एक्स्प्लोर

Ajit Pawar in Beed: अजित पवारांनी बीडमध्ये पाऊल ठेवताच धनुभाऊ स्वागताला पोहोचले, डीपीडीसीच्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा

Ajit Pawar & dhananjay Munde: अजित पवार सकाळीच बीडमध्ये दाखल, धनंजय मुंडे, सुरेश धस, पंकजा मुंडे, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनावणे डीपीडीसीच्या बैठकीत एकत्र येणार

बीड: राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्याकडे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा देण्यात आल्यानंतर ते गुरुवारी पहिल्यांदाच बीडच्या दौऱ्यावर आले आहेत. अजित पवार (Ajit Pawar) गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बीडमध्ये पोहोचले. यावेळी अजित पवार यांच्या स्वागतासाठी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे जातीने हजर होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही याठिकाणी मोठी गर्दी केली होती. याशिवाय, गेवराईचे आमदार विजयसिंह पंडितही अजितदादांच्या स्वागताला उपस्थित होते. अजित पवार आता बीडच्या (Beed News) शासकीय विश्रामगृहावर जातील. यानंतर ते पालकमंत्री म्हणून बीडच्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) बैठकीला हजेरी लावणार आहेत.

सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बीडमध्ये डीपीडीसीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. कारण या बैठकीला अजित पवार, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, सुरेश धस, बजरंग सोनावणे, संदीप क्षीरसागर हे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे या बैठकीला धनंजय मुंडे हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहतील, असे सांगितले जात होते. मात्र, धनंजय मुंडे प्रत्यक्षात या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची नवी माहिती आता पुढे आली आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर सातत्याने आरोप करणारे सुरेश धस हेदेखील बैठकीला उपस्थित असतील. धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री असताना विकासकामांची तब्बल 70 कोटींची बोगस बिले काढण्यात आली, असा आरोप सुरेश धस यांनी केला होता. त्यामुळे ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. या बैठकीत अजित पवार, सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे नेते आमनेसामने आल्यावर काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

दरम्यान, अजित पवार बीडमध्ये आल्यानंतर त्यांचे स्वागत करताना धनंजय मुंडे उत्साहात दिसत होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांनी हसतखेळत संवाद साधताना दिसून आले. धनंजय मुंडे यांनी बुधवारी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली होती. धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा, यासाठी महायुती अंतर्गत दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी भाजपच्या केंद्रीय नेत्याची घेतलेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. योगायोगाने या काळात देवेंद्र फडणवीस हेदेखील दिल्लीत होते. धनंजय मुंडे आणि प्रल्हाद जोशी यांच्या बैठकीत नेमके काय घडले, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.

आणखी वाचा

धनंजय मुंडे दिल्लीत, राजीनाम्याचा निर्णय दिल्ली दरबारी?; राजकीय दबाव वाढला, नेमकं काय घडतंय?

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget