Narayan Rane : निकालाआधी धाकधूक वाटत नाही, उत्सुकता कशाला मी विजयी होणार, कार्यकर्त्यांनी रॅलीची तयारी केली; नारायण राणेंना कॉन्फिडन्स
Narayan Rane, सिंधुदुर्ग : मला उद्याच्या होणाऱ्या मतमोजणी आणि निकालाबाबत धाकधूक वाटत नाही. उत्सुकता कशाला वाटेल, मी विजयी होणार आहे.
Narayan Rane, सिंधुदुर्ग : "मला उद्याच्या होणाऱ्या मतमोजणी आणि निकालाबाबत धाकधूक वाटत नाही. उत्सुकता कशाला वाटेल, मी विजयी होणार आहे. मला विजयाची 100 टक्के खात्री आहे, कार्यकत्यांनी रॅलीची तयारी केली", अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri-Sindhudurg Loksabha) मतदारसंघातून विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे असल्याचं पक्षाकडून सांगतील
नारायण राणे म्हणाले, विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे असल्याचं पक्षाकडून सांगतील. बाकी कोणाचे कोण आहेत याची माहिती माझ्याजवळ नाही. एक्झिट पोलकडे मी पाहत नाही. गेली पाच पन्नास वर्ष राजकारणात घालवली, आमचे पण काही अंदाज आहेत, आम्ही पण निवडणूक लढवलीय. आम्ही निवडणूकीत नामधारी नाही तर सक्रिय होतो, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी येणाऱ्या एक्झिट पोलवर दिली आहे.
पुढे बोलताना राणे म्हणाले, काँगेसची सत्ता येत नसल्याने एक्झिट पोलच्या विश्लेषणात सहभागी होणार नाहीत. राहुल गांधी यांच्या निवडणुकीच्या भाषणात महिलांना एक लाख रुपये देणार सांगत होते. मात्र गेली 60, 65 वर्ष सत्तेत होते तेव्हा काही दिलं नाही. आता तर त्यांना कळून चुकलं रे सत्तेत येत नाहीत. महायुतीत कोणताही विवाद नाही. छगन भुजबळ यांनी आपलं मत मांडलं आहे. त्यांचे वरिष्ठ त्यांच्याशी बोलत आहेत.
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत आहे. कोणी बोलून काही होत नाही. भुजबळ महायुतीतील मंत्री आहेत. एखादी जनहिताची गोष्ट असल्याचं केंद्राकडे कसं आणि कुठ बोलावं हे त्यांना माहिती आहे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांच्या कांदा प्रश्नावर नारायण राणे यांनी दिली आहे. काँगेस डूबता हुवा जहाज आहे असं विजय वडेडतीवार बोलले असतील अशी मिश्किल प्रतिक्रिया राणेंनी दिली आहे. विजय वडेट्टीवार यांची दखल घेण्याची गरज नाही, असंही राणे म्हणाले.
इंडिया आघाडीचा पंतप्रधान होणार नाही तर जाहीर काय करणार?
महाराष्टातील 48 पैकी किती जागा येतील यावर राणेंनी नो कॉमेंट्स म्हटलंय. इंडिया आघाडीचा पंतप्रधान होणार नाही तर जाहीर काय करणार? अशी प्रतिक्रिया राणेंनी इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर दिली आहे. आमचे पंतप्रधान ठरले आहेत. त्याचे ठरायचे आहेत. एक ना धड भाराभर चिंध्या अशी त्यांची स्थिती असल्याची टीका राणे यांनी इंडिया आघाडीवर केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Ajit Pawar : मी राष्ट्रीय अध्यक्ष असलो तरी सुनील तटकरेंनी काय दावा केलाय ते माहिती नाही; शरद पवारांच्या आमदारांवर अजित पवार काय म्हणाले?