एक्स्प्लोर

मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध

cabinet expansion: मंत्रीमंडळ विस्ताराआधी पक्षात मंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. पक्षातील नेत्यांनीच काही माजी मंत्र्यांना पुन्हा मंत्रीपद देऊ नये अशी मागणी केली आहे.

मुंबई: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं. तर माहाविकास आघाडीला मोठा फटका बसला. राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकारने आपली सत्ता स्थापन केली आहे. राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा देखील पार पडला. त्यानंतर आता राज्याचं लक्ष लागलं आहे ते मंत्रिमंडळाचा विस्ताराकडे. कोणत्या पक्षाला कोणतं मंत्रीपद मिळणार याकडे आमदारांसह राज्याचं लक्ष लागलं आहे. अशातच घडामोडींना वेग आला आहे. हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती आहे, त्या अनुषंगाने राज्यात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत, त्यासाठी महायुतीचे तिन्ही नेते आज दुपारी दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती आहे, तर दुसरीकडे पक्षात मंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली असून गुलाबराव पाटील, दीपक केसरकर यांच्यासह काही अन्य आमदारांना मंत्रिमंडळात स्थान नको असं म्हणत शिवसेनेच्यात आमदारांनी विरोध दर्शवला आहे. 

मंत्रिमंडळा विस्तार होणं अद्याप बाकी असून अनेक माजी मंत्र्यांचे एकनाथ शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष असताना आता पक्षातच मंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. शिंदेंच्या पक्षातील आमदारांकडूनच काही माजी मंत्र्यांना विरोध होताना पहायला मिळतोय. मंत्रिमंडळात काही माजी मंत्र्यांना स्थान देऊ नका अशी चर्चा आमदारांमध्ये रंगू लागली आहे. यामध्ये माजी मंत्री अब्दुल सत्तार, दिपक केसरकर, तानाजी सावंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड यांच्या नावाचा समावेश आहे. या नेत्यांकडे गेल्यावर कामचं होत नाही. हे नेते केवळ आश्वासनं देतात प्रत्यक्षात कामं होत नसल्याचा आरोप आमदार खासगीत करतात अशी माहिती आहे. तर माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावाला तर शिवसेना आमदारांपाठोपाठ भाजप आमदारांचाही विरोध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची मोदी, शाह यांच्यासोबत चर्चा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची काल(मंगळवारी) मेघदूत बंगल्यावर बैठक पार पडली. रात्री दिड वाजता जवळपास एक तास खातेवाटपासंदर्भात या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती आहे. या चर्चेतून अंतिम निर्णय झाला नसल्याचं बोललं जात आहे. महायुतीतील नेत्यांमध्ये चर्चेने देखील तिढा सुटत नसल्याने अखेर तिन्ही नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. आज (बुधवारी) दुपारी तिन्ही नेते दिल्लीत जाणार असल्याची माहिती आहे. ही भेट सद्धिच्छा भेट असणार आहे, असे सांगितले जात असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार आहे. त्यात विस्ताराचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवली जात आहे. 

मंत्रीमंडळाचा विस्तार अधिवेशनापूर्वी होईल - शिरसाट

मंत्री मंडळाचा विस्तार अधिवेशनापूर्वी होईल विरोधकांनी चिंता करायची गरज नाही. महायुतीतील तिन्ही नेते दिल्लीला जातील त्या नंतर निर्णय होतील. आमदारांच्या तक्रारी एकनाथ शिंदेंच्या कानावर गेल्या असतील, कोणाला काढावं कोणाला ठेवावं यााबाबत शिंदे निर्णय घेतील. आम्ही त्यावर बोलणं उचीत ठरणार नाही. जयंत पाटील यांना माहित नाही का यापूर्वीच आम्ही शेतकऱ्यांची विज बिल माफ केली आहे. सौर उर्जा प्रकल्प सुरू केले आहेत. जयंत पाटलांनी सहकार्य करावं फक्त...नाना पटोले जे आरोप करतात तसं काही होणार नाही. भारत हा लोकशाही माणणारा देश आहे. लोकशाहीवर आघात होईल असं कुठलही पाऊल उचललं जाणार नाही. ज्यांनी करण्याचा प्रयत्न केला तो पक्ष नेस्तनाबूत होईल. मंत्रीमंडळ होईल त्याच्या स्वागताला संजय राऊतांना बोलवू हवं तर... मंत्री मंडळाच्या विस्तारात अनेक जणं लाॅबिंग करतात, तिघेही योग्य निर्णय घेतील. या मंत्रीमंडळात तिन्ही पक्षात नवीन चेहरे दिसतील असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे.

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
Embed widget