एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी मनातली सगळी खदखद बाहेर काढली; अजित पवार-प्रफुल पटेलांना खडे बोल सुनावले, म्हणाले....

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांनी लोकसभा आणि राज्यसभेला संधी नाकारल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. प्रफुल पटेल यांच्यावरही निशाणा साधला, अजित पवारांना खडे बोल सुनावले

नाशिक: मला मंत्रिपद मिळाले की नाही, हा प्रश्न नाही. ज्याप्रकारे माझी अवहेलना करण्यात आली, त्याबद्दल मी नाराज आहे. पक्षश्रेष्ठींना मी त्यांच्या हातामधील लहान खेळणं वाटतो का? ते सांगतील तेव्हा बसायचं, त्यांनी सांगितल्यावर उठायचं, ते म्हणाले की निवडणूक लढवायची, असा परखड सवाल विचारत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अजित पवार आणि प्रुफल पटेल यांना अप्रत्यक्षपणे खडे बोल सुनावले. ते मंगळवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी छगन भुजबळ यांनी मंत्रि‍पदापेक्षा पक्षातील नेत्यांकडून देण्यात आलेल्या वागणुकीविषयी नाराजी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीला मला नाशिकमधून उभं राहायला सांगण्यात आले होते. नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे तु्म्ही लढावे, यासाठी आग्रही असल्याचे मला सांगण्यात आले. मी त्यासाठी पूर्ण तयारीही केली होती, तेव्हा चांगले वातावरणही तयार झाले होते. मात्र, ऐनवेळी आमच्या नेत्यांनी कच खाल्ली आणि माझे नाव घोषित केले नाही. त्यामुळे मी स्वत:च लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली. त्यानंतर मी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा सुनेत्रा पवार आणि नितीन पाटील यांना राज्यसभेवर संधी द्यायची आहे, असे सांगण्यात आले. तेव्हादेखील मी शांत बसतो. मी तेव्हा सांगितलं होतं की, राज्यसभेत माझ्या अनुभवाचा फायदा होईल. पण तेव्हा मला सांगण्यात आलं, तुम्ही महाराष्ट्रात असणं गरजेचे आहे.  मात्र, आता विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर आणि जिंकल्यानंतर मला राज्यसभेवर जायला सांगितले जात आहे. त्यासाठी आता नितीन पाटील यांना राजीनामा द्यायला लावला जाईल. पण मी मागत होतो तेव्हा मला संधी देण्यात आली नाही, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली. 

पण आता मी निवडणूक लढलो आहे. आता कुठे निवडणूक संपली आहे. मला माझ्या मतदारसंघातील प्रश्न सोडवायचे आहेत. निवडणुकीत माझ्यासाठी माझ्या लोकांनी जवा काढला. मी त्यांना काय सांगू? मी आता लगेच राजीनामा देऊ शकत नाही. राज्यसभेवर जायचे असल्यास मला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे मी एक-दोन वर्षे थांबा, मी मतदारसंघात सगळं स्थिरस्थावर करुन राज्यसभेवर जातो, असे सांगितले होते. त्यानंतर आमचे नेते म्हणाले, यावर चर्चा करु, पण ते कधी चर्चेला बसले नाहीत, अशा थेट आरोप छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावर केला. 

देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात माझ्या समावेशासाठी आग्रही होते: छगन भुजबळ 

यावेळी छगन भुजबळ यांनी एक गौप्यस्फोट केला. मला जे काही कळालं, त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझा मंत्रिमंडळात प्रवेश व्हावा, यासाठी आग्रही होते. मी या माहितीची खात्री करुन घेतली आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे आपल्या पक्षात कोणाला मंत्रिपद द्यायचे, याचा निर्णय घेतात. कोणी कितीही सांगितलं तरी मंत्रिपदाचा निर्णय पक्षप्रमुखांनी घ्यायचा असतो. आता मला कोणाच्या सांगण्यावरुन मंत्रीपद नाकारण्यात आले, हे शोधावे लागेल, असे छगन भुजबळ यांनी म्हटले. 

आणखी वाचा

मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Maharashtra Budget 2026: शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी तकलादू, सरकारने पुन्हा विश्वासघात केलाय; मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर राजू शेट्टींचा हल्लाबोल
शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी तकलादू, सरकारने पुन्हा विश्वासघात केलाय; मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर राजू शेट्टींचा हल्लाबोल
Maharashtra Budget 2026: रामकाल पथ विकास प्रकल्प ते ओझर विमानतळाचा विस्तार, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना अर्थसंकल्पातून काय मिळालं? जाणून घ्या
रामकाल पथ विकास प्रकल्प ते ओझर विमानतळाचा विस्तार, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना अर्थसंकल्पातून काय मिळालं? जाणून घ्या
Uddhav Thackeray And Eknath Shinde Vidhabhavan Video: उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना खांदा लागता लागता राहिला, विधानभवनात काय घडलं?
ठाकरे आणि शिंदे आमनेसामने; एकमेकांना खांदा लागता लागता राहिला, विधानभवनात काय घडलं?, VIDEO

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget