Ravindra Dhangekar : मविआचा अशिक्षित उमेदवार, सोशल मीडियावर ट्रोलिंग, प्रत्युत्तर देताना रवींद्र धंगेकर म्हणाले...
पुण्यात महाविकास आघाडीचे तगडे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची दणक्यात प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र त्यांंना शिक्षणामुळे ट्रोल केलं जात आहे.
पुणे : पुण्यात महाविकास आघाडीचे ( Pune Lok Sabha Constituency) तगडे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांची दणक्यात प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र त्यांंना शिक्षणामुळे ट्रोल केलं जात आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. त्यात शिक्षणाचं माहेरघर असलेला उमेदवारच आठवी पास, अशा आशयाचा मजकूर या पोस्टवर लिहिण्यात आला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रवींद्र धंगेकरांनी त्यावर सडेतोड उत्तर दिलं आहे. माझी पीएचडी जनतेने स्वीकारली आहे त्यामुळे विरोधकांनी माझं शिक्षण काढणं म्हणजे दूतखुळेपणा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
सोशल मीडिया पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय?
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रवींद्र धंगेकर हे अशिक्षित उमेदवार असल्याची टिपणी विरोधकांनी केली होती.' मविआचा उमेदवार अशिक्षित. रवींद्र धंगेकर फक्त आठवी पास. शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्याचा उमेदवार अशिक्षित ', असं या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे. या पोस्टमधून विरोधकांनी धंगेकरांवर टीका केली खरी मात्र धंगेकरांनी आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं आहे.
धंगेकर नेमकं काय म्हणाले ?
अनेक नेत्यांचे पीएचडीचे सर्टीफिकेट होतेत पण दडपले गेले. मी कोणाचं नाव घेत नाही. महाराष्ट्रात कर्मवीर भाऊंनी शाळा सुरु केल्या, झाडाखाली शिक्षण दिलं, त्यांचे शिक्षण काढणार का? वंसतदादा पाटलांनी मेडिकल उघडली, त्यांचे शिक्षण काढणार का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पुणेकर जनतेने मागील 30 वर्षांपासून मला पीएचडीचं सर्टिफिकेट दिलं आहे. पुणेकर जनतेला नक्की काय लागतं हे मला माहित आहे. त्यांना जे लागतं ते मी त्यांना देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. या सगळ्यांना माझ्या शिक्षणाशी काहीही देणं घेणं नाही आहे, असं म्हणत त्यांनी पोस्ट व्हायरल करणाऱ्या विरोधकांना चांगलंच फटकारलं आहे.
Who is धंगेकर...? धंगेकर ईज नाऊ MLA
या पूर्वी कसबा विधानसभा लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्यावेळी 'हू इज धंगेकर', म्हणत भाजपने धंगेकरांवर टीका केली होती. दरवेळी भाषणात हू इज धंगेकर म्हणत त्यांच्यावर हल्लाबोल करण्यात येत होता. मात्र निकाल लागताच आणि विजयी होताच धंगेकरांनी धंंगेकर इज नाऊ MLA, असं म्हटलं होतं. विधानसभेच्या वेळी विरोधकरांना धंगेकरांना हिणवणं चांगलंच महागात पडलं होतं.
इतर महत्वाची बातमी-