Neelam Gorhe on Ambadas Danve : हात खाली करा, कोणी हात वर केला की मला भिती वाटू लागलीये; निलम गोऱ्हेंच्या अंबादास दानवेंना सूचना
Neelam Gorhe on Ambadas Danve, Mumbai : काही दिवसांपूर्वी विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी हात करत भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवागाळ केली होती.
Neelam Gorhe on Ambadas Danve, Mumbai : काही दिवसांपूर्वी विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी हात करत भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवागाळ केली होती. त्यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी अंबादास दानवेंचे 5 दिवसांसाठी निलंबन केले होते. दरम्यान, आज अंबादास दानवे बोलण्यासाठी उभारले असता त्यांनी हात वर केला. त्यानंतर "हात खाली करा, कोणी हात वर केला की मला भिती वाटू लागलीये", असा सूचना निलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.
अंबादास दानवे काय काय म्हणाले?
अंबादास दानवे म्हणाले, नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील शेतकऱ्यांची वित्तीय वर्ष 2022-23 या वर्षातील अतिवृष्टी मदत अधिकाऱ्यांनीच खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार घडला, ही तक्रार माझ्याकडे आली आहे. अतिवृष्टीसाठी 13 हेक्टर 600 रुपये मदत सरकारने जाहीर केली होती. अधिकाऱ्यांनी खासरावर शेतकऱ्यांच नाव आणि 7/12 वर नाव बदलून बोगस नाव टाकली. बोगस नावाने अनुदान लाटणारे हे अधिकारी आहेत. शेतकऱ्यांच अनुदान लाटण्याचा पाप अधिकाऱ्यांनी केलं. कुंपणच शेत खात असेल तर दुर्देव आहे, त्यामुळे यावर कारवाई करून चर्चा करण्याची मागणी अंबादास दानवे यांनी सभागृहात केली.
दौलताबादमधील भारत मातेची पूजा अर्चा करण्यावर घातलेली बंदी उठवावी
पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, देवगिरी किल्ल्याच्या सुरुवातीच्या भागात भारत मातेचा मंदिर आहे. दौलताबाद गावातील पुजारी यांनी तंबाखू खाऊन घाण केल्याने तिथे पूजा अर्चा करण्यावर बंदी घातली आहे. भारत मातेचा मंदिर, संत जनार्दन स्वामींची समाधी व गणेश मंदिर तिथे आहे. तेथे हजारो पर्यटक व भाविकगण, दिंड्या येत असतात. त्यामुळे पुरातत्व विभागाने तेथे पूजा अर्चा करण्यावर घातलेली बंदी उठवावी, अशी मागणी आज सभागृहात लावून धरली. त्याभागात कोणतीही बंदी घातली नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.
देवगिरी किल्ल्यातील भारतमातेच्या मंदिराची, गणरायाची आणि जनार्दन स्वामींची पूजा किल्ला एएसायकडे येण्यापूर्वीही सुरू होती. या पूजेवर बंदी अजिबात सहन केली जाणार नाही. हा विषय आज सभागृहात मांडला. देवगिरी किल्ल्याच्या सुरुवातीच्या भागात भारत मातेचा मंदिर आहे.दौलताबाद गावातील पुजारी… pic.twitter.com/EVTMt41265
— Ambadas Danve (@iambadasdanve) July 5, 2024
देवगिरी किल्ल्यातील भारतमातेच्या मंदिराची, गणरायाची आणि जनार्दन स्वामींची पूजा किल्ला एएसायकडे येण्यापूर्वीही सुरू होती. या पूजेवर बंदी अजिबात सहन केली जाणार नाही. हा विषय आज सभागृहात मांडला. देवगिरी किल्ल्याच्या सुरुवातीच्या भागात भारत मातेचा मंदिर आहे.दौलताबाद गावातील पुजारी… pic.twitter.com/EVTMt41265
— Ambadas Danve (@iambadasdanve) July 5, 2024
इतर महत्वाच्या बातम्या