Jalgaon Train Accident : दैव बलवत्तर म्हणून देहाचे तुकडे होता होता राहिले, अफवेला बळी पडून रेल्वेतून उडी घेणाऱ्या प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये पुष्कप एक्स्प्रेस रेल्वेत मोठी दुर्घटना घडली आहे. या रेल्वेतून प्रवास करणारे प्रवासी समोरून येणाऱ्या रेल्वेखाली चिरडले गेले आहेत.
Jalgaon Train Accident : जळगाव जिल्ह्यात पुष्कप एक्स्प्रेसमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. आग लागल्याच्या अफवेला बळी पडल्यामुळे या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या 10 ते 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रेल्वेला आग लागल्याचे समजून या प्रवाशांनी थेट चालत्या रेल्वेतून उडी घेतली. त्याच वेळी समोरून येणाऱ्या रेल्वेच्या खाली आल्याने या प्रवाशांच्या देहाचे अक्षरश: तुकडे झाले आहेत. दरम्यान, याच अफवेला बळी पडून रेल्वेतून उडी घेतलेल्या एका प्रवाशाने घटनास्थळी नेमकं काय घडलं? याची माहिती दिली आहे.
रेल्वेतून उडी घेतल्यानंतर हा प्रवासीदेखील जखमी झाला आहे. मात्र दैव बलवत्तर म्हणून तो समोरच्या रेल्वेखाली येता-येता वाचला. त्यानेच जळगावमध्ये रेल्वे दुर्घटनेत नेमकं काय घडलं? हे सांगितलं आहे.
ट्रेनच्या दोन्ही बाजूने प्रवासी उतरले
दैव बलवत्तर म्हणून देहाचे तुकटे होता होता वाचले, अफवेला बळी पडून रेल्वेतून उडी घेणाऱ्या प्रवाशाने सगळं सांगितलं आहे. "रेल्वेला ब्रेक लावल्यानंतर धुर निघाला होता. मात्र आग लागल्याची अफवा पसरली. त्यानंतर लोक ट्रेनमधून उतरू लागले. ट्रेनमधून बरेच लोक उतरले होते. एका बाजूने जास्त लोक झाल्यामुळे काही लोक रेल्वेच्या दुसऱ्या बाजूने उतरू लागले. याच वेळी समोरून दुसरी रेल्वे आली आणि यात पाच ते सात जण चिरडले गेले," असे या प्रवाशाने सांगितले.
काही लोक जखमी झाले तर काही....
"यात मीदेखील जखमी झालो. माझ्या पायाला लागले आहे. साधारण एका बोगीतील सर्वच प्रवासी रेल्वेच्या दोन्ही बाजूने उतरले होते. यातील काही प्रवासी जखमीही झाले तर काहींचा मृत्यू झाला," अशीही माहिती या प्रवाशाने दिली आहे.
Video :
7 जण किरकोळ जखमी, 4 जण गंभीर
ही घटना घडल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या घटनेची दखल घेतली आहे. बचावकार्य युद्धपातळीवर चालू आहे. या दुर्घटनेत 7 जण किरकोळ जखमी आहेत. तर चार जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार केला जात आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये मदत करण्याचे जाहीर केले आहे.
हेही वाचा :
Pushpak Express Train Accident : रेल्वेने 11 जणांना चिरडलं, आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?
Pushpak Express Accident : अपघात नेमका कसा झाला? पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशांची EXCLUSIVE माहिती