एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ट्रम्पेटनं डाव साधला, शरद पवारांच्या पक्षाला तब्बल 9 जागांवर फटका; अनेक ठिकाणी 'सातारा' पॅटर्न!

Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीत सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा निकाल लागला आहे. या निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे.

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) महायुतीला (Mahayuti) मोठे बहुमत मिळाले. निकालानंतर आता महायुतीमध्ये सत्तास्थापनेसाठी हालचाली वाढल्या आहेत. मुख्यमंत्रिपद कोणाकडे द्यावे, याबाबत महायुतीतील मित्रपत्रांमध्ये चर्चा चालू आहे. तर दुसरीकडे राज्यातील जनतेने महाविकास आघाडीकडे पाठ फिरवलीआहे. शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तसेच काँग्रेसला जनतेने नाकारले आहे. दरम्यान, या निवडणुकीतील निकालाचे विश्लेषण केले जात असताना अचंबित करणाऱ्या बाबी समोर येत आहेत. ताज्या अभ्यासानुसार तुतारी (ट्रम्पेट) या निवडणूक चिन्हामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला जवळपास 9 जागांवर फटका बसला आहे. 

आकडेवारी काय सांगते? 

विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह तुतारी फुंकणारा माणूस असे होते. याच निवडणुकीत अनेक जागांवर तुतारी (ट्रम्पेट) असे चिन्ह असलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तुतारी या नावामुळे अनेक जागांवर शरद पवार यांच्या पक्षाला फटका बसू शकतो, असा अंदाज व्यक्तक केला जात होता. त्याची प्रचीती आता आली आहे. शरद पवार यांच्या पक्षाला या निवडणुकीत एकूण नऊ जागांवर फटका बसला आहे. तुतारीला मिळणारी मतं जर शरद पवार यांच्या पक्षाला मिळाली असती तर या नऊ जागांवर राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे उमेदवार विजयी झाले असते, असे बोलले जात आहे. 

कोणकोणत्या जागांवर फटका बसला? 

जिंतूर, घनसावंगी, शहापूर, बेलापूर, अणुशक्तीनगर, आंबेगाव, पारनेर, केज, परंडा या जागांवर शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा जेवढ्या मतांनी पराभव झाला आहे, त्यापेक्षा अधिक मतं तुतारी हे निवडणूक चिन्ह असलेल्या उमेदवारा मिळाली आहेत. 

मतांचा फरक काय? 

 जालना जिल्ह्यात शरद पवार यांच्या पक्षाचे विजय भांबळे यांचा पराभव झाला. या मतदारसंघात त्यांचा 4516 मते कमी पडली. तर तुतारी म्हणजेच ट्रम्पेटला 7430 मतं मिळाली. घनसावंगीमध्ये राजेश टोपे यांचा 2309 मतांनी पराभव झाला. येथे ट्रम्पेट या चिन्हाला 4830 मते मिळाली. शहापूर येथे शरद पवार यांच्या पक्षाचे पांडुरंग बरोरा यांचा 1672 मतांनी पराभव झाला. येथे ट्रम्पेटला 3892 मते मिळाली. बेलापूरमध्ये शरद पवार यांच्या पक्षाचे संदीप नाईख यांचा अवघ्या 377 मतांनी पराभव झाला. तर येथे ट्रम्पेटला 2860 मते मिळाली. अणुशक्तीनगर येथे  फहाद अहमद यांचा 3378 मतांनी पराभव झाला. तर येथे तुतारीला एकूण 4075 मते मिळाली.

अन्य मतदारसंघांत नेमकं काय घडलं?

आंबेगाव या जागेवर शरद पवार यांच्या पक्षाचे देवदत्त निकम यांचा 1523 मतांनी पराभव झाला. येथे तुतारी म्हणजेच ट्रम्पेट या निवडणूक चिन्ह असलेल्या उमेदवाराल 2965 मते मिळाली. पारनेर या जागेवर शरद पवार यांच्या पक्षाच्या राणी लंके यांचा 1526 मतांनी पराभव झाला. येथे ट्रम्पेटला 3582 मते मिळाली.  केज या मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाचे पृथ्वीराज साठे यांचा 2687 मतांनी पराभव झाला. दुसरीकडे याच मतदारसंघात ट्रम्पेटला 3559 मते मिळाली. परंडा या जागेवर राहुल मोटे यांचा 1509 मतांनी पराभव झाला. दुसरीकडे याच मतदारसंघात ट्रम्पेटला 4446 मते मिळाली. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीतही सातारा तसेच इतर लोकसभा मतदारसंघात ट्रम्पेट या निवडणूक चिन्हामुळे शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. त्याचीच प्रचिती आता यावेळच्या विधानसभा निवडणुकीतही आली.

हेही वाचा :

2 वर्षे तरी मुख्यमंत्रिपद मिळणार का? प्रीतिसंगमावर अजित पवार थेट म्हणाले, आमचं आम्ही...

आधी रोहित पवारांना खाली वाकून नमस्कार करायला लावलं, त्यानंतर शरद पवारांबाबत मोठं वक्तव्य केलं, नेमकं काय म्हणाले अजितदादा?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Milk : निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Ajit Pawar Rohit Pawar meet : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : ईव्हीएमसंदर्भात संजय राऊतांकडून शंका व्यक्त; म्हणाले आमच्याकडे  450 तक्रारीAjit Pawar Full PC : टायमिंग जुळलं नाही; शरद पवारांचेही आशीर्वाद घेतले असते - अजित पवारRohit Pawar on Ajit Pawar Meeting : अजित दादांचं 'ते' वक्तव्य; रोहित पवारांची कबुलीTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :25 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Milk : निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Ajit Pawar Rohit Pawar meet : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
Embed widget