एक्स्प्लोर

विधानसभेची खडाजंगी: बुलढाण्यात 7 विधानसभा मतदारसंघ, आमदारांची यादी, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय झालं होतं?

Maharashtra Politics: विदर्भातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा राहिलेल्या बुलढाण्यात विधानसभेचे एकूण सात मतदारसंघ आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यात भाजप-शिवसेना युतीचे वर्चस्व राहिले होते.

Buldhana District: राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांपैकी एक असणारा बुलढाणा जिल्हा अनेक धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. विदर्भात समावेश होणाऱ्या बुलढाणा जिल्ह्याचे क्षेत्रफळ 9680 चौ.किमी इतके आहे. बुलढाण्यात खामगाव, मलकापूर ही औद्योगिक शहरे आहेत. बुलढाणा जिल्ह्यात उल्कापाताने निर्मिलेले खाऱ्या पाण्याचे लोणार हे जगप्रसिद्ध सरोवर आहे. श्री संत गजानन महाराजांचे शेगाव येथील प्रसिद्ध मंदिरही बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात येते. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे गाव स्वराज्यजननी मातोश्री जिजाबाई यांचे जन्मस्थान आहे. बुलढाण्यातील मेहकर येथे शारंगधर बालजी देवस्थान आहे. बुलढाणा जिल्ह्यात खामगाव, चिखली, जळगाव जामोद, देऊळगाव राजा, नांदुरा, बुलढाणा, मलकापूर, मेहकर, मोताळा, लोणार, शेगाव, संग्रामपूर, सिंदखेड राजा हे 13 तालुके आहेत. 

बुलढाणा जिल्ह्यात कोणत्या पक्षाचे किती आमदार?

विदर्भातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा राहिलेल्या बुलढाण्यात विधानसभेचे एकूण सात मतदारसंघ आहेत. या सात मतदारसंघांमध्ये मलकापूर, मेहकर, बुलढाणा, अमळनेर, चिखली, जळगाव जामोद आणि सिंदखेड राजा या मतदारसंघांचा समावेश आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातील पाच मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार विजयी झाले होते. तर उर्वरित दोन मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी आमदार निवडून आला होता. मात्र, सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे बुलढाणा जिल्ह्यात यंदा विधानसभा निवडणुकीच्यावेळी रंगतदार चित्र पाहायला मिळणार आहे.


बुलढाणा जिल्ह्यातील आमदारांची यादी  (Buldhana MLA List)

* मलकापूर विधानसभा -  राजेश एकाडे (काँग्रेस)
* बुलढाणा शहर विधानसभा -  संजय गायकवाड (शिवसेना - शिंदे गट)
* चिखली विधानसभा -  श्वेता महाले (भाजप)
*  सिंदखेड राजा विधानसभा -  राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी काँग्रेस)
* मेहकर विधानसभा - संजय रायमूलकर (शिवसेना शिंदे)
* खामगाव विधानसभा - आकाश फुंडकर (भाजप)
* जळगाव जामोद विधानसभा - संजय कुटे (भाजप)


1. मलकापूर विधानसभा-  गेल्या विधानसभा निवडणुकीत मलकापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या राजेश एकाडे यांनी भाजपच्या चैनसुख मदनलाल संचेती यांचा पराभव केला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राजेश एकाडे यांना 86 हजार 276 मतं मिळाली होती. तर भाजपच्या चैनसुख संचेती यांना 71 हजार 892 मते मिळाली होती. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या नितीन नंदुरकर यांना 12 हजार 549 मते मिळाली होती.

2. बुलढाणा- 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बुलढाणा शहर विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे आक्रमक नेते संजय गायकवाड यांनी वंचित बहुजन आघाडीच्या विजय हरिभाऊ शिंदे  यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत संजय गायकवाड यांना 67,785 मते मिळाली होती. तर विजय शिंदे यांना 41,710 मते पडली होती. तर काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन सकपाळ 31 हजार 316 मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते.

