Narhari Zirwal : 'मी आधी आदिवासी नंतर विधानसभा उपाध्यक्ष', मंत्रालयाच्या जाळीवर उडी घेतल्यानंतर नरहरी झिरवाळ भावनिक, अश्रू अनावर
Narhari Zirwal : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह आदिवासी आमदारांनी आदिवासी आमदारांनी थेट मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या घेतल्या. यामुळे मंत्रालयात मोठा गदारोळ उडाला होता.
मुंबई : धनगर आणि धनगर एकच असल्याचा जीआर राज्य सरकारने काढला आहे. धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, यासाठी आदिवासी आमदारांकडून विरोधक केला जात आहे. तसेच गेल्या 15 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांकडून पेसाभरती अंतर्गत भरतीच्या आंदोलक करत आहेत. मात्र यावर कुठलाही तोडगा निघत नसल्याचे आज आदिवासी आमदारांनी थेट मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या घेतल्या. यामुळे मंत्रालयात मोठी खळबळ उडाली होती. यानंतर एबीपी माझाशी बोलताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) भावनिक झाल्याचे दिसून आले.
मागील 15 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी पेसा कायद्याअंतर्गत भरती करा, या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सहा दिवसांपासून आम्ही वेळ मागत आहोत. मात्र, ते देखील आम्हाला भेट देत नाहीत. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यात याबाबत चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही तुमच्या विषयाबाबत सकारात्मक आहोत, असे आश्वासन झिरवाळ यांना दिले. मात्र कुठलाही निर्णय न झाल्याने आदिवासी आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारल्या.
नरहरी झिरवाळ यांना अश्रू अनावर
यानंतर नरहरी झिरवाळ म्हणाले की, आमच्या आदिवासी समाजाचे शंभराहून अधिक मुलांनी काही बरे वाईट करायला नको म्हणून माझी शासनाला विनंती आहे की, शासनाने तत्काळ तिथे जाऊन विद्यार्थ्यांना सुरक्षा द्यावी. आधी मी आदिवासी आहोत आणि नंतर विधानसभा उपाध्यक्ष झालो आहे. ज्या आदिवासी समाजाने आम्हाला निवडून दिले आहे. त्यांचे सण उत्सव सगळे इकडेच होत असतील तर आमचा काय उपयोग आहे? 14 दिवसांपासून आमचे मुले आंदोलन करत आहेत. एखाद्या नेत्याने तरी त्यांच्याकडे येऊन पाहिले का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. हे बोलताना नरहरी झिरवाळ यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.
असे कृत्य करणं त्यांना अशोभनीय : संजय शिरसाट
दरम्यान, नरहरी झिरवाळ यांच्या भूमिकेवर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले की, विधानसभा उपाध्यक्ष पदावर असणाऱ्या झिरवाळ यांनी असे कृत्य करणं त्यांना अशोभनीय आहे. त्यांच्या मागण्यांबाबत सरकार विचार करत आहे. त्यामुळे झालेला प्रकार अयोग्य आहे की योग्य याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नरहरी झिरवाळ यांना भेटू शकतात.चर्चेतून मार्ग निगतात, असे त्यांनी म्हटले.
संरक्षक जाळीवर उडी मारणारे नेते कोण?
- नरहरी झिरवाळ
- किरण लहामटे
- राजेश पाटील
- हेमंत सावरा
आणखी वाचा
हाच का 30 वर्षांतला विकास; माढ्यात डिजिटल झळकले, राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्य; अज्ञाताचा शोध सुरू