Chandrashekhar Bawankule PC : आम्हाला ऑपरेशन लोटसची गरज नाही- चंद्रशेखर बावनकुळे
Chandrashekhar Bawankule PC : आम्हाला ऑपरेशन लोटसची गरज नाही- चंद्रशेखर बावनकुळे
भाजप महाविकास आघाडीला लवकरच धक्का देण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे काही खासदार संपर्कात असल्याचा भाजपचा दावा आहे. काही खासदार राजीनामा देण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मविआच्या खासदारांमध्ये चलबिचल असल्याच्या चर्चा आहेत. मविआचे खासदार भाजप आणि इतर पक्षांच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार संपर्कात असल्याची माहिती भाजपच्या गोटातून समोर आली आहे.
राजीनामा देऊन पोटनिवडणुकीला सामोरं जाण्यासंदर्भात चर्चा पाहायला मिळत आहेत. लोकसभेला महाराष्ट्रात भाजपला यश मिळालं नव्हतं. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मिशल लोटस राबवलं जाणार असल्याच्या चर्चा आहेत.