K P Patil meet Sanjay Raut: के.पी. पाटील संजय राऊतांच्या भेटीला, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा; म्हणाले, 'संघातून इच्छुक...'
K P Patil meet Sanjay Raut: भांडूप येथील संजय राऊत यांच्या घरी ते भेटीसाठी आले होते, राधानगरी मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जाणार असल्याने भेटीसाठी आल्याची माहिती आहे.
K P Patil meet Sanjay Raut: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. अनेक इच्छुक नेते संभाव्य उमेदवारी मिळण्याची शक्यता असलेल्या नेत्यांच्या, पक्ष श्रेष्ठींच्या घाठीभेटी घेत आहेत. अशातच कोल्हापूरच्या राधानगरीचे अजित पवार गटाचे माजी आमदार के.पी.पाटील संजय राऊत यांच्या भेटीला दाखल झाले. भांडूप येथील संजय राऊत यांच्या घरी ते भेटीसाठी आले होते, राधानगरी मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जाणार असल्याने भेटीसाठी आल्याची माहिती आहे.
के.पी.पाटील संजय राऊत यांच्या भेटीने चर्चांना उधाण आलं आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारीची शाश्वती मिळाल्यास के पी पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार का अशा चर्चांना जोर आला आहे, तर संजय राऊत यांच्या भेटीनंतर माध्यमांना के.पी.पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या मतदारसंघात प्रकाश आबिटकर हे आमदार असून सध्या ते शिंदे गटात आहेत. संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर के.पी.पाटील यांनी प्रतिक्रिया देत मी राधानगरी मतदार संघातून इच्छुक आहे, या संदर्भात चर्चा झाली, मतदारसंघातील माहिती आणि आढावा संजय राऊत यांनी यावेळी घेतला, तसंच माझा विजय पक्का असं के पी पाटील म्हणाले आहेत.
राधानगरी मतदारसंघ हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जाईल की शिवसेना ठाकरे गटाला हे अद्याप निश्चित झालेलं नाही. जागावाटपाचा तिढा सुटल्यानंतर ते स्पष्ट होईल, मात्र उमेदवारीसाठी के.पी.पाटील सध्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. राधानगरी मतदारसंघातून के.पी.पाटील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.