एक्स्प्लोर

Chhagan bhujbal: अजित पवारांच्या नाराजीवर भुजबळ स्पष्टच बोलले, बाळासाहेब ठाकरेंचा दिला दाखला, जरांगेंवरही जोरदार हल्ला

Chhagan bhujbal: दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासंदर्भातील प्रश्नावर, तुम्ही लोक काय त्याच्या नादी लागलाय? असे म्हणत जरांगेंवर हल्लाबोल केला.

अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांच्या भूमिकेवरुन पक्षप्रमुख अजित पवार नाराज असल्याची चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळात होत असते. त्यातच, अजित पवारांच्या (Ajit pawar) उपस्थितीत मंगळवारी रात्री हॉटेल ट्रायडंट येथे बैठक झाली. या बैठकीत अजित पवार विरुद्ध छगन भुजबळांमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळालं. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवारांनी नाराजी जाहीर केल्याचेही समजते. मात्र, अजित पवारांच्या या नाराजीसंदर्भात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी आरक्षण लढ्यासंदर्भातील आपली स्पष्ट भूमिका आपण यापूर्वीच अजित पवारांना सांगितल्याचे म्हटले. तसेच, अजित पवार मला काहीही बोलले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांच्यासंदर्भातील प्रश्नावर, तुम्ही लोक काय त्याच्या नादी लागलाय? असे म्हणत जरांगेंवर हल्लाबोल केला.

''अजित पवार मला काही बोलले नाहीत, मला बोलायचं असतं तर ते थेट बोलले असते, असे म्हणत अजित पवारांची आपल्यावर कुठलीही नाराजी नसल्याचे ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. तसेच, मी अजित पवारांना स्पष्ट बोललोय, मी 35 वर्षांपासून समाजासाठी काम करतोय. मी शिवसेना त्याच कारणाने सोडली होती. ते काम मी कुठंही गेलो तरी चालूच राहणार, त्यास मला कुणाचंही बंधन नाही. मी समाजाची भूमिका मांडायला हरकत नाही,'' असेही छगन भुजबळ यांनी शिर्डीत माध्यमांशी बोलताना सांगितले.

अजित पवारांनी साप पाळले आहेत, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले होते, त्यासंदर्भात बोलताना छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला. तुम्ही लोक काय त्याच्या नादी लागलाय? त्याला काही काम धंदा नाही, त्याला शिक्षण आहे का? काही माहीत आहे का? असे भुजबळ म्हणाले. मला बाळासाहेब ठाकरेंनी नेता केलाय, 57 वर्षे झाले मला, मी मुंबईचा दोनदा महापौर झालो. मंडल आयोगामुळे काँग्रेसमध्ये गेलो, त्याला राजकारणात कोण कधी आलं माहीत आहे का?. 1991 साली मी कॅबिनेट मंत्री झालो, जे आज मंत्री आहेत तेव्हा कोणीही नव्हतं, असा पलटवार भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर केला. तसेच, माझ्या भूमिकेला मनातून सर्वांचेच समर्थन आहे, मराठा समाजाला इडब्लूएसचे आरक्षण दिल्यानंतर सर्व प्रश्न मिटले होते. मात्र, हा दारुवाले आणि वाळूवाल्यांचा लिडर, हा लढाया, मारामाऱ्या करायला लिडरशिप करतोय. देशातल वातावरण बिघडवण्यासाठी कारणीभूत झालाय. त्याला अक्कलच नाही, त्याच्याकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा कशी करू शकता? असा सवालही भुजबळांनी उपस्थित केला.

आर्थिक ओढाताण, आनंदाचा शिधा नाही (Chhagan bhujabal anandacha shidha)

दरम्यान, शेतकऱ्यांना साडे 31 हजार कोटींचे पॅकेज द्यावं लागलंय. मागच्या वर्षीपासून 40-45 हजार कोटींची लाडकी बहीण योजना सुरू आहे. ओढाताण कमी झाली की आनंदाचा शिधा परत सुरू करू, असे भुजबळ यांनी म्हटले.

हेही वाचा

रोहित शर्माची नवी कोरी टेस्ला कार, फ्रंट सीटवर बसून मारली राईड; गाडीचा नंबर खास; काय आहे मागील स्टोरी?

महत्त्वाच्या बातम्या

Prithviraj Chavan and PM Modi: देशात सत्ताबदल नक्की होईल, पण तो काँग्रेस पक्षामुळे नव्हे तर नरेंद्र मोदींमुळेच होईल, कारण... पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
देशात सत्ताबदल नक्की होईल, पण तो काँग्रेस पक्षामुळे नव्हे तर नरेंद्र मोदींमुळेच होईल, कारण... पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Raju Shetti on Sugar Price Hike : साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Kailas Patil: चुकांमधून धडा घेऊ, जे चुकले त्यांना धडा शिकवू; नगरसेवकांच्या फुटीनंतर आमदार कैलास पाटलांचा थेट इशारा
चुकांमधून धडा घेऊ, जे चुकले त्यांना धडा शिकवू; शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवक फुटीनंतर आमदार कैलास पाटलांचा थेट इशारा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Raju Shetti on Sugar Price Hike : साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Embed widget