एक्स्प्लोर

खदखद फेम कराळे मास्तर निवडणुकीच्या मैदानात? शरद पवारांची भेट घेत व्यक्त केली इच्छा, मतदारसंघही ठरला!  

Nitesh Karale : सोशल मीडियातून स्टार बनलेले मास्तर म्हणजेच नितेश कराळे यांनी शरद पवारांची भेट घेत वर्धा आणि आर्वी या दोन विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी आपली इच्छा व्यक्त केली होती.

Nitesh Karale Meets Sharad Pawar : सोशल मीडियातून स्टार बनलेले मास्तर म्हणजेच नितेश कराळे (Nitesh Karale) यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना वर्धा लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी कराळे मास्तरांनी भेटीवर भेट घेत आपली इच्छा व्यक्त केली होती. मात्र, गेल्या लोकसभेत नितेश कराळे (Nitesh Karale) यांच्या एवजी अमर काळेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आणि त्यांनी लोकसभेत एकहाती विजयही मिळवला.

त्यामुळे लोकसभेसाठीची उमेदवारी हुकल्यानंतर वर्धा आणि आर्वी या दोन मतदारसंघातून निवडणुक लढण्यासाठी कराळे मास्तरांनी पुन्हा शरद पवारांकडे गळ घातली आहे. नुकतीच त्यांनी सिल्व्हर ओकवर जात शरद पवारांची भेट घेत आपली इच्छा बोलून दाखवल्याची चर्चा आहे. त्यामुळे कराळे मास्तरांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून यंदा तरी संधी दिली जाते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

शरद पवारांची भेट घेत व्यक्त केली इच्छा, मतदारसंघही ठरला!  

वर्धा आणि आर्वी या दोन विधानसभा मतदारसंघातून (Wardha Vidhan Sabha Constituency) महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या नितेश कराळे (Nitesh Karale) यांनी आज शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी शरद पवारांसोबत विधानसभा निवडणूकबाबत (Vidhan Sabha Election) चर्चा केली आहे. तसेच, त्यांच्या उमेदवारीचा अंतिम निर्णय आज किंवा उद्याच होणार असल्याचे कराळे म्हणाले आहेत. मी वर्धा आणि आर्वी या दोन मतदार संघातून इच्छा व्यक्त केली आहे. या मतदारसंघातून तीन वेळा काँग्रेस उमेदवार पडलेले आहे. ही जागा मिळाली तर त्या ठिकाणी आपण विजयी होऊ शकतो. असा विश्वास नितेश कराळे यांनी बोलताना व्यक्त केला आहे. या दोन्ही जागांवरून चर्चा सुरू असून आज किंवा उद्यापर्यंत या जागांचा प्रश्न सुटेल असेही ते यावेळी म्हणाले.

कोण आहेत कराळे मास्तर? 

पुण्यात एमपीएससीचा अभ्यास केलेले आणि त्यानंतरही अनेक परीक्षा देऊन बेरोजगार राहिलेल्या नितेश कराळे यांनी वर्ध्यात स्पर्धा परीक्षांबद्दल मार्गदर्शन करणारे क्लास सुरु केले होते. सुरुवातीला पुणेरी पॅटर्न असे नाव ठेवले. मात्र, कराळे सर आणि त्यांची खास वऱ्हाडी गावरान भाषेचा पुणेरी पॅटर्न या भारदस्त नावासोबत जुळला नाही. मग काय कराळे गुरुजींनी आपल्या भाषेतील खास गावरान शैलीलाच जमेची बाजू बनवून रंजक पद्धतीने शिकवायला सुरुवात केली. सुरुवातीला वर्गापुरतं मर्यादित राहिलेली त्यांची शिकवणुकीची शैली कोरोनामुळे ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून सामान्यांपर्यंत पोहोचली. त्यांचे व्हिडीओ वायरल होऊ लागले आणि त्याना लाखोंनी व्युव्ज येऊ लागले. आपल्या त्याच प्रसिद्धीला आता निवडणुकीच्या मैदानात आजमावण्याचा आणि विदर्भातील तरुणाईच्या मनातील खद खद खऱ्या अर्थाने सरकार दरबारी पोहोचवण्याचे कराळे गुरुजी यांनी ठरविले आहे, त्यासाठीच निवडणुकीच्या मैदानात शड्डू ठोकल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा 
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजीABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget