विषय ठरला होता. मात्र, प्रत्यक्ष निकाल समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता. या पार्श्वभूमीवर आता शरद पवार (Sharad Pawar) आगामी काळाच्यादृष्टीने पक्षात काही बदल करणार आहेत. शरद पवार हे येत्या काही दिवसांमध्ये 'भाकरी' फिरवणार आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहणार आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात बदलाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहेत. शरद पवार हे या खेपेला थोडीथोडकी नव्हे तर संपूर्ण भाकरी फिरवणार असल्याची माहिती आहे. त्यानुसार पक्षातील युवक अध्यक्ष, युवती अध्यक्ष, विद्यार्थी अध्यक्ष, महिला प्रदेशाध्यक्ष यासह विविध सेलचे प्रमुख बदलले जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 8 आणि 9 जानेवारीला मुंबईत जंबो बैठक आयोजित करण्यात आली आहे. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणाऱ्या बैठकीला शरद पवार स्वत: उपस्थित राहणार आहेत. 8 जानेवारीला  सर्व सेल, आमदार, खासदार आणि विभागाच्या प्रमुखांची बैठक असेल. तर 9 जानेवारी रोजी शरद पवार हे आमदार, खासदार, माजी आमदार आणि जिल्हाध्यक्षांसोबत चर्चा करणार आहेत. या दोन दिवसीय बैठकीत शरद पवार सर्वांची पक्षांतर्गत बदलाबाबत मतं जाणून घेणार आणि त्यानंतर विविध पदांवरील प्रमुख बदलण्यात येतील.

जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष राहणार की पायउतार होणार?

शरद पवार यांनी भाकरी फिरवल्यास जयंत पाटील यांचं प्रदेशाध्यक्षपद कायम राहणार की नाही, याची चर्चा सुरु झाली आहे. प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत देखील चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, पक्षातील एका गटाला जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष म्हणून हवे आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांचं प्रदेशाध्यक्षपद कायम राहण्याची दाट शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. ते दिल्लीत पंतप्रधान मोदी यांना भेटणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबईत उद्धव ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि नेत्यांची भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे.

आणखी वाचा

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, रामदास कदमांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल
तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, रामदास कदमांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
सत्तरीनंतर निवृत्तीची शाल पांघरली पाहिजे असं मोहन भागवतांनी सांगितलं होतं, पण मोदींनी सत्तरी ओलांडली तरी... अंधारेंचा टोला
सत्तरीनंतर निवृत्तीची शाल पांघरली पाहिजे असं मोहन भागवतांनी सांगितलं होतं, पण मोदींनी सत्तरी ओलांडली तरी... अंधारेंचा टोला
उद्धव ठाकरे म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना, शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्केंचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांचा न्यायालयावर अविश्वास 
उद्धव ठाकरे म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना, शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्केंचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांचा न्यायालयावर अविश्वास 

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Embed widget