विधानसभा निवडणूकांसाठी देवेंद्र फडणवीसांचे बिगुल, विभागनिहाय बैठकांमध्ये या मुद्द्यांवर घेतला जातोय आढावा
राज्यात मराठा आरक्षण प्रश्न तापत असताना आमदारांना त्याबाबत महत्वाच्या सूचना दिल्याचं दिसत आहे.
![विधानसभा निवडणूकांसाठी देवेंद्र फडणवीसांचे बिगुल, विभागनिहाय बैठकांमध्ये या मुद्द्यांवर घेतला जातोय आढावा Maharashtra Politics Devendra Fadanavis review before Vidhansabha election Marathwada MLA Maratha reservation Maharashtra Politics विधानसभा निवडणूकांसाठी देवेंद्र फडणवीसांचे बिगुल, विभागनिहाय बैठकांमध्ये या मुद्द्यांवर घेतला जातोय आढावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/05/61e181fc3578f3048fc04ce788aedd02_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Vidhansabha Update: महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीची (Vidhansabha Election 2024) रणधुमाळी आता सुरु झाली असून विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात केलीये. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी(Devendra Fadanavis) विभागनिहाय बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. परवा मराठवाड्यातील आमदारांची बैठक घेतली. काल कोकण विभागातील आमदारांची बैठक घेतली. राज्यात मराठा आरक्षण प्रश्न तापत असताना मराठा आरक्षण विरोधकांचं पाप असल्याचं लोकांच्या पचनी पाडा यासह अनेक महत्वाच्या मुद्द्यांचा आढावा या बैठकीमध्ये फडणवीसांकडून विभागातल्या आमदारांकडून घेण्यात येत आहे.
आपल्या विभागात भाजप किती जागा राखू शकेल
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागनिहाय घेतलेल्या बैठकीत आमदारांना आपल्या विभागात भाजप किती जागा राखू शकेल. कोणत्या जागा भाजप गमावू शकतो, याची चाचपणी करण्याच्या सूचना आमदारांना देण्यात आल्या आहेत. कोणला फायदा होणार, कोणाला तोटा होणार यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.
कोणतं विकासकाम केलं तर भाजपला फायदा
येत्या 2 महिन्यात कुठलं विकास काम केलं तर भाजपला फायदा होईल हे सुचवा असे आमदारांना भाजपकडून सांगण्यात आलं आहे. मतदानाचं पारडं फिरवणारी विकास काम करा असं सांगण्यात आलं असून निधी कमी पडणार नाही अशा सूचना देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
मराठा आरक्षणाबाबत महत्वाच्या सूचना
मराठवाड्यात मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापल्याचे चित्र असताना आमदारांच्या विभागनिहाय बैठकांमध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्नावर प्रामुख्यानं चर्चा झाल्याचं दिसून आलं आहे. मराठा आरक्षण हे विरोधकांचे पाप असल्याचं लोकांच्या पचनी पाडा, मराठा संघटनांच्या विरोधाला कसे सामोरं जायचं यावर चर्चा करण्यात आली असून संघटना मजबूत करा, मित्रपक्षांची नाराजी असल्यास दूर करा, स्थानिक पक्ष संघटना, जवळीक साधा.. अशा सूचना आमदारांना करण्यात आल्यात.
लोकसभेला बसला धक्का
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजला अपेक्षित यश न मिळाल्याने भाजप विधानसभेसाठी जोरदार तयारी करताना दिसत आहे. लोकसभेत NDA (महायुती) ला महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 पैकी फक्त 17 जागा मिळाल्या होत्या. 2019 मधील 23 वरून भाजपच्या जागांची संख्या यावेळी केवळ 9 झाली. तर शिवसेनेला 7 तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)