3. चिखली- गेल्या विधानसभा निवडणुकीत चिखली विधानसभा मतदारसंघात भाजपच्या श्वेता महाले यांनी काँग्रेसच्या राहुल बोंद्रे यांचा निसटता पराभव केला होता. त्यांच्या विजयामुळे तब्बल 15 वर्षांनी चिखली विधानसभेत कमळ फुललं होतं. या निवडणुकीत श्वेता महाले यांनी 95515 मते मिळवली होती. तर राहुल बोंद्रे यांना 86,705 मते मिळाली होती. श्वेता महाले यांनी चिखलीतील जिल्हा परिषदेच्या उंद्री सर्कलचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यांनी जिल्हा परिषदेत महिला बालकल्याण सभापती म्हणूनही काम पाहिले. त्यांनी सभापती असताना सर्कलसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणत विभागातील कामे केली होती. या मिनी मंत्रालयाचा अनुभव घेतल्यानंतर श्वेत महाले थेट विधानसभेसाठी उभ्या राहिल्या आणि पहिल्याच प्रयत्नात विजयी झाल्या होत्या.

4. सिंदखेड राजा- सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र शिंगणे यांनी शिवसेनेच्या शशिकांत खेडेकर यांचा तब्बल 10 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला होता. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र शिंगणे यांना 81,701 मते पडली होती. तर शिवसेनेच्या शशिकांत खेडेकर यांना 72 हजार 763 मते मिळाली होती.

5. मेहकर- गेल्या विधानसभा निवडणुकीत मेहकर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या संजय रायमुलकर यांनी काँग्रेसच्या अनंत वानखेडे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. या निवडणुकीत संजय रायमुलकर यांना 1 लाख 12 हजार 038 मते पडली होती.  तर दुसऱ्या क्रमांकावरील अनंत वानखेडे यांना 49 हजार 836 मते मिळाली होती. 

6. खामगाव- खामगाव विधानसभा मतदारसंघात 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या आकाश फुंडकर यांनी काँग्रेस पक्षाच्या ज्ञानेश्वर पाटील यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत आकाश फुंडकर यांना 90 हजार 757 मते पडली होती. तर काँग्रेसच्या ज्ञानेश्वर पाटील यांना 73 हजार 789 मते मिळाली होती. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या शरद वसतकर यांना 25 हजार 957 मते मिळाली होती.

7. जळगाव जामोद- गेल्या विधानसभा निवडणुकीत जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात भाजपच्या संजय कुटे यांनी काँग्रेसच्या डॉ. स्वाती वाकेकर यांचा पराभव केला होता. वंचित बहुजन आघाडीचे संगीतराव भोंगळ या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर राहिले होते. या निवडणुकीत संजय कुटे 1,02, 735 मते मिळवून विजयी झाले होते. तर काँग्रेसच्या स्वाती वाकेकर यांना 67,504 मते मिळाली होती.  तर तिसऱ्या स्थानावरील संगीतराव भोंगळ यांना 29 हजार 985 मते मिळाली होती.

आणखी वाचा

विधानसभेची खडाजंगी: अहमदनगरमध्ये 12 विधानसभा मतदारसंघ, आमदारांची यादी, जाणून घ्या सध्याची राजकीय स्थिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Astrology : काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manisha Kayande on Raj Thackeray : राज ठाकरे कुठल्या वेळी बोलले? सकाळी की संध्याकाळी बघावं लागेलNawab Malik : फडणवीसांना झापलं;सदाभाऊंना फटकारलं, अजित पवार मर्द, नवाब मलिक EXCLUSIVEMitali Thackeray Mahim Vidhan Sabha : बायकोची नवऱ्याला खंबीर साथ, Amit साठी मिताली ठाकरे मैदानातDevendra Fadanvis Nagpur : लाल पुस्तक घेऊन अर्बन नक्षल्यांची मदत घेण्याची नौटंकी - फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Astrology : काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
Jammu & Kashmir : कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
Embed widget