Navi Mumbai International Airport: ऐनवेळी महायुती सरकारकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव; पीएम मोदी, सीएम फडणवीसांकडून भूमिपुत्राच्या संघर्षाचं स्मरण
फडणवीस यांनी दिबा पाटील यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांच्या नावाचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये केला. त्यांच्या भाषणानंतर मोदी यांनीही आपल्या भाषणामध्ये दिबा पाटील यांचा सामाजिक कार्याचा गौरव केला.

Navi Mumbai International Airport: नवी मुंबईमधील दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आज (8 ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकनेते भूमिपुत्र दिबा पाटील यांच्या कार्याचा गौरव केला आणि आपल्या भाषणांमध्ये स्मरण केलं. देवेंद्र फडणवीस यांनी दिबा पाटील यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांच्या नावाचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये केला. त्यांच्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या भाषणामध्ये दिबा पाटील यांचा सामाजिक कार्याचा गौरव केला.
प्रत्येकालाच ते प्रेरणा देत राहतील
मोदी भाषणात म्हणले की आज आपण दिबा पाटील यांचे स्मरण करत आहेत. समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी त्यांनी काम केलं असून त्यांचं व्यक्तिमत्व प्रेरणादायी असल्याचं मोदी म्हणाले. समाज जीवनामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकालाच ते प्रेरणा देत राहतील असं मोदी यांनी आपल्या भाषणातून सांगितले. गेल्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव द्यावे, यासाठी सर्वपक्षीय लढा सुरू होता. दरम्यान, मोदी म्हणाले की, मुंबईला आपले दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाले आहे, ज्यामुळे या क्षेत्राला आशियातील सर्वात मोठे कनेक्टिव्हिटी हब म्हणून स्थापित करण्यात मोठी भूमिका मिळेल. हे विमानतळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर बांधले गेले असून त्याचा आकार कमळाच्या फुलासारखा आहे, जो संस्कृती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. भुयारी मेट्रो (Underground Metro): मुंबईला पूर्णपणे भुयारी मेट्रो मिळाली आहे, ज्यामुळे प्रवास अधिक सोपा होईल आणि लोकांचा वेळ वाचेल. मोदी यांनी मुंबईसारख्या व्यस्त शहरात, ऐतिहासिक इमारती सुरक्षित ठेवत ही मेट्रो बांधल्याबद्दल त्यांनी अभियंते आणि श्रमिकांचे अभिनंदन केले.
दोन ते अडीच तासांचा प्रवास 30-40 मिनिटांत पूर्ण होईल
त्यांनी सांगितले की, मेट्रोमुळे दोन ते अडीच तासांचा प्रवास 30-40 मिनिटांत पूर्ण होईल. 'विकसित भारत' साध्य करण्यासाठी, जिथे गती आणि प्रगती दोन्ही आहेत, तेथे गेल्या 11 वर्षांपासून काम केले जात आहे. यात वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेन, बुलेट ट्रेन, रुंद महामार्ग, बोगदे आणि लांब उंच पूल यांचा समावेश आहे. वाहतुकीची सर्व साधने एकमेकांना जोडली जात आहेत जेणेकरून लोकांना सीमलेस प्रवास (Seamless Travel) मिळू शकेल. मुंबई वन ॲप हे याच दिशेने टाकलेले पाऊल आहे. या ॲपमुळे एकाच तिकिटावर लोकल, बस, मेट्रो किंवा टॅक्सीने प्रवास करणे शक्य होईल आणि तिकिटासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही.
अखेर आज (8 ऑक्टोबर) महायुती सरकारने चलाखी करताना उद्घाटनासाठी काही तास बाकी असतानाच नवी मुंबई विमानतळाच्या प्रवेशद्वारावर दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असा फलक लावला. त्यामुळे नवी मुंबई विमानतळातला दिबा पाटील यांचेच नाव दिल्याचे स्पष्ट झालं. त्यामुळे गेल्या दिवसांपासून लढा सुरू होता त्या लढ्याला सुद्धा यश आलं आहे. नवी मुंबई विमानतळ आता दिबा पाटील विमानतळ म्हणून ओळखलं जाईल. विमानतळाची रचना कमळाच्या पानासारखी करण्यात आली असून चार टर्मिनल साकारण्यात आली आहेत.वर्षभरात जवळपास 9 कोटींच्या आसपास प्रवाशांना सामावून घेईल, इतक्या भव्य क्षमतेचं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























