(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लातूरमधील शिवस्वराज्य यात्रेच्या स्टेजवर मराठा आंदोलक, सुप्रिया सुळेंचं भाषण थांबवलं, जोरदार घोषणाबाजी
Maratha Protester and Supriya Sule, लातूर : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज लातूरमध्ये पोहोचली आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात सुरु असलेली शिवस्वराज्य यात्रा आज (दि.14) अहमदपूरमध्ये सुरु आहे.
Maratha Protester and Supriya Sule, लातूर : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज लातूरमध्ये पोहोचली आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात सुरु असलेली शिवस्वराज्य यात्रा आज (दि.14) अहमदपूरमध्ये सुरु आहे. दरम्यान, यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांचे भाषण सुरु असतानाच मराठा समाजाचे आंदोलक थेट स्टेजवर पोहोचले आहेत. त्यांनी स्टेजवर सुप्रिया सुळेंचे भाषण थांबवत मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचा आग्रह धरला. यावेळी मराठा समाज बांधवांनी स्टेज वर जात घोषणाबाजी केली. सुप्रिया सुळे यांना दिले निवेदनही दिले.
सुप्रिया सुळे भाषणात काय काय म्हणाल्या?
सुप्रिया सुळे म्हणाल्या, बरेच लोक विकासाच्या नावावर भाजपा बरोबर गेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस चा पक्ष मी म्हणणार नाही. भाग म्हणते ती केस कोर्टात चालू आहे. बाबासाहेब पाटील कोणत्या कारणामुळे अजित पवार यांच्या बरोबर गेले हे माहीत नाही. मात्र यांच्या मतांमुळे हे विकास कामामुळे गेले. फार झाले जे झाले ते गंगेला मिळाले.
तुमची समाजाबाबत कोणती भूमिका आहे ते जाहीर सांगा
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते हे मंचावर पोहचले. भाषण सुरू असताना त्यांनी निवेदन दिले. तुमची समाजाबाबत कोणती भूमिका आहे ते जाहीर सांगा. ओबीसी समावेश बाबत सर्व काही आहे ते सांगा. भूमिका स्पष्ट करा. कार्यकर्त्यानी सभा स्थळी मागणी केली. मराठा समाज बांधवांनी सुप्रिया सुळे शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची नेमकी काय भूमिका आहे हे जाहीर सांगा, अशी मागणी केली.
लातूर, निलंगा आणि अहमदपूरमध्ये समाज बांधवांनी पत्र दिले
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या, मला आज हे तिसरं पत्र आलेला आहे. लातूर, निलंगा आणि अहमदपूरमध्ये समाज बांधवांनी पत्र दिले. माझी कोणत्याही विषयावर कधीही बोलण्याची तयारी आहे. धनगर समाजाचे लिंगायत समाज असेल या सर्व समाजाची प्रश्नही मी त्याच पद्धतीने मांडणार आहे. आपण सगळे एकत्र बसू या. प्रत्येक समाजाचे प्रश्न ऐकूयात आणि कसं कोणाला कोणत्या आरक्षणात बसवता येईल याबाबतची चर्चेतून मार्ग काढूया.
पोलीस बांधवांबाबत देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील लोक आणि आमदार चांगला बोलत नाहीत
भाजपासारखे गलिच्छ राजकारण आणि कधीही करत नाहीत. देवेंद्रजी ही कायम विरोधात जरी असते तरी चांगला म्हणण्याची तयारी असायला हवी. पोलीस बांधवांबाबत देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील लोक आणि आमदार चांगला बोलत नाहीत. आर आर पाटील गृहमंत्री असताना पोलिसाबाबत कधी ही गलिच्छ भाषा ऐकली आहे का? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
इतर महत्वाच्या बातम्या