Ind vs Aus 4th Test : रोहित शर्माने काळजावर दगड ठेवून घेतला मोठा निर्णय; मेलबर्न कसोटीतून शुभमन गिल OUT, जाणून घ्या टीम इंडियाची प्लेइंग-11
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 साठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे.
IND vs AUS 4th Melbourne Test : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 साठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना आजपासून (26 डिसेंबर) एमसीजी, मेलबर्न येथे खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सॅम कोन्स्टास आणि स्कॉट बोलंड यांना प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली. तर भारताने शुभमन गिलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली आहे.
🚨 Toss 🚨#TeamIndia have been put in to bowl first in the 4th #AUSvIND test
— BCCI (@BCCI) December 25, 2024
Updates ▶️ https://t.co/njfhCncRdL pic.twitter.com/VnK0J23j3A
वॉशिंग्टनला संधी का मिळाली?
मेलबर्नच्या मैदानावर सहसा फिरकीपटूंना मदत मिळते. चौथ्या आणि पाचव्या दिवशी या खेळपट्टीवर फिरकीपटू खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे टीम इंडियाने दोन फिरकीपटूंसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ आता रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर भारतीय संघात एकत्र दिसणार आहेत. सुंदरने अलीकडच्या काळात चमकदार कामगिरी केली आहे.
सुंदरने आतापर्यंत 7 कसोटी सामन्यात 23.91 च्या सरासरीने 24 बळी घेतले आहेत. फलंदाजीसह त्याने 48.37 च्या उत्कृष्ट सरासरीने 387 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश आहे. यजमान ऑस्ट्रेलियाने प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. 19 वर्षीय युवा सलामीवीर सॅम कोन्स्टास नॅथन मॅकस्विनीच्या जागी पदार्पण करेल, तर स्कॉट बोलँड जखमी जोश हेझलवूडच्या जागी खेळणार आहे.
Your Playing XI 🙌
— BCCI (@BCCI) December 25, 2024
Updates ▶️ https://t.co/njfhCncRdL#TeamIndia | #AUSvIND pic.twitter.com/7sXe0ohNhy
या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडियाने पर्थमध्ये खेळलेला पहिला सामना 295 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती, मात्र ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियन संघाने शानदार पुनरागमन करत 10 गडी राखून विजय मिळवला. गब्बा येथे झालेली शेवटची तिसरी कसोटी अनिर्णित राहिली, त्यामुळे ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे.
मेलबर्न कसोटीसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग-11
टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, आकाशदीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया - पॅट कमिन्स (कर्णधार), उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.