एक्स्प्लोर

Ajit Pawar : मी राष्ट्रीय अध्यक्ष असलो तरी सुनील तटकरेंनी काय दावा केलाय ते माहिती नाही; शरद पवारांच्या आमदारांवर अजित पवार काय म्हणाले? 

Ajit Pawar Claim On Sunil Tatkare : शरद पवारांच्या पक्षात आमदार नाराज असून लोकसभेच्या निवडणुकीनंतर ते काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा दावा सुनील तटकरे यांनी केला होता.

पुणे : मी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष असलो तरी काही गोष्टी मला माहिती नसतात,  सुनील तटकरेंनी काय दावा केला हे माहिती नसल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) दिली. शरद पवारांसोबत Sharad pawar) असलेल्या आमदारांचा एक गट काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा दावा सुनील तटकरे यांनी केला होता. त्यावर अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली. 

शरद पवार गटामधील आमदारांमध्ये असंतोष आहे, त्यामुळे चार ते पाच आमदार हे लोकसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा दावा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, मी जरी राष्ट्रीय अध्यक्ष असलो तरी आमच्या प्रदेशाध्यक्षांनी काय म्हटलं हे माहिती नसतं. आम्हालाही काही गोष्टी या माहिती नसतात, त्यामुळे मी यावर काही बोलणार नाही. 

काय म्हणाले होते सुनील तटकरे? 

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना मोठा दावा केला होता. शरद पवार यांच्यासोबतचे काही आमदार हे नाराज असल्याने लोकसभा निवडणुकीनंतर ते काँग्रेसमध्ये जातील. चार ते पाच आमदार हे सातत्याने दिल्लीला जात असून सोनिया गांधींना भेटण्याच्या तयारीत आहेत. 

पुणे प्रकरणात कारवाई सुरू 

पुणे अपघाताच्या घटनेमध्ये आतापर्यंत झालेल्या कारवाईबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, दोन अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली त्यांच्यावर कारवाई झाली. ससूनमधील दोन जण दोषी आढळले, त्यांच्यावर कारवाई झाली. आम्ही कॅमेरासमोर येत नाही म्हणजे लपवाछपवी सुरू आहे असं नाही. घटना घडल्यापासून चौकशीत जे दोषी आढळतायत त्यांच्यावर कारवाई सुरु आहे.  ही गंभीर घटना सरकारने गांभीर्याने घेतली आहे. दोषींवर कारवाई केली जाणार

सुनील टिंगरे हे आमदार म्हणून पोलिस स्टेशनमध्ये गेले

मी कामानिमित्त पुण्याच्या पोलिस आयुक्तांना नेहमी कॉल करत असतो पण या प्रकरणी मी पोलिस आयुक्तांना एकही कॉल केलेला नाही. आमदार टिंगरे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली आहे. या प्रकरणाची चौकशी होऊ द्या, कुणीही दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. आमदार हे मतदारसंघात असतात. एखादी घटना घडली तर त्यांना तिथे जावं लागतं. आमदार टिंगरे हे लोकप्रतिनिधी म्हणून तिथे गेले. त्यांना फोन आला म्हणून ते पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. त्यांनी कुणाला पाठीशी घाला सांगितलं नाही. सुनील टिंगरे यांच्यावर जे काही आरोप होतायत हे बिनबुडाचे आहेत. ते आमदार असल्याने त्यांना अनेकजण भेटतात, आम्हालाही पत्रं येतात. जर योग्य असेल तर आम्ही कामं करतो. कायदा हातात घेण्याचं काम मी जर केलं असेल तर कारवाई होईल. 

ही बातमी वाचा : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Embed widget