एक्स्प्लोर

BJP operation Lotus: देवेंद्र फडणवीसांची आणि खासदार बाळ्यामामांची सागर बंगल्यावरील ती भेट ऑपरेशन लोटसची सुरुवात? शरद पवारांचा उरलासुरला पक्ष धोक्यात

Sharad Pawar NCP BJP Operation Lotus: शरद पवारांच्या पक्षाचे काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. सागर बंगल्यावरची भेट ठरली आरंभबिंदू?

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपकडून राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस राबवण्यात येणार असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या मोहीमेतंर्गत शरद पवार गटाचे काही खासदार फोडले जाऊ शकतात, अशी खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे एकूण 8 खासदार निवडून आले होते. यापैकी पाच ते सहा खासदारांना गळाला लावून मविआला झटका देण्याचा भाजपचा प्लॅन असल्याचे सांगितले जाते. शरद पवार गटातील या खासदारांना राजीनामा द्यायला लावून महाराष्ट्रातील पाच ते सहा मतदारसंघात पोटनिवडणूक घेतली जाऊ शकते.  या आमदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आणून भाजपप्रणित एनडीए आघाडीची ताकद वाढण्याचा भाजपचा प्लॅन असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्यात भाजपचे ऑपरेशन लोटस नेमके कधी सुरु झाले, याविषयी चर्चेचा सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सागर बंगल्यावर झालेली देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामा यांची भेट हा ऑपरेशन लोटसचा आरंभबिंदू होता का, याविषयी आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपला प्रचंड बहुमत मिळाल्याचे स्पष्ट झाले होते. निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर अनेक नेत्यांची रीघ लागली होती. मात्र, 2 डिसेंबरला शरद पवार गटाचे भिवंडी मतदारसंघातील खासदार बाळ्यामामा अचानक सागर बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीला पोहोचल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांच्याशी काहीवेळ चर्चा करुन खासदार सुरेश म्हात्रे सागर बंगल्यावरुन बाहेर पडले होते. मात्र, बाळ्यामामा यांनी ही राजकीय भेट नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. आम्ही एकमेकांना भेटलो म्हणजे प्रत्येकवेळी त्यामागे राजकारण असतंच असं नाही, असे बाळ्यामामा यांनी म्हटले होते. मात्र, आता राज्यात ऑपरेशन लोटस सुरु झाल्याची चर्चा नव्याने सुरु झाली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि बाळ्यामामा यांची भेटही चर्चेत आली आहे.

भाजपने खरोखरच ऑपरेशन लोटस राबवायचे ठरवल्यास लोकसभेला निवडून आलेले शरद पवार गटाचे किती खासदार भाजपसोबत जातील, याविषयी राजकीय वर्तुळात अंदाज लावले जात आहेत. मविआचे काही खासदार आमच्या संपर्कात असल्याच्या वृत्ताला भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी दुजोरा दिला. शरद पवार साहेबांचे खासदार जिथं आहेत तिथं महायुतीचे आमदार निवडून आले आहेत. त्याचबरोबर विकास हाही त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. जर आपलं राजकीय भविष्य नीट व्हावं असं त्यांना वाटत असेल, असे सूचक वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केले.

आणखी वाचा

राज्यात भाजप ऑपरेशन लोटस राबवण्याच्या तयारीत, मविआचे खासदार फुटणार? संजय राऊत म्हणाले....

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
NCPSP : लोकसभेला 80 टक्के स्ट्राइक रेट, सुप्रिया सुळे ते अमर काळे,शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांची यादी एका क्लिकवर
सुप्रिया सुळे ते अमर काळे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांची यादी एका क्लिकवर
BJP operation Lotus: देवेंद्र फडणवीसांची आणि खासदार बाळ्यामामांची सागर बंगल्यावरील ती भेट ऑपरेशन लोटसची सुरुवात? शरद पवारांचा उरलासुरला पक्ष धोक्यात
सागर बंगल्यावरची 'ती' भेट ऑपरेशन लोटसची सुरुवात होती का? शरद पवारांचा उरलासुरला पक्ष धोक्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule PC : आम्हाला ऑपरेशन लोटसची गरज नाही- चंद्रशेखर बावनकुळेABP Majha Headlines :  12 PM :  11 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :  11 डिसेंबर 2024:  ABP MajhaMission Lotus : भाजपकडून महाराष्ट्रात मिशन लोटस राबवलं जाणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
NCPSP : लोकसभेला 80 टक्के स्ट्राइक रेट, सुप्रिया सुळे ते अमर काळे,शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांची यादी एका क्लिकवर
सुप्रिया सुळे ते अमर काळे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांची यादी एका क्लिकवर
BJP operation Lotus: देवेंद्र फडणवीसांची आणि खासदार बाळ्यामामांची सागर बंगल्यावरील ती भेट ऑपरेशन लोटसची सुरुवात? शरद पवारांचा उरलासुरला पक्ष धोक्यात
सागर बंगल्यावरची 'ती' भेट ऑपरेशन लोटसची सुरुवात होती का? शरद पवारांचा उरलासुरला पक्ष धोक्यात
Satish Wagh Case: आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या अपहरण अन् हत्या प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी...
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या अपहरण अन् हत्या प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी...
पंढरपूर ओव्हरपॅक, विठ्ठलाच्या पदस्पर्शासाठी भाविकांना 5-6 तासांची प्रतीक्षा,मुखदर्शनासाठीही भलीमोठी रांग
पंढरपूर ओव्हरपॅक, विठ्ठलाच्या पदस्पर्शासाठी भाविकांना 5-6 तासांची प्रतीक्षा,मुखदर्शनासाठीही भलीमोठी रांग
Mahayuti Cabinet Expansion: मोठी बातमी: खातेवाटपाचा निर्णय आता दिल्लीतच? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार दिल्लीला जाणार
मोठी बातमी: खातेवाटपाचा निर्णय आता दिल्लीतच? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार दिल्लीला जाणार
Sanjay Raut: राज्यात भाजप ऑपरेशन लोटस राबवण्याच्या तयारीत, मविआचे खासदार फुटणार? संजय राऊत म्हणाले....
राज्यात भाजप ऑपरेशन लोटस राबवण्याच्या तयारीत, मविआचे खासदार फुटणार? संजय राऊत म्हणाले....
Embed widget