एक्स्प्लोर

आयारामांना पायघड्या, आयात केलेल्या नेत्यांची चांदी, पक्षप्रवेश करताच 7 जणांना उमेदवारी

Maharashtra Politics : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेत्यांनी पक्षांतर केलय. तर काही जणांनी घरवापसी केली आहे. दरम्यान, पक्षांतर करताच अनेकांना फळ मिळालय.

Maharashtra Politics : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेत्यांनी पक्षांतर केलय. तर काही जणांनी घरवापसी केली आहे. दरम्यान, पक्षांतर करताच अनेकांना फळ मिळालय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आयात केलेल्या दोघांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय. तर राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटातून दोन नेत्यांची घरवापसी करुन घेतलीये. तर धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर शरद पवारांनी 3 आयात केलेल्या नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने काँग्रेस आमदाराला आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आयात नेत्यांची चांदी झालीये. जाणून घेऊयात कोणा कोणाला उमेदवारी मिळालीये. 

अर्चना पाटलांना अजित पवारांकडून उमेदवारी 

अर्चना पाटील भाजपमध्ये होत्या. त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर अजित पवार यांनी अर्चना पाटलांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. अर्चना पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर मैदानात आहेत. 

आढळराव पाटलांच्या हाती घड्याळ, शिरुरमधून लोकसभा लढवणार 

शिवाजी आढळराव पाटील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत होते. त्यांनी उमेदवारी मिळावी यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. अजित पवारांनी आढळराव पाटलांना शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली.

राजू पारवे शिंदे गटात, रामटेकमधून शड्डू ठोकला 

काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिंदे यांनी लागलीच रामटेक लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर केली. राजू पारवेंची लढत कॉंग्रेसच्या श्याम बर्वे यांच्याशी असणार आहे.

भाजप नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंकडून जळगावमधून उमेदवारी 

पाचोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार भाजपमध्ये होते. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याची लढत भाजपच्या स्मिता वाघ यांच्याशी असणार आहे.

बजरंग सोनवणेंनी अजित पवारांची साथ सोडली, शरद पवारांकडून तिकिट  

बजरंग सोनवणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये होते. त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. भाजपने बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना मैदानात उतरवले आहे. 

लंकेंची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी, विखेंविराधात थंड थोपटले 

आमदार निलेश लंके यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी आमदारकीचा राजीनामा दिला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत लंके शरद पवारांच्या गटात दाखल झाले. शरद पवारांनी लंकेंना अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. लंकेंचा सामना भाजपच्या सुजय विखे यांच्याशी असणार आहे. 

धैर्यशील मोहितेंना पवारांकडून माढातून उमेदवारी मिळण्याची शक्यता 

गेल्या 5 वर्षापासून राजकारणापासून अंतर ठेवून असलेले सोलापुरातील मोहिते पाटील घराणे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत  रविवारी (दि.15) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर धैर्यशील मोहिते माढा लोकसभा लढवणार हे जवळपास निश्चित झाले आहे.  त्यांच्यासमोर भाजपचे रणजित निंबाळकर यांचे तगडे आव्हान आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

पाटील -निंबाळकरांमध्ये ठिणगी पडली, घराणेशाहीवर तुटून पडले, राणा पाटलांकडून ओमराजेंचा पुन्हा 'बाळ' म्हणून उल्लेख

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Embed widget