सुप्रिया सुळेंनी बांधली खासदार भास्कर भगरेंना राखी, दिवसभर नाशिकमध्येच मुक्काम, अजितदादा मुंबईत
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे नाशिकच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांना राखी बांधील.
![सुप्रिया सुळेंनी बांधली खासदार भास्कर भगरेंना राखी, दिवसभर नाशिकमध्येच मुक्काम, अजितदादा मुंबईत MP supriya sule on nashik tour tied rakhi to mp bhaskar bhagare on occasion of raksha bandhan 2024 सुप्रिया सुळेंनी बांधली खासदार भास्कर भगरेंना राखी, दिवसभर नाशिकमध्येच मुक्काम, अजितदादा मुंबईत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/19/56dafa36a51bdc860e1a1b1e494f26dd1724031144383988_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : आज (19 ऑगस्ट) रक्षाबंधन सण आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या राजकारणातही अनेक भाऊ-बहीण आहेत. हेच भाऊ-बहीण रक्षाबंधन सणाला एकत्र येतात आणि आनंदात हा सण साजरा करतात. याच रक्षाबंधन सणाला खासदार सुप्रिया सुळे यांनी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांना राखी बांधली. काही दिसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भास्कर भगरे यांनी भाजपाच्या उमेदवार भारती पवार यांचा पराभव केला होता.
सुप्रिया सुळेंनी भास्कर भगरेंना बांधली राखी
सुप्रिया सुळे काल (18 ऑगस्ट) नाशिक दौऱ्यावर आहेत.रात्री उशिरा त्या नाशिकमध्ये पोहोचल्या. नाशिकमध्य पोहोचताच खासदार सुप्रिया सुळे यांनी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला चांदवडमध्ये मेळावा झाला. त्यानंतर खासदार भास्कर भगरे यांचे औक्षण करून सुप्रिया सुळे यांनी त्यांना राखी बांधली.
सुप्रिया सुळे आज नाशिकमध्येच असणार
आज दिवसभर सुप्रिया सुळे या नाशिकमध्येच असणार आहेत. रक्षाबंधन दिनाला त्या येथे वेगवेगळ्या कार्यक्रमांत भाग घेतील. त्यामुळे त्या उपमुख्यमंत्री बंधू अजित पवार यांच्याबरोबर रक्षाबंधन सण साजरा करणार का? भापल्या मोठ्या भावाला त्या राखी बांधणार का? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या बहीण-भावांच्या जोडीला फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश ओळखतो. सुप्रिया सुळे दरवर्षी अजित पवार यांना राखी बांधतात. त्यांच्या या रक्षाबंधनाची माध्यमांतही चर्चा होते.
सुप्रिया सुळे-अजित पवार राजकीय विरोधक
पण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती बदलली आहे. अजित पवार यांनी बंड करून भाजपाशी हातमिळवणी केलेली आहे. सध्या अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सत्तेत आहे. तर खासदार शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष विरोधी बाकावर बसलेला आहे. सुप्रिया सुळे या आपले वडील शरद पवार यांच्या पक्षात आहेत. म्हणजेच सध्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत.
लोकसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात प्रचार
काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी बारामतीची निवडणूक लढवली. तर अजित पवार यांनी यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्याविरोधात मैदानात उतरवलं होतं. यावेळी प्रचारादरम्यान अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकमेंवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टीका केली होती.
हेही वाचा :
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, आणखी एका नेत्याने साथ सोडली, कोकणचा बालेकिल्ला शिंदे गटाच्या वाटेवर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)