एक्स्प्लोर

बीडमध्ये फेर मतमोजणी नाहीच, पंकजा मुंडेंची मागणी फेटाळली; बजरंग सोनवणेंच दिल्लीला जाणार

गेवराई, बीड आणि केजमधून बजरंग सोनवणेंना लीड मिळाला असून परळी, आष्टी, माजलगाव मतदारसंघातून पंकजा मुंडेंना आघाडी मिळाली आहे.

बीड : राज्याचं लक्ष लागलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेंच्या (Bajrang Sonawane) विजयावर शिक्कामोर्तब झालं आहे. बजरंग सोनवणे यांनी 6 हजार 585 मतांनी पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) पराभव केला. मात्र, 30 व्या फेरीनंतर येथील मतदारसंघातील मतमोजणीचा काही वाद समोर आला होता. त्यावेळी, बीड आणि गेवराई मतदारसंघातून फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने पंकजा मुंडेंची फेरमतमोजणीची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे, आता बजरंग सोनवणेंचा विजय अतिम मानला जात असून बीडकरांचे लोकप्रतिनीधी बनून बजरंग सोनवणेच दिल्लीला जाणार आहेत.  

गेवराई, बीड आणि केजमधून बजरंग सोनवणेंना लीड मिळाला असून परळी, आष्टी, माजलगाव मतदारसंघातून पंकजा मुंडेंना आघाडी मिळाली आहे. मात्र, सुरुवातीपासूनच अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या सर्वच फेऱ्यांमध्ये मतदानाची आकडेवारी पाहून निकालाची उत्कंठा अधिकच वाढत होती. मतदार, कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या काळाजातही धाकधूक वाढली होती. अखेर, 32 व्या मतमोजणीच्या फेरीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बजरंग सोनवणेंना विजयी घोषित केले आहे. तत्पूर्वी  शेवटच्या काही फेऱ्या सुरू असतानाच पंकजा मुंडे यांच्याकडून फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे करण्यात आली होती ती मागणी अखेर प्रशासनाने फेटाळून लावली आहे.

केवळ पोस्टल मतदानास नाही, तर बीड विधानसभा मतदारसंघ आणि गेवराई विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी पुन्हा करण्याची मागणी पंकजा मुंडे यांच्या प्रतिनिधीकडून करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने 6000 पेक्षा जास्त मताने बजरंग सोनवणे हे निवडून आल्याचे सांगत, पंकजा मुंडेंनी केलेली मागणी फेटाळून लावली आहे. 

जरांगेंच्या आंदोलनाचा फायदा

बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वांत तापलेला पाहायला मिळाला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे आणि मनोज जरांगे फॅक्टरमुळे मराठवाड्यातील अनेक जागांवर भाजपला पराभव स्वीकारावा लागल्याच्या चर्चा आहेत. बीडमध्ये लोकसभा निवडणुकीत सर्वांत मोठा परिणाम मराठा आरक्षण आंदोलनाचा झाला असून बजरंग सोनवणेंच्या विजयाला हे आंदोलन व जरांगे कारणीभूत ठरल्याचं सांगितलं जात आहे. कारण, ऐन निवडणुकांत ओबीसी विरुद्ध मराठा या वादाने बीड लोकसभा मतदारसंघात चांगलाच जोर धरला होता. त्याचा थेट लाभ उमेदवार बजरंग सोनवणे यांना झाल्याचं दिसून येत आहे.  

बीड लोकसभा मतदार संघात कोण कोणत्या फेरीत आघाडीवर ?

पहिली फेरी - बंजरंग सोनवणे 1359 मतांनी आघाडीवर

दुसरी फेरी - बजरंग सोनवणे 2349 मतांनी आघाडीवर  

सहावी फेरी - बजरंग सोनवणे 1387 मतांनी आघाडीवर 

सातवी फेरी - बजरंग सोनवणे 203 मतांनी आघाडीवर 

दहावी फेरी - पंकजा मुंडे 11955 मतांनी आघाडीवर

11 वी फेरी - पंकजा मुंडे 2111 मतांनी आघाडीवर

12 वी फेरी - बजरंग सोनवणे 1644 मतांनी आघाडीवर 

13 वी फेरी - बजरंग सोनवणे 6473 मतांनी आघाडीवर

15 वी फेरी - पंकजा मुंडे 3093 मतांनी आघाडीवर 

18 वी फेरी - पंकजा मुंडे 24099 मतांनी आघाडीवर 

19 वी फेरी - पंकजा मुंडे 24361 मतांनी आघाडीवर 

20 वी फेरी - पंकजा मुंडे 16482 मतांनी आघाडीवर 

21 वी फेरी - पंकजा मुंडे 33623 मतांनी आघाडीवर

22 वी फेरी - पंकजा मुंडे 38303 मतांनी आघाडीवर 

23 वी फेरी - पंकजा मुंडे 34705 मतांनी आघाडीवर 

24 वी फेरी - पंकजा मुंडे 30461 मतांनी आघाडीवर 

25 वी फेरी - पंकजा मुंडे 22421 मतांनी आघाडीवर 

26 वी फेरी - पंकजा मुंडे 10276 मतांनी आघाडीवर

27 वी फेरी - पंकजा मुंडे 7408 मतांनी आघाडीवर 

28 वी फेरी - बजरंग सोनवणे 932 मतांनी आघाडीवर 

29 वी फेरी - बजरंग सोनवणे 1217 मतांनी आघाडीवर

30 वी फेरी - बजरंग सोनवणे 2602 मतांनी आघाडीवर

31 वी फेरी - बजरंग सोनवणे 2688 मतांनी आघाडीवर

बीड लोकसभा मतदारसंघात भाजपने प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करत पंकजा मुंडे यांना मैदानात उतरवले होते. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांना आपल्या पक्षात खेचत उमेदवारी दिली होती. बीड लोकसभेत मतमोजणीच्या एक दिवसापूर्वी वातावरण चांगलच तापलेलं पाहायला मिळालं होतं. बजरंग सोनवणे येथे थेट निवडणूक अधिकाऱ्यांशी बाचाबाची झाली होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget