तळहाताच्या फोडाप्रमाणे मराठ्यांनी जपलं, त्याच धसांनी कुऱ्हाडीचे वार करुन मान तोडली, मनोज जरांगेंचा हल्लाबोल
Manoj Jarange Patil on Suresh Dhas :तळहाताच्या फोडाप्रमाणे मराठ्यांनी जपलं, त्याच धसांनी कुऱ्हाडीचे वार करुन मान तोडली, अशा शब्दात मनोज जरांगेंनी सुरेश धस यांच्यावर टीका केलीये.

Manoj Jarange Patil on Suresh Dhas : "राज्याला धनंजय मुंडे (Dhananjay Munde) क्रूर आहे हे सुरेश धस यांनीचं सांगितलं.. याने मला पाडलं म्हणाले. त्यामुळे मराठ्यांच्या मनात रोष निर्माण झाला..क्रूर माणसाला भेटला म्हणजे तू पण क्रूरच आहे. तळहातावरच्या फोडाप्रमाणे धसांना मराठ्यांनी जपलं,आज त्याच माणसाने कुऱ्हाडीचे वार करून मान तोडून दिली, ज्याला मोठं केलं मराठ्यांनी त्याच्याच अन्नात माती टाकली", असं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. ते एबीपी माझाशी बोलत होते.
सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये समेट घडवून आणण्यासाठी बैठका घेतल्या असा खुलासा आज (दि.14) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. त्यानंतर सुरेश धस यांनी देखील धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची कबुली दिली. मात्र, चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याशी असहमती दर्शवली. दरम्यान, आता सुरेश धस यांना चारीबाजूंनी टीकेला सामोरं जावं लागत आहे. मनोज जरांगेंनी देखील सुरेश धसांवर जोरदार हल्लाबोल केलाय.
राजकीय दबावाखाली तुम्ही झिरो मिनिटात होत्याचं नव्हतं केलं - मनोज जरांगे
मनोज जरांगे म्हणाले, न्याय मिळावा म्हणून सर्व एका छताखाली आले. राजकीय स्वार्थासाठी राजकीय दबावाखाली तुम्ही झिरो मिनिटात होत्याचं नव्हतं केलं. मुख्यमंत्र्यांनी पाठवलं, मी मंत्री असल्यापासून सोडणार नाही असं म्हटलं असतं. मात्र यांची मी समाजात इज्जत वाढवली.. आमदाराच्या हाताने एक मिनिटात उपोषण सोडलं. समाजाचा माणूस आहे समाजाचे काम करत आहे म्हणून... समाजालाही सांगितलं की याच्या केसालाही धक्का लागता कामा नये. त्याला भेटायला ते काय कोमात गेले का? एवढा उमाळा एवढं प्रेम...?
अण्णा सगळे असेच असतात की काय?? मनोज जरांगेंचा सवाल
एवढी माया?, तमाशाच्या सगळ्या गवळणी याला येतात, सर्व पिक्चर चे नाव घेतो जुने नवीन , दुसरे काम करतो का नाही फक्त पिक्चरच बघतो का काय माहिती..अण्णा सगळे असेच असतात की काय?? गोपीनाथराव मुंडे यांना जिवंतपणी याच टोळीने मरण यातना दिल्या..त्या श्रद्धास्थानाला कलंक लावला..याच टोळीने संतोष देशमुख यांचा फोन केला. त्यांना तुम्ही भेटायला जाता एवढा वेडा समाज नाही..धस इतक्या लवकर समाजाचे उपकार विसरायचे नव्हते.. धनंजय मुंडे देशमुख कुटुंबाच्या भेटायला गेले नाही...
इतर महत्त्वाच्या बातम्या























