छगन भुजबळ यांच्या नाराजी नाट्यवरूनर राष्ट्रवादीमध्ये दोन गट; माणिकराव कोकटेंच्या टीकेला सरचिटणीसांचे प्रत्युत्तर
Gorakh Bodke : माणिकराव कोकटे यांनी काल छगन भुजबळ याच्यावर हल्लाबोल केल्यानंतर प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांनीही आता कृषिमंत्री कोकाटेवर पलटवार केला आहे.
नाशिक: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Group) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर छगन भुजबळ यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. यानंतर छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल 40 मिनिटे चर्चा देखील झाली. दरम्यान भुजबळ-फडणवीस भेटीनंतर राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केल्याचेही बघायला मिळाले आहे. अशातच छगन भुजबळ यांच्या नाराजी नाट्यवरूनर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे चित्र आहे. कारण माणिकराव कोकटे यांनी काल छगन भुजबळ याच्यावर हल्लाबोल केल्यानंतर प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके (Gorakh Bodke) यांनीही आता कृषिमंत्री कोकाटेवर पलटवार केला आहे.
सर्व पक्ष फिरून आलेल्यांनी भुजबळांवर बोलू नये- गोरख बोडके
माणिकराव कोकटे 5 वर्षांपूर्वी पक्षात आलेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर छगन भुजबळ यांनीच कोकटे यांचा पक्षात प्रवेश करून घेतला. कोकाटे स्वतः जातीयवादी आहेत त्यांनी भुजबळांवर बोलू नये. भुजबळ हे पक्ष स्थापनेपासून आहेत. तर माणिकराव कोकटे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असे सर्व पक्ष फिरून आले आहेत. त्यामुळे त्यांनी भुजबळांवर बोलू नये, अशी टीका करत प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांनी माणिकराव कोकटे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले होते माणिकराव कोकाटे?
छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली होती. यावेळी माणिकराव कोकाटे म्हणाले होते की, भुजबळांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली ही चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी आपल्या मनातलं शल्य बोलून दाखवला असेल आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं असेल, तर मुख्यमंत्री बोलल्याप्रमाणे करतील. मंत्रिमंडळात 42 मंत्र्यांपैकी 17 मंत्री हे ओबीसी तर 16 मंत्री मराठा आहेत. ओबीसींना समान न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही, अशी त्यांची भूमिका असल्याने त्यांचं स्वागत आहे, असे त्यांनी म्हटले.
इतर महत्वाच्या बातम्या