एक्स्प्लोर

शिर्डीत सदाशिव लोखंडेंच्या प्रचारासाठी विखे पाटील, काळे एकत्र येत, कोल्हेंची गैरहजेरी चर्चेत, खासदार म्हणाले ते पण येतील

Shirdi Lok Sabha Election : शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीनं प्रचारात आघाडी घेतली असल्याचं चित्र आहे. सदाशिव लोखंडे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम देखील नुकताच पार पडला.

शिर्डी (अहमदनगर) : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात (Shirdi Lok Sabha Seat) महायुतीने प्रचारात आघाडी घेतली आहे. राज्यातील तीन मंत्र्यांच्या दौऱ्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शिर्डीतील महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे हे देखील उपस्थित होते. मात्र, कोपरगावचे भाजपचे विवेक कोल्हे याही कार्यक्रमाला गैरहजर राहिले होते. आशुतोष काळे यांनी हा मुद्दा उचलला होता, मात्र सदाशिव लोखंडेनी पण ते सोबत येतील, असं म्हटलं. 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिल्यानंतर  प्रचार कार्यालयाजवळ लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर राज ठाकरे यांचा फोटो देखील दिसून आला. उद्घाटन सोहळा कार्यक्रमात आशुतोष काळे यांनी नाव न घेता कोल्हेंच्या भूमिकेबाबत प्रश्न  उपस्थित केला तर विद्यमान खासदार लोखंडे यांनी माजी खासदार वाकचौरे यांच्यावर निशाणा साधत कोल्हे देखील आपल्याबरोबर राहतील असा विश्वास यावेळी बोलून दाखवला. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे या सोहळ्यात अधिकच आक्रमक दिसले. चौफेर फटकेबाजी करत त्यांनी भाषणातून शरद पवार, उद्धव ठाकरेंसह थोरात यांच्यावर जोरदार टीका केली तर उमेदवार लोखंडे यांना सुद्धा सल्ला दिला. 

आमदार आशुतोष काळे म्हणाले प्रत्येक मतदारसंघातून मतांचं लीड देण्याची स्पर्धा सध्या सुरू झाली आहे. कोपरगावचा विचार केला तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून महायुतीत आहोत. त्यामुळे दोन्ही नेते एकाच पक्षात असल्याने समोर कोणी नाही.  मात्र आता कोण यात बरोबर आहे कोण नाही हे लोखंडे साहेबांनी बघितलं पाहिजे असं आशुतोष काळे यांनी विवेक कोल्हे यांचं नाव न घेता म्हटलं. आम्ही तर सगळे प्रयत्न करणारच आहोत. एकदा आम्ही शब्द दिला की त्यात काही झालं तरी माग फिरत नाही. आम्ही प्रामाणिकपणे काम करणारच आहोत असा शब्द या निमित्ताने देतो, असं आशुतोष काळे म्हणाले. 

खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की  केवळ सभा मंडप देऊन विकास होत नाही.  माजी खासदारांनी खासदार निधी सोडून एक तरी काम केलंय का हे दाखवावं.. माझं त्यांना जाहीर आव्हान आहे. जर काम करणारे खासदार होते तर यांचा खासदार निधी शिल्लक कसा राहिला त्यावेळी याचे उत्तर त्यांनी द्यावे, असा सवाल सदाशिव लोखंडे यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांना केला.

सदाशिव लोखंडे पुढं म्हणाले की 2014 ला मला मुरकुटे आणि काळे यांच्या सहकार्याने निवडून आलो.. 2019 ला परिवर्तन झालं आणि विखे साहेबांमुळे खासदार झालो.आता 2024 ला विखे काळे बरोबर आहेत.. कोल्हेंबाबत अनेकांना शंका आहे मात्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी कोल्हे पाठीशी राहतील यात मला शंका नाही, असं सदाशिव लोखंडे म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदेंनी मला सांगितलंय या पुढील काळात तुमचे नेते राधाकृष्ण विखे पाटील असतील.इथून मागे काही चुका झाल्या असतील त्या सोडून द्या यापुढील काळात विखेंच्या नेतृत्वाखाली काम करणार, असं सदाशिव लोखंडे म्हणाले.

संबंधित  बातम्या :

Madha Loksabha : माढ्यात मोहिते पाटलांची ताकद वाढणार, संजयमामांशी दोन हात करण्यासाठी नारायण पाटील तुतारी हाती घेणार

 Bhiwandi Loksabha: मी 40 जागा निवडून आणण्याचं वचन दिलंय; एकनाथ शिंदेंनी एक फोन फिरवला अन् भाजपच्या मार्गातील अडथळा दूर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, नामिबियाच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानं सुनील गावस्कर नाराज,  'या' खेळाडूचं नाव सूचवलं 
पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, सुनील गावस्कर यांचा सूर्यकुमार यादवला सल्ला, कोणाचं नाव सूचवलं?
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Amol Mitkari On Ajit Pawar 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने अजित पवारांना अमोल मिटकरांचं भावनिक पत्र
Sunil Tatkare PC : विलिनीकरणासंदर्भात प्रस्ताव आल्यावर पक्षांतर्गत चर्चा करु, तटकरेंची भूमिका
NCP Merger : विलिनीकरणाचा फायदा, तोटा कुणाला? राष्ट्रवादींची गणितं कधी सुटणार?
Sanjay Raut PC : ज्यांनी शेण खाल्ले त्यांना जाब विचारला जाईल,चंद्रपूर महापौर प्रकरणावर राऊतांचा संताप
Shashikant Shinde NCP Merger :दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व देणार होतो

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, नामिबियाच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानं सुनील गावस्कर नाराज,  'या' खेळाडूचं नाव सूचवलं 
पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, सुनील गावस्कर यांचा सूर्यकुमार यादवला सल्ला, कोणाचं नाव सूचवलं?
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
AUS vs ZIM : टी 20 वर्ल्ड कपमध्ये झिम्बॉब्वेविरुद्ध लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन ट्रेविस हेडनं पराभवाचं खापर कशावर फोडलं? 
ऑस्ट्रेलियावर टी 20 वर्ल्ड कपबाहेर जाण्याचं संकट, झिम्बॉब्वेविरुद्ध पराभव, ट्रेविस हेड म्हणाला, 2023 ला असंच घडलेलं....
'मुंबईच्या महापौरांचे लक्ष सध्या फक्त बांगलादेशींवर, केंद्रात गेली दहा वर्ष भाजप सरकार मग देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, अनेक भाजपशासित राज्यांतून बांगलादेशी कसे पोहोचले?'
'मुंबईच्या महापौरांचे लक्ष सध्या फक्त बांगलादेशींवर, केंद्रात गेली दहा वर्ष भाजप सरकार मग देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, अनेक भाजपशासित राज्यांतून बांगलादेशी कसे पोहोचले?'
मुंबईतील इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय, 600 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; पालकांची मनसेकडं धाव
मुंबईतील इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय, 600 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; पालकांची मनसेकडं धाव
Share Market Crash : शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 7.40  लाख कोटी बुडाले, मार्केटमध्ये अचानक भूकंप कशामुळं? 
शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 7.40  लाख कोटी बुडाले, मार्केटमध्ये अचानक भूकंप कशामुळं? 
Embed widget