एक्स्प्लोर

Lok Sabha Election : मतदान होताच भाजपच्या उमेदवाराचा मृत्यू, आजारपणामुळे प्रचारापासून होते दूर

Kunwar Sarvesh Singh Death : कुंवर सर्वेश सिंह हे चार वेळा आमदार आणि एक वेळा खासदार राहिले आहेत. या निवडणुकीत उमेदवारी मिळूनही आजारपणामुळे त्यांना प्रचार करता आला नव्हता. 

Kunwar Sarvesh Singh Death : उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद लोकसभा मतदारसंघातील (Moradabad Parliamentary Constituency) भाजपचे उमेदवार कुंवर सर्वेश सिंह (Kunwar Sarvesh Singh) यांचे निधन झाले आहे. मोरादाबादच्या जागेसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं आणि शनिवारी भाजपच्या उमेदवाराचं निधन झालं. कुंवर सर्वेश सिंह हे गेल्या काही काळापासून आजारी होते, त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारातही ते दिसले नव्हते. आजारपणामुळे त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. 

कुंवर सर्वेश सिंग हे भाजपकडून चार वेळा आमदार आणि एक वेळ खासदार होते. यावेळीही ते भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत होते. 

सर्वेश सिंह यांनी पहिल्यांदा 1991 मध्ये भाजपच्या तिकिटावर ठाकूरद्वारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर ते सलग चार वेळा आमदार राहिले. 2014 मध्ये भाजपने सर्वेश सिंह यांना लोकसभेचे तिकीट दिले आणि विजयी झाल्यानंतर सर्वेश सिंह यांनी केंद्रीय राजकारणात प्रवेश केला. 

आजारपणामुळे प्रचार केला नाही

2019 साली पराभूत झाल्यानंतरही भाजपने यावेळी पुन्हा एकदा सर्वेश कुमार यांना तिकीट दिले होते. परंतु आजारपणामुळे ते स्वतःचा प्रचार करू शकले नाहीत. निवडणुकीदरम्यान ते कुठेही दिसले नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांनी सर्वेश सिंग यांचा प्रचार केला. 

मुरादाबाद लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी पार पडले. यूपीमधील सरासरी मतदानापेक्षा मुरादाबादमध्ये जास्त मतदान झाले. येथे सुमारे 60 टक्के मतदान झाले. पण निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच सर्वेश कुमारचा मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशातील एक मोठा नेता

सन2019 मध्ये सर्वेश सिंह सपाच्या एसटी हसन यांच्याकडून निवडणूक हरले. कुंवर सर्वेश सिंग हे उत्तर प्रदेशातील एक बलाढ्य नेत्यांपैकी एक मानले जात होते. सर्वेश सिंग हे ठाकूर जातीतील आहेत. सर्वेश सिंह यांचा मुलगा कुंवर सुशांत सिंह हे मुरादाबाद लोकसभेतील बदापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.

मुरादाबाद लोकसभा जागा आरक्षित आहे. देशात झालेल्या गेल्या लोकसभा निवडणुकीत म्हणजेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या जागेवर एकूण 19,58,939 मतदार होते. त्या निवडणुकीत सपाचे उमेदवार डॉ. एस.टी हसन हे विजयी झाले होते. तर भाजपचे उमेदवार कुंवर सर्वेश कुमार दुसऱ्या क्रमांकावर होते.

सन 2014 साली खासदार

यापूर्वी 2014 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मुरादाबाद लोकसभा जागेवर 17,71,985 मतदारांची नोंदणी झाली होती. त्या निवडणुकीत भाजप पक्षाचे उमेदवार कुंवर सर्वेश कुमार यांनी एकूण 4,85,224 मते मिळवून विजय मिळवला होता. या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या सपाचे उमेदवार डॉ.एस. टी. हसन होते.

त्याआधीही, 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, उत्तर प्रदेश राज्यातील मुरादाबाद लोकसभा जागेवर 1,38,8525 मतदार उपस्थित होते. त्यापैकी INC उमेदवार मोहम्मद अझरुद्दीन 3,01,283 मते मिळवून विजयी झाले होते. त्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार कुंवर सर्वेश कुमार दुसऱ्या क्रमांकावर होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ambadas Danve on Eknath Shinde : टँकरमध्ये पाणू कुठून टाकणार? अजित पवारासारखं आणणार का?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 08 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Embed widget