एक्स्प्लोर

BJP Candidate list: प्रकाश आंबेडकरांच्या अकोल्यात भाजपने उमेदवार बदलला, कोण कोण रिंगणात?

Maharashtra Loksabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकूण 20 उमेदवारांचा समावेश आहे. नितीन गडकरी यांना नागपूर, नगरमधून सुजय-विखे पाटील, माढामधून रणजीत निंबाळकर, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई: भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी बुधवारी महाराष्ट्रातील 20 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली. गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळाला महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांच्या यादीबाबत उत्सुकता लागून राहिली होती. अखेर भाजपने यामध्ये आघाडी घेत आपल्या 20 उमेदवारांची नावे (BJP Candidate list) जाहीर केली आहेत. यामध्ये अकोल्यातून भाजपने अनुप धोत्रे (Anup Dhotre) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 2019 मध्ये अकोल्यातून भाजपचे संजय धोत्रे (Sanjay Dhotre) निवडून आले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून संजय धोत्रे यांची प्रकृती खालावली आहे. अंथरुणाला खिळून असल्याने ते बराच काळ सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह हे अकोला दौऱ्यावर आले होते. तेव्हाही खासदार संजय धोत्रे हे अकोल्यातील भाजपच्या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे भाजप नेतृ्त्त्वाने संजय धोत्रे यांच्याऐवजी त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना अकोल्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. 

अकोल्यातून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी अगोदरच स्वत:ची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता अकोल्यात प्रकाश आंबडेकर विरुद्ध अनुप धोत्रे अशी हायव्होल्टेज लढत रंगणार आहे.  अकोल्यामध्ये अकोट, बालापूर, अकोला पश्चिमस, अकोला पूर्व, मूर्तिजापूर आणि रिसोड हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे आता याठिकाणी कोण बाजी मारणार, हे आता पाहावे लागेल. सध्या प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाविकास आघाडीसोबत जागावाटपाची बोलणी करत आहे. या चर्चेअंती वंचित आणि महाविकास आघाडी एकत्र आल्यास अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांनी मोठे बळ मिळणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांना संजय धोत्रे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर 2014 मध्ये प्रकाश आंबेडकर अकोल्यातून तिसऱ्या स्थानावर होते. अकोला लोकसभा मतदारसंघ हा गेल्या 30 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला आहे. केवळ 1999 मध्ये प्रकाश आंबेडकर भारिप बहुजन महासंघाच्या तिकीटावर अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे आता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर त्याची पुनरावृत्ती करणार का, हे आता पाहावे लागेल. 

कोण आहेत अनुप धोत्रे?

भाजपचे अकोला लोकसभा प्रमुख असलेल्या अनुप धोत्रे यांना वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी खासदारकीची निवडणूक लढवण्याची संधी चालून आली आहे. पुण्याच्या सिंबायोसिस महाविद्यालयातून अनुप धोत्रे यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांचे वडील संजय धोत्रे हे गेल्या अनेक वर्षांपासून अकोला लोकसभा मतदारसंघावर एकहाती वर्चस्व राखून आहेत. अनुप धोत्रे यांच्याकडे आपल्या वडिलांप्रमाणेच संघटनकौशल्य आहे. त्यामुळे अकोल्यातील भाजप कार्यकर्त्यांशी त्यांचा चांगला संपर्क आहे. मात्र, या सर्वानंतरही त्यांची सर्व मदार ही त्यांचे वडील संजय धोत्रे यांच्या राजकी पुण्याईवर अवलंबून आहे. अनुप धोत्रे यांचा अकोला औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग समूह आहे. त्यात अनुप इंजिनीअरिंग वर्क्स, सोनल इंजिनीअरिंग वर्क्स, नकुल इंडस्ट्रीज, स्प्रिंकलर सेट, एचडीपीई पाईप्स उत्पादन, रेपोल प्लास्टिकसाठी, थर्मल पॉवर प्लांटसाठी जॉब वर्क, अन्न प्रक्रिया युनिट, बांधकाम आणि शहरी भू-विकास आदींचा त्यात समावेश आहे.

भाजपने महाराष्ट्रातील 4 उमेदवारांचं तिकीट कापलं

भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांच्या यादीत 4 बड्या खासदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. बीडमधून प्रीतम मुंडे, उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी, ईशान्य मुंबईतून मनोज कोटक आणि जळगावमधून उन्मेष पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी बीडमध्ये पंकजा मुंडे, उत्तर मुंबईतून पियूष गोयल, ईशान्य मुंबईतून मिहीर कोटेचा आणि जळगावमधून स्मिता पाटील यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे.

आणखी वाचा

भाजपची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मुरलीधर मोहोळ यांच्यासह 20 जणांची नावं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तुमचा आणि आझादीच्या लढ्याचा संबंध काय? तुमची जिंकायची औकात नाही म्हणून ED, CBI घुसवताय; उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
तुमचा आणि आझादीच्या लढ्याचा संबंध काय? तुमची जिंकायची औकात नाही म्हणून ED, CBI घुसवताय; उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
Chhagan Bhujbal : बारामतीतील सांगता सभेत छगन भुजबळ बोलताना सुप्रिया सुळेंची एंन्ट्री; दादांच्या नावानं घोषणा, पवार कुटुंबीयांसाठी भावूक क्षण
बारामतीतील सांगता सभेत छगन भुजबळ बोलताना सुप्रिया सुळेंची एंन्ट्री; दादांच्या नावानं घोषणा, पवार कुटुंबीयांसाठी भावूक क्षण
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक
लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News : लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
Share Market : सेन्सेक्स निफ्टी सुस्साट, शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांनी 3 लाख कोटी कमावले, कारण समोर
शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांनी 3 लाख कोटी कमावले, ट्रम्प कनेक्शन समोर
फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 1 ठार चार गंभीर जखमी, अनधिकृत फटाके कारखान्यांचा सुळसुळाट
फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 1 ठार चार गंभीर जखमी, अनधिकृत फटाके कारखान्यांचा सुळसुळाट
Dharashiv : धाराशिव जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्लिश शिक्षणाचा प्रयोग; 1068 प्रस्ताव सादर
धाराशिव जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्लिश शिक्षणाचा प्रयोग; 1068 प्रस्ताव सादर
लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक
लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
Raja Shivaji Movie: राजा शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील नजर खिळवून ठेवणाऱ्या 15 फ्रेम्स, वाघनखं अन् अफजलखानाच्या वधाचा प्रसंग
राजा शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील नजर खिळवून ठेवणाऱ्या 15 फ्रेम्स, वाघनखं अन् अफजलखानाच्या वधाचा प्रसंग
Pahalgam Attack Adil Shah House Eknath Shinde: पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिलं, एकनाथ शिंदेंचा फोटो देवासारखा भिंतीवर लावला!
पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिलं, एकनाथ शिंदेंचा फोटो देवासारखा भिंतीवर लावला!
Embed widget