एक्स्प्लोर

MNS Sandeep Deshpande: राज ठाकरेंना ललकारणाऱ्या सुशील केडियाला संदीप देशपांडेंनी सुनावलं, म्हणाले, 'व्यापारी आहात, बाप बनायचा प्रयत्न करु नका'

Sandeep Deshpande on Mira bhayandar Morcha: मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी मनसेविरोधात एकजूट होत मोर्चा काढला होता. यावरुन राजकीय वातावरण तापले आहे.

LIVE

Key Events
MNS Sandeep Deshpande slams Non Marathi traders after Mira bhayandar Morcha asks to do trade only MNS Sandeep Deshpande: राज ठाकरेंना ललकारणाऱ्या सुशील केडियाला संदीप देशपांडेंनी सुनावलं, म्हणाले, 'व्यापारी आहात, बाप बनायचा प्रयत्न करु नका'
MNS slap non marathi shopkeeper
Source : ABP Live

Background

Sandeep Deshpande on Mira bhayandar Morcha: 'आमच्याकडे मराठी नव्हे हिंदीच चालते', अशी टिप्पणी केल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण झालेल्या व्यापाऱ्याच्या भाईबांधवांनी गुरुवारी मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढून मनसेचा निषेध केला होता. यावेळी मीरा-भाईंदरमधील व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे मनसेपासून (MNS) संरक्षण देण्याची मागणी केली होती. यावरुन मुंबईतील राजकीय वातावरण तापले होते. सोशल मीडियावर अनेक अमराठी लोकांकडून राज ठाकरे आणि मनसेला लक्ष्य करण्यात आले. एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरील सुशील केडिया नावाच्या एका युजरने राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ललकारले होते. 'राज ठाकरे ड्रामा बंद कर. तुझे 10-12 गुंड दोन-चार कानाखाली मारतील. पण आम्ही आमरण उपोषणाला बसलो तर तुला हात जोडून माफी मारावी लागेल. मग काय करशील', असे या सुशील केडियाने म्हटले होते. हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याच ट्विटचा धागा पकडत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मराठीला विरोध करणाऱ्यांना सज्जड भाषेत इशारा दिला. (Mira bhayandar News)

बेपारी आहात बेपार करा,आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका.महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल बाकी मेहता बिहता नी चड्डीत राहायचं. तूर्तास एवढंच, असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे. संदीप देशपांडे यांच्या या ट्विटनंतर आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

BJP & MNS: मीरा-भाईंदरमधील मराठी भाजप पदाधिकार्‍याचा राजीनामा

मीरा रोड येथील शांती पार्क परिसरात असलेल्या जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या मालकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती. याविरोधात गुरुवारी मीरा-भाईंदरच्या काही भागात व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवून कडकडीत बंद पाळला होता. व्यापाऱ्यांच्या या मोर्चाला भाजपचे स्थानिक आमदार आणि नेत्यांची फूस असल्याचा आरोप मनसेचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी केला होता. हे प्रकरण चर्चा करुन मिटणार होते. मात्र, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी व्यापाऱ्यांना मोर्चा काढायला प्रवृत्त केले, असे जाधव यांनी म्हटले होते. या सगळ्या घडामोडींमुळे मीरा-भाईंदरमधील भाजपचे मराठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज झाले होते. याच नाराजीतून  पेंकरपाडा येथील भाजपचे प्रभाग अध्यक्ष श्री. कुंदन सुरेश मानकर यांनी भाजपला रामराम ठोकून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला होता. 

आणखी वाचा

मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी दंड थोपटले, भाजपने रसद पुरवल्याचा आरोप, नाराज पदाधिकाऱ्याने थेट मनसेत प्रवेश केला

08:47 AM (IST)  •  04 Jul 2025

खासदार सुप्रिया सुळे यांचा हिंजवडीचं वॉटर पार्क का झालं? या अनुषंगाने पाहणी दौरा सुरु

पुणे : हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्क, माण, मारुंजी  आणि परिसरात सातत्याने तुंबणारे पाणी, रस्त्यांची झालेली दुरवस्था, ट्रॅफिक यामुळे नागरिकांना अत्यंत त्रास होत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे हा दौरा करतायेत. सोबत प्रशासनाचे अधिकारी ही आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत हा पाहणी दौरा होता, असं सुळेंच्या जनसंपर्क विभागाकडून कळवण्यात आलं होतं, प्रत्यक्षात मंत्री सामंत मात्र अनुपस्थित आहेत.

08:43 AM (IST)  •  04 Jul 2025

भाजप आमदार संजय कुटे यांच्या कार चालकाच मृत्यू प्रकरण; आज सर्वपक्षीयांचा जळगाव जामोद शहर बंदच आवाहन

बुलढाणा: जळगाव जामोद येथील भाजप कार्यकर्ता व भाजपा आ.संजय कुटे यांचा कारचालक पंकज देशमुख याचा 3 मे रोजी संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला होता. पंकज देशमुख यांच्या पत्नीने ही आत्महत्या नसून घातपात आहे व या घातपातात राजकीय व्यक्तींचा हात असून संपूर्ण मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी झालीच पाहिजे ही मागणी लावून धरली. विधिमंडळातही आ.संजय कुटे यांनीही या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. जळगाव जामोद येथील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी ही मागणी रेटून धरण्यासाठी न्याय हक्क जन आंदोलन समिती स्थापन केली आहे. या समितीने आज जळगाव जामोद शहर बंदच आवाहन केलं आहे...या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळत आज जळगाव जामोद शहर सकाळपासूनच कडकडीत बंद आहे....शहरातील सर्व आस्थापना बंद असून या संपूर्ण मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी आता जोर धरू लागली आहे. 

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget