आधी रोहित पवारांना खाली वाकून नमस्कार करायला लावलं, त्यानंतर शरद पवारांबाबत मोठं वक्तव्य केलं, नेमकं काय म्हणाले अजितदादा?
Maharashtra Politics: रोहित पवारांना दादांनी आग्रह करत खाली वाकून नमस्कार करायला लावला. त्यानंतर अजितदादांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी रोहित पवारांसोबतच्या भेटीबाबत बोलताना अजित पवारांनी शरद पवारांचाही उल्लेख केला. नेमकं काय म्हणाले दादा?
Ajit Pawar meet Rohit Pawar : पुणे : राज्यात विधासभा निवडणुकांचे निकाल (Vidhan Sabha Election Result 2024) जाहीर झाले असून यंदा जनतेनं सत्तेच्या चाव्या एकहाती महाविकास आघाडीकडे (Maha Vikas Aaghadi) सोपवल्या आहेत. अशातच लोकसभेत पराभवाची चव चाखलेल्या दादांनी विधानसभेत मात्र, काकांना पछाडलं. दादांच्या राष्ट्रवादीनं यंदाच्या निवडणुकीत 41 आमदार निवडून आणले. अशातच घवघवीत यशानंतर आज यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त अजित पवार स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहिले. त्यावेळी अजितदादा आणि रोहित पवारांची भेट झाली. दोघांमधील संवादही चर्चेचा विषय ठरला. एवढंच काय, रोहित पवारांना दादांनी आग्रह करत खाली वाकून नमस्कार करायला लावला. त्यानंतर अजितदादांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी रोहित पवारांसोबतच्या भेटीबाबत बोलताना अजित पवारांनी शरद पवारांचाही उल्लेख केला.
रोहित पवारांच्या भेटीबाबत बोलताना शरद पवारांबाबत नेमकं काय म्हणाले अजित पवार?
यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी प्रीतीसंगमावर अजित पवार आणि रोहित पवार उपस्थित होते. त्यावेळी दोघेही आमने-सामने आले. दोघांमध्ये मिश्किल सवांद झाला. अजित पवारांनी अगदी काका या नात्यानं हक्कानं रोहित पवारांना खाली वाकून नमस्कार करायला लावला. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी ते म्हणाले की, "मराठी संस्कृती आहे... आम्ही लवकर आलो असतो तर, साहेबांची (शरद पवारांची) भेट झाली असती... आम्ही दर्शन घेतलं असतं... टायमिंग जुळलं नाही... मी डिपार्मेंटवरही चिडलो... रोहितला मी शुभेच्छा दिल्यात..."
रोहित पवार आणि अजित पवारांच्या भेटीदरम्यान नेमकं काय घडलं?
रोहित पवार आणि अजित पवार आमने-सामने आले, रोहित पवारांनी अजित पवारांना पाहून हात जोडले...
अजित पवार : दर्शन घे दर्शन... काकाचं...
त्यानंतर रोहित पवारांनी अजित पवारांना वाकून नमस्कार केला...
अजित पवार : अरे ढाण्या थोडक्यात वाचलास... माझी सभा झाली असती तर, काय झालं असतं... बेस्ट ऑफ लक...
या संवादानंतर दोघेही निघून गेले...
काका अजित पवारांच्या भेटीनंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
रोहित पवार म्हणाले की, "अजित पवार माझे काका आहेत, म्हणून मी पाया पडलो... शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणं माझी जबाबदारी आहे..." माझी सभा झाली असती, तर अडचण झाली असती.. असं वक्तव्य देखील अजित पवारांनी केलं... त्याबाबत रोहित पवारांना विचारलं असता, "नक्कीच अजित पवारांची सभा झाली असती तर वर-खाली झालं असतं, उलटंही होऊ शकलं असतं. पण ते बारामतीमध्ये अडकून पडले होते, त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही. शेवटी अजित पवार मोठे नेते आहेत, निर्णय त्यांचा होता. त्यांचे आमदार देखील मोठ्या प्रमाणात निवडून आले आहे. चांगली गोष्ट आहे, मी त्यांचं अभिनंदन देखील केलं...", असं रोहित पवार म्हणाले.
पाहा व्हिडीओ : Rohit Pawar Meets Ajit Pawar : ढाण्या थोडक्यात वाचलास... दादांचा रोहित पवारांना टोला
महत्त्वाच्या इतर बातम्या :