एक्स्प्लोर

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी निर्णयाची वेळ पुढे ढकलली, विधानसभेचा प्लॅन गुप्त ठेवणार, इच्छूकांना केल्या महत्वाच्या सूचना

विधानसभेत 288 पाडायचे की नाही यावर बैठक 29 ऑगस्टला बैठकीत मनोज जरांगे मोठी घोषणा करणार होते. आता त्यांनी ही बैठकच पुढे ढककली आहेत. इच्छूकांना त्यांनी महत्वाच्या सूचना केल्यात.

Manoj Jarange: राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. अनेक दिवसांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे करताहेत. विधानसभेत 288 पाडायचे की नाही यावर बैठक 29 ऑगस्टला बैठकीत मनोज जरांगे मोठी घोषणा करणार होते. पण याचसंदर्भात त्यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने निवडणूका लांबवल्यामुळे आपल्याला 29 ऑगस्टची बैठक पुढे ढकलावी लागेल असे मनोज जरांगे म्हणालेत. सरकारने दोन दिवसात डाव टाकला असून त्यांनी निवडणूका डिसेंबरमध्ये ढकलल्या आहेत. आता राष्ट्रपती राजवट लागू शकते. त्यामुळे अजून  4 महिने जायचे आहेत, त्यांना डाव खेळायला वेळ आहे. आपली रणनिती सुरु असून 29ला आपण काय भूमिका घेतो हे त्यांना पहायचे आहे. असेही जरांगे म्हणाले.

आपले डाव सरकारला का कळू द्यायचे?

विधानसभा निवडणूका दिवळीनंतर होतील असं सांगण्यात येत असताना त्यांनी निवडणूका डिसेंबरमध्ये ढकलल्या आहेत. आता राष्ट्रपती राजवट लागू शकते, अजून 4 महिने जायचे आहेत,त्यांना डाव खेळायला मोठा वेळ आहे. त्यांनी निवडणूका लांबवल्यामुळे आपल्याला 29 ऑगस्टची बैठक पुढे ढकलावी लागेल असे जरांगे म्हणाले. यावेळेस जे होईल ते होईल, आपली रणनिती, डाव-प्रतिडाव सरकारला कळू द्यायचे? असं जरांगे म्हणाले. जेंव्हा निवडणूकीची तारीख जाहीर होईल तेंव्हा बैठक घेऊ असं ते म्हणाले.

दीड दोन महिन्यांनी ठरवू लढायचं की नाही

२९ ऑगस्ट रोजी बैठक होणार नाही असे मनोज जरांगे यांनी आज सांगितले असून दीड दोन महिन्यांनी ठरवू लढायचं की कसं, असे जरांगे म्हणाले. दरम्यान, प्रत्येक गावाने ज्या नोंदी सापडलया आहेत, ज्यांना सापडल्या नाहीत त्यांनी तहसिलदारांकडे जाऊन जाब विचारावा. सरकारवर आता बेकार वेळ आली आहे. आता बैठक होणार नसली तरी आपण मतदारसंघनिहाय घोंगड्या बैठक घेऊ, या बैठकीला मी येतो असे जरांगे म्हणाले. दीड दोन महिन्यांनी ठरवू लढायचे की कसे  असेही ते म्हणाले.

इच्छूकांच्या अर्जाची छाननी करू

सरकारने विधानसभा निवडणूका पुढे ढककल्या आहेत. आता राष्ट्रपती राजवट लागली तर प्रशासक म्हणून तेच बसणार आहेत.तयामुळे इच्छूक उमेदवार त्यांच्यांकडे गेले म्हणून त्यांना बहुतेक आंदोलन रणनिती उघडी करायची होती. म्हणून त्यांनी डाव टाकल्याचे जरांगे म्हणाले. आताच आपली रणनिती सांगायला नको अशी भूमिका त्यांनी घेतली. सर्व इच्छूकांच्या अर्जाची आपण छाननी करू, सर्व इच्छूक उमेदवारांनी २४ ऑगस्टपर्यंत आपले अर्ज घेऊन यावेत. असेही जरांगे म्हणाले.

हेही वाचा:

Badlapur Case : गृहमंत्र्याचा वचक असा हवा की, त्याने नजर फिरवली तर पोलिसांच्या माना झुकल्या पाहिजेत, भास्कर जाधवांनी फडणवीसांना डिवचलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dr. Manmohan Singh Passes Away : डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासZero Hour : महिला कुठेच सुरक्षित नाहीत? नराधमांना कायद्याची भीती कधी बसणार?Job Majha | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी पदावर भरती ABP MajhaKailash Phad Arrested : बीडमध्ये हवेत फायरिंग करणारा कैलास फड अटकेत, परळी पोलिसांची कारवाई

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Embed widget