गुजराती नेत्यांना खुश करण्यासाठी देवेंद्र फडणवीस म्हणतात, शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नाही : जयंत पाटील
Jayant Patil on Devendra Fadnavis, सोलापूर : "गुजराती नेत्यांना खुश करण्यासाठी देवेंद्र फडणवीस म्हणतात, शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नाही", असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
![गुजराती नेत्यांना खुश करण्यासाठी देवेंद्र फडणवीस म्हणतात, शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नाही : जयंत पाटील Jayant Patil To appease Gujarati leaders, Devendra Fadnavis says, Shivaji Maharaj did not loot Surat Marathi News गुजराती नेत्यांना खुश करण्यासाठी देवेंद्र फडणवीस म्हणतात, शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नाही : जयंत पाटील](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/04/d65859462c62c4aebd3fe1ca1ed84cb91725474378952924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jayant Patil on Devendra Fadnavis, सोलापूर : "गुजराती नेत्यांना खुश करण्यासाठी देवेंद्र फडणवीस म्हणतात, शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नाही", असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. ते सोलापुरात पत्रकारांशी बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी दोनदा सुरत लुटली. देवेंद्र फडणवीस हुशार नेते असूनही अफजलखान हा आदिलशाहीचा सरदार असताना तो औरंगजेबाचा सरदार आहे, असं म्हणाले होते, हेही जयंत पाटील यांनी सांगितलं.
महाराष्ट्रातून गुजरातला काहीही गेले तरी चालेल पण गुजरातच्या विरोधी काय बोलायचं नाही
जयंत पाटील म्हणाले, फडणवीसांना इतिहास माहित नसावा किंवा गुजरातला सांभाळने हा हेतू यामध्ये दिसतो. महाराष्ट्रातून गुजरातला काहीही गेले तरी चालेल पण गुजरातच्या विरोधी काय बोलायचं नाही, अशी यांची निती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवण येथे कोसळला याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाष्य मी कधीही ऐकलं नाही. त्यांच्याकडून माफी मागण्याचा सूरही दिसत नाही, असंही पाटील म्हणाले.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, काढतना हसन मुश्रीफ यांना पवार साहेबांनी भरपूर काय दिले, ताकद दिली. त्यामुळे त्यांनी केलेला आरोप हा त्यांना लागू होत नाही. मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडणुकीपूर्वी जाहीर करणे हे महाराष्ट्रात कधी झालेलं नाही उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत. ते मुख्यमंत्री होते त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केले आहे. आमच्यामध्ये चांगली अंडरस्टँडिंग आहे. पवार साहेब आणि उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहेत. प्रसार माध्यमांनी याचा जास्तच उहापोह केला तसा विषय गंभीर नसल्याचे पाटील यांनी सांगितले .
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत हे जयंत पाटील यांच्या गाडीत सोबत होते. याबाबत बोलताना पाटील म्हणाले, अनिल सावंत हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत. विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी व स्थानिक नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. येत्या विधानसभा निवडणुकीत जागावाटप बाबत गणपती झाल्यावर बैठक होईल. राज्यात 288 पैकी 170 ते 180 जागा महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागा येतील. सध्या राज्यभरातून अनेक नेते तुतारी हातात घेण्यासाठीचा करीत असून आमच्या पक्षाला उज्वल भविष्य असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी : अखेर जयदीप आपटेला कल्याणमधील घरातून अटक, शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी दुसरी मोठी कारवाई
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)