एक्स्प्लोर

Mira Bhayandar morcha against MNS: मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी दंड थोपटले, भाजपने रसद पुरवल्याचा आरोप, नाराज पदाधिकाऱ्याने थेट मनसेत प्रवेश केला

Mira Bhayandar morcha against MNS: जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या मालकाने मराठी भाषा बोलण्याची गरज काय, असे वक्तव्य केले होते. त्यावरुन मनसैनिकांनी त्याच्या कानाखाली मारले होते.

Mira Bhayandar morcha against MNS: मिरारोड परिसरात एका अमराठी दुकानदाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी मीरा-भाईंदरमध्ये (Mira bhayandar news) काही व्यापाऱ्यांनी मोर्चा काढून शक्तीप्रदर्शन केले होते. यावेळी मराठीच्या मुद्द्यावरुन दुकानदाराला कानशि‍लात लगावणाऱ्या मनसेच्या (MNS) कृतीचा निषेध करण्यात आला होता. यावरुन राजकीय आणि सामाजिक वातावरण तापल्यानंतर मनसेचे ठाणे-पालघर विभागाचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते. मारहाण झालेला संबंधित दुकानदाराने हा वाद मिटवण्याची तयारी दाखवली होती. मात्र, भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी त्यांच्या राजकीय फायद्यासाठी व्यापाऱ्यांना मोर्चा काढायला लावला, असा आरोप अविनाश जाधव यांनी केला होता. या सगळ्या घडामोडींमुळे मीरा-भाईंदरमधील भाजपचे मराठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज झाले होते. याच नाराजीतून भाजपच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मनसेत प्रवेश केला. मनसेच्या अधिकृत सोशल मिडिया हँडवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. 

आज मीरा-भायंदर येथे झालेल्या भाजप पुरस्कृत मोर्च्यावर नाराजी व्यक्त करत, तसेच स्थानिक भाजप आमदारांवर तीव्र रोष व्यक्त करत पेंकरपाडा येथील भाजपचे प्रभाग अध्यक्ष श्री. कुंदन सुरेश मानकर यांनी भाजपला रामराम ठोकून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला, असे मनसेच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.

मिरारोड येथील सेवेन स्कूल ते पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या कार्यालयापर्यंत गुरुवारी स्थानिक व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. मारहाण झालेल्या व्यावसायिकासोबत (Traders) जे घडले, ते भविष्यात इतर कोणासोबतही घडू शकते, अशी चिंता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली होती. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे केली.

View this post on Instagram
 
A post shared by MNS Adhikrut (@mns_adhikrut)

MNS Avinash Jadhav: भाजपच्या नेत्यांनी असंतोष पसरवल्याचा मनसेचा आरोप

मीरारोड परिसरातजिथे बंद पाळण्यात आला तो एक लहानसा परिसर आहे. तेथील 25 ते 50 व्यापाऱ्यांनी हा बंद पुकारला होता. खरंतर आजचं आंदोलन होतं, ते व्यापाऱ्यांचं नाही तर भाजपच्या लोकांचे होते. भाजपमधील येथील नेते, पदाधिकारी, वकील आणि नरेंद्र मेहतांच्या कुटुंबातील काही लोक आहेत, त्यांनी हे आंदोलन केले. हे भाजपने मराठी माणसाविरोधात केलेलं आंदोलन आहे, असा आरोप मनसेचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी केला होता.

भाजप नेत्यांनी दुकानदाराला मारहाण करतानाचा फक्त 40 सेकंदांचा व्हिडीओ व्हायरल केला. व्हीडिओतील तेवढाच भाग कट करुन व्हायरल करण्यात आला. त्याच्या मागे-पुढे बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या. मात्र, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी राजकीय फायद्यासाठी फक्त तेवढाच भाग सोशल मीडियावर शेअर केल्याचे अविनाश जाधव यांनी म्हटले.

आणखी वाचा

दुकानदाराने माझ्याकडे माफी मागितली पण भाजप नेत्यांनी मोर्चा काढायला लावला; मीरा-भाईंदरमधील मोर्चाबाबत अविनाश जाधवांचा गंभीर आरोप

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Asia Cup Trophy : आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...
आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dual Voting: भाजप नेत्याचं दोन राज्यांत मतदान? सोशल मीडिया पोस्टमुळे नवा वाद
Raigad Save Land: रायगडात ठाकरोली गावाचा आदर्श, जमिनीच्या विक्रीवर बंदी
Onion Export Crisis: कांद्यामुळे शेतकरी हवालदिल, निर्यातबंदीवर तोडगा कधी?
TOP 25 Superfast News | टॉप 25 वेगवान घडामोडी | Maharashtra News |  ABP Majha
JCB Wedding : कोल्हापुरात JCB मधून नवदाम्पत्याची वरात, हटके मिरवणुकीची जोरदार चर्चा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Asia Cup Trophy : आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...
आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
Gold : सोन्याच्या दरात उच्चांकानंतर 10  टक्क्यांची घसरण,गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती, तज्ज्ञ म्हणतात..
सोन्याच्या दरात उच्चांकानंतर 10  टक्क्यांची घसरण,गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती, तज्ज्ञ म्हणतात..
Tanaji sawant: येत्या निवडणुकीला सर्वधर्म समभाव; तानाजी सावंतांकडून एकला चलो रे चा नारा, महायुतीत उभी फूट
येत्या निवडणुकीला सर्वधर्म समभाव; तानाजी सावंतांकडून एकला चलो रे चा नारा, महायुतीत उभी फूट
Elon Musk Pay Package: एलाॅन मस्कना टेस्लानं दिलेला पगार किती ट्रिलीयन डाॅलर? तेवढ्यात स्वित्झर्लंड, सिंगापूर, इस्त्रायलसारखं किती देश खरेदी होतील??
एलाॅन मस्कना टेस्लानं दिलेला पगार किती ट्रिलीयन डाॅलर? तेवढ्यात स्वित्झर्लंड, सिंगापूर, इस्त्रायलसारखं किती देश खरेदी होतील??
Embed widget