डॉन सिनेमात बच्चनच्या पिस्तूलमध्ये गोळी नव्हती, हे फक्त अभिनेत्रीलाच माहिती होतं, तशी गत लाडकी बहीण योजनेची : जयंत पाटील
Jayant Patil on Ladki Bahin Yojana : "डॉन सिनेमात बच्चनच्या पिस्तूलमध्ये गोळी नव्हती, हे फक्त अभिनेत्रीलाच माहिती होतं, तशी गत लाडकी बहीण योजनेची आहे.", असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. ते बीडमध्ये बोलत होते.
Jayant Patil on Ladki Bahin Yojana : "डॉन सिनेमात बच्चनच्या पिस्तूलमध्ये गोळी नव्हती, हे फक्त अभिनेत्रीलाच माहिती होतं, तशी गत लाडकी बहीण योजनेची आहे.", असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. ते बीडमध्ये बोलत होते. शिवाय जनतेच्या जीवावर आम्ही विधानसभा जिंकू, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय.
'भावी मुख्यमंत्री जयंत पाटील', बीडमध्ये बॅनर झळकले
आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने बीडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडत आहे. आणि याच मेळाव्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज बीडमध्ये आहेत. त्यांच्या स्वागतासाठी पूजा मोरे यांच्याकडून बीडमध्ये बॅनरबाजी करण्यात आले आहे. या बॅनरवर भावी मुख्यमंत्री जयंत पाटील असा उल्लेख करण्यात आलेला आहे. या बॅनरमुळे राजकीय वर्तुळामध्ये चांगल्या चर्चा होताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी बीडमध्ये राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा भावी मुख्यमंत्री तर बहीण पंकजा मुंडे यांचा भावी उपमुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला होता. मात्र आता यामध्ये महाविकास आघाडीने देखील उडी घेतली आहे.
शक्ती प्रदर्शन करत माधव जाधव यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
परळी विधानसभा मतदारसंघातील माधव जाधव यांनी आज जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केला. माधव जाधव यांनी यापूर्वी काँग्रेस आणि त्या नंतर बी आर एस पक्षांमध्ये काम केले होते. येणारा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माधव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. परळी ते बीड अशी एक रॅली काढून जवळपास 100 गाड्यांचा ताफा घेऊन माधव जाधव यांनी हा प्रवेश केला.
बीडमध्ये पत्रकार परिषद सुरू असताना बत्ती गुल
शासकीय विश्राम गृहात जयंत पाटील यांची सुरू होती. मात्र, यावेळीच लाईट गेल्यामुळे गोंधळ उडाला होता. काही वेळानंतर लाईट आल्यानंतर पुन्हा एकदा पत्रकार परिषद सुरळीत झाली. आज दिवसभर जयंत पाटील विधानसभा निवडणुकी पूर्वी आढावा घेण्यासाठी बीडमध्ये आहेत. दरम्यान लाईट गेल्यामुळे मोबाईलची टॉर्च लाईटवर प्रेस घेण्यात आली.
Jayant Patil PC | जनतेच्या जीवावर आम्ही विधानसभा जिंकू! जयंत पाटलांना विश्वास ABP Majha
इतर महत्वाच्या बातम्या