एक्स्प्लोर

MNS Sandeep Deshpande Video: आधी दानवेंनी शिंदे गटाच्या आमदाराला कोंडीत पकडलं, आता संदीप देशपांडेंनी लाचखोर PWD अधिकाऱ्याचा व्हिडीओ आणला समोर

MNS Sandeep Deshpande Video: मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज कॅश बॉम्बचा धमाका सुरु आहे.

MNS Sandeep Deshpande Video: मनसे (MNS) आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून (Shiv Sena UBT) आज कॅश बॉम्बचा धमाका सुरु आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिंदेंचे आमदार महेंद्र दळवींचा (Mahendra Dalvi) कॅशसह व्हिडीओ समोर आणला आहे. तर, मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी पीडब्लुडीच्या (PWD) अधिकाऱ्यांचा लाच घेतानाचा व्हिडीओ समोर आणलाय. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. हिवाळी अधिवेशनात (Winter Session) ठाकरे बंधूंच्या नेत्यांच्या कॅश बॉम्बवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. यामुळे हिवाळी अधिवेशन तापणार असल्याची चिन्ह दिसून येत आहेत.  

संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले आहे की,  पीडब्लुडीच्या हाफकीन शाखेत शाखा अभियंता शासनाकडून येणाऱ्या निधीतील टक्केवारी घेतानाचा व्हिडीओ समोर आणलाय.  2 लाख 80 हजार रुपये केवळ शासनाचा निधी आणण्याकरता घेतले जात आहेत. निधी मिळण्यापूर्वीच कंत्राटदारांकडून पैसे घेतले जातात.  आधी कंत्राटदारांकडून काही ठराविक टक्केवारी घेतली जायची. मात्र, आता निधी आणण्याचे, वर्क ऑर्डर काढण्याचे आणि अंतिम बिलाची वेगवेगळी टक्केवारी घेतली जाते.  इतकंच नाही, तर भ्रष्टाचाराच्या टक्केवारीत कंत्राटदारांची बोलीही लागते आहे, असा आरोप त्यांनी केलाय. 

MNS Sandeep Deshpande Video: संदीप देशपांडेंचा मोठा आरोप

संदीप देशपांडे पुढे म्हणाले की, आज पहिला व्हिडीओ समोर आणला आहे. आता दररोज असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे व्हिडीओ समोर येणार आहेत. नोटांची बंडले घेणाऱ्या शाखा अभियंता विनोद धुमाळचा व्हिडीओ आज समोर आला. उद्या वरिष्ठ अभियंत्याचा व्हिडीओ समोर आणणार आहे.  वरळीतील शाखेचा हा व्हिडीओ आहे. येथून निवडून गेलेले आमदार आदित्य ठाकरे यांनी विधीमंडळ अधिवेशनात याला वाचा फोडावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच, कंत्राटदारांना कामे झाल्यानंतरही पैसे मिळत नाहीत. कंत्राटदार सांगत आहेत की, आता आमच्यावर टक्केवारी देऊनही आत्महत्या करण्याची वेळ आलीय. रोहित आर्यचा एन्काऊंटर देखील याच कारणातून झाला असावा, असा मोठा आरोप देखील संदीप देशपांडेंनी केलाय. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Ambadas Danve: अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, शिंदे गटाच्या आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा व्हिडीओ, हिवाळी अधिवेशनात वातावरण तापणार

Mahendra Dalvi cash video: नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ व्हायरल होताच महेंद्र दळवींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, लाल शर्टमधील 'तो' व्यक्ती...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही
Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही
Mayor Reservation : मुंबई, पुणे, नागपूरसह 15 महापालिकांमध्ये महिलाराज, महापौरपदाचा मान महिलांना, संपूर्ण यादी
राज्यातील 15 महापालिकांमध्ये महिला राज, मुंबई- नागपूरमध्ये महिला महापौर होणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
KDMC Mayor: बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?
बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?
Maharashtra Municipal Corporation Reservation 2026 मोठी बातमी: मुंबई-पुणे ओपन, ठाण्यात SC, कल्याण-डोंबिवलीत ST...29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर; A टू Z माहिती
मोठी बातमी: मुंबई-पुणे ओपन, ठाण्यात SC, कल्याण-डोंबिवलीत ST...29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर; A टू Z माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

KDMC Mayor Reservation News : कल्याण डोंबिवलीत या तिघांना महापौरपदाची संधी
KDMC Mayor Reservation : कल्याण डोंबिवलीत अनुसूचित जमाती प्रवर्गाला आरक्षणाला
KDMC Mayor : कल्याण डोंबिवलीत मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज?
Sanjay Raut Shivsena : सत्तास्थापनेसाठी श्रीकांत शिंदेंच्या मनसे नेत्यांसोबत बैठका, राऊत काय म्हणाले?
KDMC Thackeray vs Thackeray : कल्याण डोंबिवलीत मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही
Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही
Mayor Reservation : मुंबई, पुणे, नागपूरसह 15 महापालिकांमध्ये महिलाराज, महापौरपदाचा मान महिलांना, संपूर्ण यादी
राज्यातील 15 महापालिकांमध्ये महिला राज, मुंबई- नागपूरमध्ये महिला महापौर होणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
KDMC Mayor: बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?
बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?
Maharashtra Municipal Corporation Reservation 2026 मोठी बातमी: मुंबई-पुणे ओपन, ठाण्यात SC, कल्याण-डोंबिवलीत ST...29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर; A टू Z माहिती
मोठी बातमी: मुंबई-पुणे ओपन, ठाण्यात SC, कल्याण-डोंबिवलीत ST...29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर; A टू Z माहिती
Pune pimpri chinchwad Mayor Reservation: पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये महिला राज; महापौरपदाची सोडत जाहीर, कोणत्या महिला नेत्यांना मिळणार संधी?
पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये महिला राज; महापौरपदाची सोडत जाहीर, कोणत्या महिला नेत्यांना मिळणार संधी?
अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदेत भाजप आणि एमआयएम मांडीला मांडी लावून बसणार; सत्तेसाठी दोन्ही पक्षांची एकमेकांना साथ
अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदेत भाजप आणि एमआयएम मांडीला मांडी लावून बसणार; सत्तेसाठी दोन्ही पक्षांची एकमेकांना साथ
Shivsena : मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
BJP mayor : पुण्याचा कोण होणार कारभारी? भाजपकडून महापौरपदासाठी प्रबळ दावेदारांची नावं चर्चेत, कोणाला मिळू शकतं पद
पुण्याचा कोण होणार कारभारी? भाजपकडून महापौरपदासाठी प्रबळ दावेदारांची नावं चर्चेत, कोणाला मिळू शकतं पद
Embed widget