एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, आणखी एका नेत्याने साथ सोडली, कोकणचा बालेकिल्ला शिंदे गटाच्या वाटेवर

रायगड : रायगड जिल्हा हा एकेकाळी ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला,मात्र एकही आमदार आज या पक्षाला आपल्याकडे ठेवता आलेला नाही.

रायगड : रायगड जिल्हा हा एकेकाळी ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला,मात्र एकही आमदार आज या पक्षाला आपल्याकडे ठेवता आलेला नाही. रायगड जिल्ह्यातील राजकारणात झालेली उलथा पालथ आणि त्यानंतर मागील दोन वर्षापूर्वी सत्तेत झालेला बदल याला कारणीभूत ठरल्याचं चित्रं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन करण्यासाठी फोडलेली शिवसेना आणि त्यानंतर कार्यकर्त्यामध्ये झालेला संभ्रम या बदलामुळे अनेक कार्यकर्ते हे सुरुवातीला ठाकरेंच्या शिवसेनेत राहण्यास पसंती देत होते.  मात्र कालांतराने सरकार स्थिर राहिल्याने अनेक जुने कार्यकर्ते ठाकरे गटातून बाहेर पडू लागलेत.

विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटासमोर मोठं आव्हान असणार

रायगड जिल्ह्यात शिंदेंचे एकूण तीन आमदार आहेत आणि त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेच्या ताकदीचा या जिल्ह्यात दबदबा असल्याने अनेक संभ्रमात आहेत. तेच कार्यकर्ते आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत. त्यामुळे आगामी काळात येऊ ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटासमोर मोठं आव्हान असणार आहे. मुरुडमधील ठाकरे गटाचे रायगड जिल्हा युवासेना उपजिल्हाप्रमुख यांनी सुध्दा आज ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत  शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश केलाय.

परेश किल्लेकर किल्लेदार यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश 

परेश किल्लेकर हे रायगडमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणून कामगिरी सांभाळत होते. त्यांच्या या प्रवेशामुळे ठाकरे गटाचे मुरुडमधील बुरुज ढासळल्याचे चित्र आहे. रायगड मधील अलिबाग मुरूड मतदारसंघात सध्या शिंदेच्या महेंद्र दळवी यांचा करिश्मा आहे. शेकापचा बालेकिल्ला असणारा हा गड महेंद्र दळवी यांनी पहिल्यांदा शिवसेनेकडे आणला आणि पहिल्याच टर्ममध्ये उबाठा गटाकडून आमदार बनलेले आमदार महेंद्र दळवी यांना शिंदेच्या शिवसेनेत जावं लागलं. मात्र पुढील काल हा कसा असेल शिवाय इकडून तिकडे उड्या मारणारे हे कार्यकर्ते शेवटपर्यंत दळवी यांना कितपत साथ देतील हे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक काळातच कळेल.

इतर महत्वाच्या बातम्या 

तुमच्यात शिस्त नाही, इकडे मला दादागिरी करायला आलात का? तुमचा रावसाहेब दानवेंना मदत करायचा धंदा सुरुय, जयंत पाटील कार्यकर्त्यांवर संतापले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 9 PM 17 January 2025Shahrukh Khan Home CCTV : शाहरुख खानच्या घराची रेकी, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 17 January 2025Saif Ali Khan Accuse CCTV : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा वांद्रे स्टेशन येथिल फोटो समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget