एक्स्प्लोर

 जानकरांच्या महायुतीत जाण्याने डाव उलटला, पण शरद पवार आता माढात शेवटचा पत्ता टाकणार?

Madha LokSabha constituency : माढा लोकसभा मतदारसंघातून रासपचे नेते महादेव जानकर यांना त्यांच्या कोट्यातून उमेदवारी द्यावी, अशा चर्चा शरद  पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये रंगू लागल्या होत्या.  

Madha LokSabha constituency : माढा लोकसभा मतदारसंघातून रासपचे नेते महादेव जानकर यांना त्यांच्या कोट्यातून उमेदवारी द्यावी, अशा चर्चा शरद  पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये रंगू लागल्या होत्या. महादेव जानकर यांना ही जागा दिली तर बारामती आणि माढा दोन्ही मतदारसंघात धनगर समाजाचा पाठिंबा मिळेल, असा विचार शरद पवार गटाने सुरु केला होता. मात्र, महादेव जानकर थेट महायुतीच्या बैठकीत पोहोचले. महायुतीने त्यांना लोकसभेची 1 जागा जाहीर केली. शिवाय जानकर यांनीही महायुतीमध्येच राहणार असे स्पष्ट केले. त्यामुळे शरद पवारांनी टाकलेला डाव महायुतीकडून उलटवण्यात आलाय. 

शरद पवार आता माढात शेवटचा पत्ता टाकणार ?

महायुतीमध्ये माढाची जागा भाजपच्या वाट्याला आहे. माढातून भाजपने विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली असली तरीही माढा लोकसभा मतदारसंघात मोहिती पाटलांचीही ताकद आहे. निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने मोहिते पाटलांचा गट नाराज असल्याचेही व्हिडीओ समोर आले होते. धैर्यशील मोहिते पाटील लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याचेही समोर आले होते. समोरील पक्षातून महत्वकांक्षी नाराज उमेदवार आपल्याकडे घेण्यात शरद पवार चतूर आहेत. जानकर महायुतीत गेल्यानंतर शरद पवार मोहिते पाटलांच्या रुपाने शेवटचा पत्ता टाकू शकतात. 

मोहिते पाटलांशी असलेले जुने संबंध कामी येणार ?

राज्याच्या राजकारणात गेल्या 3 वर्षात अनेकदा उलथापालथ झाली आहे. भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जायचे. मात्र, 2019 मध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, तरिही शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे ऋणानुबंध कमी झालेले नाहीत. काही महिन्यांपूर्वी  प्रकृतीची चौकशी करण्यासाठी शरद पवार थेट मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यामुळे शरद पवार यांचे जुने संबंध आगामी लोकसभा निवडणुकीत कामी येणार का? असा प्रश्न निर्माण झालाय. 

तुतारी हाती घ्या, मोहिते पाटलांचे कार्यकर्ते आक्रमक  

भाजप मोहिते पाटील घरण्याला संपवू पाहत आहे. शिवाय राज्यात भाजपच्या विरोधात वातावरण आहे. तुम्ही शांत राहिलात तर तुमचे नेतृत्व तालुक्यापुरते मर्यादित ठेवतील.  त्यामुळे भाजप सोडा तुतारी हाती घ्या, अशा घोषणाच्या मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत दिल्या आहेत. दरम्यान, लोकभावना जाणून घेऊनच राजकीय निर्णय घेणार, असं धैर्यशील मोहिते पाटील यांनी जाहिर केलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महादेव जानकर महायुतीमध्ये राहणार, रासपला 1 जागा सोडणार, सुनील तटकरेंची मोठी घोषणा

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Loksabha : लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर
लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर
खोडसाळपणासाठी लिहिलेल्या पत्राची चौकशी झालीच पाहिजे; रुपाली चाकणकर 28 दिवसांनी बोलल्या, आरोपकर्त्यांना सवाल
खोडसाळपणासाठी लिहिलेल्या पत्राची चौकशी झालीच पाहिजे; रुपाली चाकणकर 28 दिवसांनी बोलल्या, आरोपकर्त्यांना सवाल
आशाताईंच्या अंत्यविधीबाबत मिलिंद देवरांचं राजकीय पक्षाला उद्देशून ट्विट; 'लाचार' म्हणत काँग्रेसचा पलटवार, वाद टोकाला
आशाताईंच्या अंत्यविधीबाबत मिलिंद देवरांचं राजकीय पक्षाला उद्देशून ट्विट; 'लाचार' म्हणत काँग्रेसचा पलटवार, वाद टोकाला
Nitish kumar : मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा

व्हिडीओ

Sanjay Raut On Anjali Damania : दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, चांगला काम करत आहे, राऊतांचा निशाणा
Kolhapur Babasaheb Ambedkar Statue : बाबासाहेब हयात असताना कोल्हापुरात उभरलेला पुतळा Special Report
Praniti Shinde : भोंदू अशोक खरातचा एन्काऊंटर करतील,प्रणिती शिंदेंचा मोठा दावा
Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praful Hinge: प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
Gautam Gambhir : गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
बदलापूरच्या पत्रकारांसाठी नगरपालिकेत कक्ष देणार; डिजिटल पत्रकार संघटनेच्या सोहळ्यात नगराध्यक्षा घोरपडेंचा शब्द
बदलापूरच्या पत्रकारांसाठी नगरपालिकेत कक्ष देणार; डिजिटल पत्रकार संघटनेच्या सोहळ्यात नगराध्यक्षा घोरपडेंचा शब्द
Loksabha : लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर
लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 एप्रिल 2026 | मंगळवार
Hatkanangale : रात्रीस खेळ चाले! नारळ, कापड, बाहुली अन् टाचण्या... हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस
रात्रीस खेळ चाले! नारळ, कापड, बाहुली अन् टाचण्या... हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस
Summer Heat wave: राज्यात उष्णतेची लाट, अकोल्यात सर्वाधिक 44 अंश तापमान; राज्य सरकारकडून तीन व्यापक SOP जारी
राज्यात उष्णतेची लाट, अकोल्यात सर्वाधिक 44 अंश तापमान; राज्य सरकारकडून तीन व्यापक SOP जारी
आशाताईंच्या अंत्यविधीबाबत मिलिंद देवरांचं राजकीय पक्षाला उद्देशून ट्विट; 'लाचार' म्हणत काँग्रेसचा पलटवार, वाद टोकाला
आशाताईंच्या अंत्यविधीबाबत मिलिंद देवरांचं राजकीय पक्षाला उद्देशून ट्विट; 'लाचार' म्हणत काँग्रेसचा पलटवार, वाद टोकाला
Embed widget