Muralidhar Mohol on Narendra Modi : मोदींनी विचारलं क्या पुणेकर कैसे हो, अमित शाह म्हणाले, पुण्याला गेला नाही का? मुरलीधर मोहोळांनी सांगितला किस्सा
Muralidhar Mohol on Narendra Modi, Pune : पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळाली आहे. त्यांच्यावर नागरी उड्डाण खात्याच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Muralidhar Mohol on Narendra Modi, Pune : पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळाली आहे. त्यांच्यावर नागरी उड्डाण खात्याच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान, मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात पोहोचल्यानंतर दिल्लीतील किस्से सांगितले आहेत. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी "क्या पुणेकर कैसे हो",असं म्हणत विचारपूस केली असल्याचे मोहोळ यांनी सांगितले आहे. ते पुण्यात बोलत होते.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, शपथविधीनंतर दीड दिवसांची सुटी मिळाली. हजार दोन हजारांमधला कार्यकर्ता आज मंत्री झाला. मला स्वप्नात वाटलं नव्हत की मंत्री होईल. जेपी नड्डांचा फ़ोन आला आणि शाम को शपथ विधी है. अपको शपथ लेनी है असं ऐकल्यावर मी भारावलो. पीएमओ ऑफिसला बोलवलं. मोदींनी विचारलं क्या पुणेकर कैसे हो! प्रत्येक पुणेकर आता मंत्री झालाय. माझ्या पुणेकरांनी मोठी संधी दिलीय.
पैलवान हुशार असतात सेकंदाभरात 100 डाव टाकतात
अमित शाह सोबत काय बोलणं झालं? असं विचारलं असता मोहोळ म्हणाले, अमित शाह कमी बोलतात त्यांनी स्वागत केलं. पुण्यातील विषयांवर बोलणं झालं त्यावेळी पुण्याला गेला नाही का? विचारलं. त्यांनीच सांगितल घरी जाऊन ये म्हटलं. अमित शाहांकडे मी हेड मास्टर म्हणून पाहतो. पैलवान हुशार असतात सेकंदाभरात 100 डाव टाकतात. पुरंदरच्या विमानतळावर काम करायचं आहे. मुंबई विमानतळावर काम करायचं आहे.
सहकार खात्यात खूप काम आहे ते करणार आहेत
सहकार खात्यात खूप काम आहे ते करणार आहेत. सहकारातून समृद्धीकडे असं आपण म्हणतो. पुरंदरच्या विमानतळाला dgca च्या मान्यता मिळाली आहे. भूसंपादनासाठी काम सुरू करणार आहोत. पुण्यातील टर्मिनलच्या कामासाठी cisf ची सिक्योरिटीची गरजेची
आहे. ही सेक्युरिटी नसल्यामुळे या टर्मिनलची मागणी अमित शाहांकडे केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या