Pune Crime News: मोठी बातमी : चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
Pune Crime News: पुण्यातील विश्रांतवाडी येथे 14 वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

Pune Crime News: पुण्यातील विश्रांतवाडी (Vishrantwadi) परिसरात अल्पवयीन तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. चार डिसेंबर रोजी हा प्रकार घडला असून पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली केला. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुनाकिब अन्सारी हा महाविद्यालयीन विद्यार्थी असून त्याची आणि पीडित मुलीची ओळख काही दिवसांपूर्वी एका बसस्टॉपवर झाली होती. चार डिसेंबर रोजी त्याने तिला "शाळेत सोडतो" असे सांगत विश्वासात घेतले आणि तिला आपल्या दुचाकीवर बसवले. मात्र शाळेत न नेत, आरोपी तिला एका खोलीत घेऊन गेला आणि तेथे जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला.
Pune Crime News: नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अत्याचारानंतर पीडित तरुणीने कुटुंबीयांना सर्व प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी तत्काळ विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अल्पावधीत तपास सुरू करून आरोपीचा शोध घेतला व त्याला अटक केली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपीविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Nashik Crime News: नाशिकमध्ये 9 वर्षीय बालिकेवर अत्याचार
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील सटाण्यात 9 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर एका 75 वर्षीय नामदेव गुंजाळ या संशयित आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडल्याने तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे. माणूकीला काळीमा फासणारी ही घटना समजताच नागरिकांनी सटाणा पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. या अल्पवयीन बालिकेला गेल्या सहा महिन्यापासून अत्याचाराला सामोरे जावे लागत होते. या चिमुकलीला पैशे, चॉकलेट असे आमिष दाखवत एका जागेवर नेत या संशयित आरोपीने वारंवार तिचेवर अत्याचार केले असे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी या संशयिताला तात्काळ ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात सटाणा पोलीस ठाण्यात पोस्कोसह इतर कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























