एक्स्प्लोर

BJP Candidate list: भाजपच्या महाराष्ट्रातील 20 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर, मुंबईत बड्या खासदारांचा पत्ता कट, मोदी-शाहांनी धक्कातंत्र वापरलंच

Loksabha Election 2024: नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी तर चंद्रपुरमधून सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच्या रिंगणातून उतरवण्यात आले आहे. मात्र, मुंबईत अपेक्षेप्रमाणे भाजपने धक्कातंत्राचा वापर केला. मुंबईतील एकूण सहा लोकसभा मतदारसंघांपैकी दोन उमेदवारांची नावे भाजपकडून जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात भाजपचे उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागून राहिली होती. अखेर भाजपने बुधवारी संध्याकाळी महाराष्ट्रातील एकूण 20 उमेदवारांची (BJP Candidate List) यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये मोदी-शाह यांनी काही ठिकाणी धक्कातंत्राचा वापर केला आहे. तर काही ठिकाणी विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी तर चंद्रपुरमधून सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच्या रिंगणातून उतरवण्यात आले आहे. मात्र, मुंबईत अपेक्षेप्रमाणे भाजपने धक्कातंत्राचा वापर केला. मुंबईतील एकूण सहा लोकसभा मतदारसंघांपैकी दोन उमेदवारांची नावे भाजपकडून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये उत्तर मुंबई आणि ईशान्य मुंबई मतदारसंघाचा समावेश आहे. या दोन्ही मतदारसंघातून विद्यमान खासदारांची तिकीटं कापण्यात आली आहेत. उत्तर मुंबईत पियूष गोयल (Piyush Goyal) आणि ईशान्य मुंबईतून मिहिर कोटेचा (Mihir Kotecha) यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. 

भाजपची उमेदवारी  जाहीर  

१) चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार 
२) रावेर - रक्षा खडसे 
३) जालना- रावसाहेब दानवे 
४) बीड पंकज मुंडे   
५) पुणे- मुरलीधर मोहोळ 
६) सांगली - संजयकाका पाटील
७) माढा- रणजीत निंबाळकर 
 ८) धुळे - सुभाष भामरे 
९) उत्तर मुंबई- पियुष गोयल 
१०)  उत्तर पूर्व- मिहीर कोटेचा
११) नांदेड- प्रतापराव चिखलीकर 
१२) अहमदनगर- सुजय विखे पाटील
१३) लातूर- सुधाकर श्रृंगारे
१४) जळगाव-  स्मिता वाघ 
१५) दिंडोरी- भारत पवार
१६)  भिवंडी- कपिल पाटील 
१७) वर्धा - रामदास तडस 
१८)  नागपूर- नितीन गडकरी 
१९) अकोला- अनुप धोत्रे 
२०) नंदुरबार- डॉ. हिना गावित

कुणाकुणाची तिकीटं कापली? 

भाजपने महाराष्ट्रातील दिग्गजांची नावं जाहीर केली असली तरी अनेक दिग्गजांनी नावं कापली आहेत. यामध्ये प्रामुख्याने भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांचं नाव आहे. गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य पियुष गोयल (Piyush Goyal) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

याशिवाय बीडमधून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना तिकीट दिल्याने, त्यांची बहीण प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापलं गेलं आहे.  दुसरीकडे उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात आमदार मिहीर कोटेचा यांना तिकीट देऊन, भाजपने मनोज कोटक (Manoj Kotak) यांना धक्का दिला. जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट देऊन भाजपने स्मिता वाघ (Smita Wagh) यांना तिकीट दिलं. तिकडे अकोल्यात खासदार संजय धोत्रे यांच्याऐवजी मुलगा अनुप धोत्रे यांना तिकीट दिलं.

आणखी वाचा

भाजपची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मुरलीधर मोहोळ यांच्यासह 20 जणांची नावं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्याBig Fight Vidarbh : प्रचारानंतरचा विचार काय? पश्चिम विदर्भात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Embed widget