Vikas Thakre : संकेत बावनकुळे कार चालवत असता तर काँग्रेसनं कोणाला सोडले नसतं; काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा घणाघात
Vikas Thakre : नागपुरच्या अपघातात संकेत बावनकुळे जर कार चालवत असता, तर काँग्रेसनं कुणाला सोडले नसतं, असा इशारा काँग्रेस (Congress) शहर अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांनी दिला आहे.
Nagpur Accident नागपूर: नागपुरात (Nagpur) रविवारच्या मध्यरात्री ज्या ऑडी कारनं दुसऱ्या काही कार आणि दुचाकीला धडक दिली,ती कार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेचा (Chandrashekhar Bawankule) मुलगा संकेत याची होती. याबाबत स्वतः बावनकुळेंनी माहिती दित कबुली दिली आहे. दरम्यान अपघातावेळी कारमध्ये संकेत बावनकुळे उपस्थित होता, पोलिसांनी मान्य केलंय. पोलीस उपायुक्तांनी आज पत्रकार परिषद घेत या बद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
तर याच मुद्द्याला घेऊन विरोधकांनी टीकेची झोड उठवत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपवर निशाणा साधला आहे. अशातच आता काँग्रेस (Congress) शहर अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांनी घणाघाती टीका करत या प्रकरणात संकेत बावनकुळे कार चालवत असता, तर काँग्रेसनं कुणाला सोडले नसतं, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सत्ताधारी पक्ष भेदभाव तर होत नाही ना?
राजकीय कुटुंबातील मुलगा असला की राजकरण होतं, विरोधीपक्षाचा आमदार म्हणून सत्ताधारी पक्ष भेदभाव तर होत नाही ना, म्हणून यावर पोलिसांना विचारलं पाहिजे. दरम्यान या अपघातातील गाडी जप्त केली आहे. नेत्याचा मुलगा असो, की अजून कोणीही, कारवाई झालीच पाहिजे. यात जे तथ्य मिळालं, फुटेज मिळाले, यात जो दोषी असले तो सुटायला नको, नसेल तर बदनामी सुद्धा होऊ नये. यात राजकरण होत आहे. हा अपघात माझ्या मतदारसंघातला असल्यानं मी लक्ष ठेवून होतो. यात संकेत बावनकुळे हा गाडीत बसून होता, पण तो गाडी चालवत नव्हता. घटना दुर्दैवी आहे. मात्र यात संकेत बावनकुळे दोषी असता तर काँग्रेस चुपचाप बसली नसती, अशी भूमिका काँग्रेस शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी बोलताना व्यक्त केली आहे.
या अपघाताच्या वेळी संकेत बावनकुळे हा गाडी चालवत नव्हता, अशी माहिती आहे. यात संकेत बावनकुळे हा गाडीत होता आणि त्याचा मित्र गाडी चालवत होता. या ऑडी गाडीमुळे घटना घडली, मात्र सुदैवाने यात कोणाला दुखापत झाली नाही. या घटनेतून नेत्यांनी बोध घ्यावा, मुलांनी बोध घ्यावा. असेही विकास ठाकरे म्हणाले. या घटनेचा तपास पोलीस योग्य रीतीने करत आहे. दरम्यान, बावनकुळे यांच्या मुलाच्या कार अपघातावरून महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघत आहे. मात्र, अपघात प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही बघून योग्य कारवाई करावी, हि चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेली भूमिकेचे काँग्रेसने स्वागत केले असल्याचेही ते म्हणाले.
तर काँग्रेसने त्यांना सोडल नसतं-विकास ठाकरे
पोलिसांच्या तपासात संकेत बावनकुळे हा चालकाच्या सीटवर नव्हता, तर बाजूला बसला होता, हे पुढे आले. त्यामुळे त्यावर आता आम्हाला राजकारण करायचे नसल्याचे काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी सांगितले आहे. जर पोलिसांच्या पुढील तपासात संकेत बावनकुळे दोषी आढळला तर त्यावर कारवाई झाली पाहिजे, हि आमची भूमिका आहे. या प्रकरणावर बोलतांना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अनेक आरोप केले आहेत.
यावर बोलताना विकास ठाकरे म्हणाले की, सुषमा अंधारे त्या तिकडे राहतात, ही घटना माझा मतदारसंघातील आहे, मला या सगळ्या प्रकरणात जास्त माहीत आहे. त्यांना माहीती नाही. संकेत बावनकुळे कार चालवत असता तर काँग्रेसने त्यांना सोडल नसतं. यात तिघे सोबत होते, जेवण करायला गेले की मद्य प्राशन करून वाहन चालवत होते, याचा तपास व्हावा. यात येणाऱ्या दिवसात आणखी काय निष्पन्न होते त्यावर आमचे लक्ष असेल. असेही ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा